माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर पुन्हा एकदा लॉरेन्स बिश्नोई याचे नाव चर्चेत आले आहे. दरम्यान, आता याबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. महाराष्ट्राच्या सायबर विभागाने Flipkart, Etsy, AliExpress, Teeshopper आणि या प्लॅटफॉर्मवर दाऊद इब्राहिम आणि लॉरेन्स बिश्नोईचे फोटो असलेले टी-शर्ट विकणाऱ्या ईकॉमर्स प्लॅटफॉर्मवर गुन्हा दाखल केला आहे.
या विक्रीतून हे प्लॅटफॉर्म गुंड आणि गुन्हेगारी कृत्यांमध्ये गुंतलेल्या लोकांना ग्लॅमर आणि प्रोत्साहन देत असल्याचा आरोप आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, गुन्हेगारी व्यक्तिमत्त्वाला प्रोत्साहन देणारी उत्पादने समाजासाठी मोठा धोका निर्माण करतात, याचा तरुणांवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.
सायबर सुरक्षा अधिकाऱ्यांच्या ऑनलाइन निरीक्षणादरम्यान, फ्लिपकार्ट, AliExpress आणि Tshopper आणि Etsy सारख्या मार्केटप्लेससह अनेक ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म लॉरेन्स बिश्नोई आणि दाऊद इब्राहिम सारख्या गुंडांचा गौरव करणारे टी-शर्ट विकत आहेत,असं दिसून आले आहे.
मीशो या वेबसाईटवर गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचे फोटो असलेले टी-शर्ट १५० रुपयांपासून २२० रुपयांपर्यंत विकले जात आहेत.
चित्रपट निर्मात्याने सोशल मीडियावरुन केला विरोध
ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर लॉरेन्सच्या फोटोसह टी-शर्टच्या विक्रीला विरोध केला होता, चित्रपट निर्माता आलिशान जाफरी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर हा प्रश्न उपस्थित केला होता . देशातील ऑनलाइन कट्टरतावादाचे उदाहरण म्हटले होते. अशा टी-शर्टमुळे तरुण पिढीमध्ये चुकीचा आदर्श निर्माण होऊ शकतो, असे त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे. ही गंभीर बाब असल्याचे म्हणत ते म्हणाले की, अशा उत्पादनांमुळे गुन्हेगारांबद्दल सहानुभूती वाढू शकते.
लॉरेन्स बिश्नोई हा कुख्यात गुंड असून त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. लॉरेन्सवर यूएपीए अंतर्गत चार गुन्हेही दाखल आहेत. काही दिवसापूर्वीच त्याच्या टोळीने राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांच्या हत्येची जबाबदारी घेतली होती. पंजाबी गायक सिद्धू मूसवाला यांच्या हत्या प्रकरणातही त्याच्या टोळीचे नाव पुढे आले होते, त्यानंतर देशभरात त्याची चर्चा सुरू झाली होती.