शहरं
Join us  
Trending Stories
1
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
2
महायुतीचे उमेदवार विलास भुमरे गॅलरीतून पडले, हात-पाय फ्रॅक्चर, उपचार सुरु
3
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
4
भयंकर! नर्सने माचिसची काडी पेटवली अन् आग लागली; वॉर्डमध्ये नेमकं काय घडलं?
5
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
6
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
7
मुंबईतील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड बिनधास्त फिरतोय; पाकिस्तान जगाची दिशाभूल करतंय
8
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
9
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
10
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
11
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
12
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
13
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
14
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
15
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
16
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
17
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
18
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
19
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
20
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक

राज्यभरात स्वाइन फ्लूचे १५६ बळी; सार्वजनिक आरोग्य विभागाची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2019 5:12 AM

राज्यात उन्हाच्या पाऱ्याने चाळिशीचा टप्पा गाठला असून स्वाइन फ्लूनेही कहर केला आहे. १ जानेवारी ते १४ मेदरम्यान राज्यभरात जवळपास १५६ रुग्णांचा स्वाइन फ्लूने मृत्यू झाला असून बाधित रुग्णांची संख्या १ हजार ५३६ एवढी आहे.

मुंबई : राज्यात उन्हाच्या पाऱ्याने चाळिशीचा टप्पा गाठला असून स्वाइन फ्लूनेही कहर केला आहे. १ जानेवारी ते १४ मेदरम्यान राज्यभरात जवळपास १५६ रुग्णांचा स्वाइन फ्लूने मृत्यू झाला असून बाधित रुग्णांची संख्या १ हजार ५३६ एवढी आहे. तर पुणे मनपा क्षेत्रातील पाच रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. याखेरीज, सध्या राज्यभरात १६७ रुग्णांवर रुग्णालयात औषधोपचार सुरू आहेत.राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात नाशिक, नागपूर, अहमदनगर, पुणे मनपा आणि कोल्हापूरमध्ये सर्वाधिक बळी गेले आहेत. १ जानेवारी ते १४ मेदरम्यान १० लाख ५८ हजार ३४१ रुग्णांना तपासण्यात आले आहे. तर १८ हजार ७८८ संशयित फ्लू रुग्णांना आॅसेलटॅमिवीरच्या गोळ्या देण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे, या काळात १ हजार २०७ रुग्णांना रुग्णालयांत उपचार करून घरी सोडण्यात आले आहेत. २०१८ साली राज्यात स्वाइन फ्लूमुळे ४६१ रुग्णांचा बळी गेला होता, तर २ हजार ५९३ रुग्ण आढळून आले होते, तर २०१७ मध्ये ७७८ मृत्यूंची नोंद झाली होती आणि ६ हजार १४४ बाधित रुग्णांची संख्या दिसून आली होती.आरोग्य विभागाच्या वतीने स्वाइन फ्लूच्या प्रतिबंध आणि नियंत्रणासाठी राज्यातील फ्लू सदृश्य रुग्णांचे नियमित सर्वेक्षण करण्यात येत आहे. याशिवाय विनाविलंब उपचार, विलगीकरण कक्ष, प्रतिबंधक लसीकरण, साथरोग प्रतिबंध व नियंत्रक समितीची स्थापना करणे अशा विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत.

राजस्थानात सर्वाधिक मृत्यूराज्यासह देशातही स्वाइनची दहशत असून राजस्थानमध्ये स्वाइन फ्लूमुळे सर्वाधिक म्हणजे २०१ जणांचा मृत्यू झाला असून ४ हजार ९९९ इतके बाधित रुग्ण असल्याची नोंद आहे. राजस्थानच्या खालोखाल गुजरातमध्येही स्वाइनची दहशत कायम आहे. गुजरातमध्ये १५० रुग्णांचा बळी गेला असून ४ हजार ७६५ स्वाइनचे रुग्ण आढळले आहेत.

टॅग्स :Swine Flueस्वाईन फ्लूMaharashtraमहाराष्ट्र