शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाण्यात बिल न देता हॉटेलात जायची सवय तेच दावोसमध्ये केले; जयंत पाटलांचा शिंदेंना जोरदार टोला 
2
रावेरचे माजी आमदार आर. आर. पाटील यांचे निधन
3
मी शिवसेना सोडली तेव्हा ३५ आमदार, १५ खासदार माझ्याकडे आलेले...; राज ठाकरेंचा एकाच वाक्यात उद्धव, शिंदेंवर नेम
4
Aiden Markram नं रुबाब दाखवला; पण Arshdeep Singh समोर तो फिका ठरला (VIDEO)
5
फुटबॉल सामन्यावेळी इस्रायली नागरिकांवर हल्ला; १२ जखमी, नेतन्याहूंनी नेदरलँडला विमाने पाठविली
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'समोरासमोर चर्चेला तयार', पृथ्वीराज चव्हाणांचं अमित शाहांना खुलं चॅलेंज
7
Sanju Samson ची सेंच्युरी! एका डावात ३ खास रेकॉर्ड्सला घातली गवसणी
8
फक्त एक षटकार मारला त्यातही सुर्या भाऊची हवा! IPL मधील २१ कोटींचा सिक्सर किंग पडला मागे
9
जानेवारीमध्ये भाजपला मिळणार नवीन राष्ट्रीय अध्यक्ष; 22 नोव्हेंबरला दिल्लीत महत्वाची बैठक
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महिलांबाबत अपमानास्पद वक्तव्यावर निवडणूक आयोग ॲक्शमोडवर,अधिकाऱ्यांना दिल्या कारवाईच्या सूचना
11
निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्यांच्या रेशन मनी भत्त्याला कात्री; दर महिन्याला ४००० रुपयांचे नुकसान
12
कोणाचा फोटो लावायचा, हा आमचा निर्णय; मोदींचा फोटो न लावण्यावरुन नवाब मलिक स्पष्ट बोलले
13
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
14
जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये सैन्याची मोठी कारवाई; दोन दहशतवाद्यांचा खात्मा
15
"...तर बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या"; नारायण राणेंचं विधान
16
ऐकावं ते नवलच! १२ वर्षे जुन्या कारचे अंत्यसंस्कार, चार लाख खर्च करुन बांधली समाधी
17
सध्यातरी इतकेच महायुतीत ठरले...; अमित शाह यांच्या मुख्यमंत्री नावाच्या दाव्यावर प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया
18
"अरे देवा...", राहुल-अथियाने दिली गुडन्यूज; सूर्यकुमारची पत्नी देविशाच्या कमेंटनं मात्र वेधलं लक्ष
19
Maharashtra Election 2024: गडचिरोलीत किती ही बंडखोरी; कोणाच्या हाती आमदारकीची दोरी?
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अमित शाहांच्या विधानावरुन नवा वाद,संभाजीराजे छत्रपतींनी घेतला आक्षेप; नेमकं प्रकरण काय?

कर्जमाफीवरून रणकंदन

By admin | Published: March 09, 2017 1:04 AM

राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याच्या मागणीवर काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत शिवसेनेच्या सदस्यांनीही बुधवारी प्रचंड गदारोळ घालत सभागृहाचे कामकाज तासाभरातच बंद पाडले.

मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याच्या मागणीवर काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत शिवसेनेच्या सदस्यांनीही बुधवारी प्रचंड गदारोळ घालत सभागृहाचे कामकाज तासाभरातच बंद पाडले. मुंबई महापालिकेत शिवसेनेचा भगवा फडकविण्यासाठीचा जल्लोष सुरू झालेला असताना इकडे विधानसभेत काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे सदस्य सरकारविरुद्ध एकत्र आल्याचे चित्र दिसले. तिन्ही पक्षांच्या सदस्यांनी सभागृह डोक्यावर घेत ‘कर्जमाफी नाही तर कामकाज नाही’, असे बजावत घोषणाबाजी केली. कामकाजात हे आमदार कमालीचे आक्रमक होते. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी ‘कर्जमाफीच्या घोषणेशिवाय सभागृह चालू दिले जाणार नाही, असे सांगितले. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कर्जबुडव्या उद्योगपतींना अभय दिले जाते, विजय मल्या लंडनमध्ये मजा करतो पण इकडे शेतकरी कर्जापायी आत्महत्या करीत आहेत. कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेऊ असे मुख्यमंत्री म्हणतात, सगळे शेतकरी वर गेल्यावर कर्जमाफी देणार आहात का, असा सवाल करीत वातावरण पेटविले. महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांना उद्देशून ते म्हणाले, आमच्याकडे या. तुम्हाला मुख्यमंत्री करतो मग तुम्ही कर्जमाफीचा निर्णय घ्या. फुंडकर यांनाही त्यांनी चिमटे काढले. काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेनेचेही आमदार वेलमध्ये उतरले. काँग्रेसच्या काही आमदारांनी अध्यक्षांच्या आसनासमोर घोषणा सुरू केल्या. काहींनी कागदाचे तुकडे हवेत भिरकावले. या गदारोळात कामकाज आधी १५ मिनिटांसाठी आणि नंतर दुपारी १२ पर्यंत स्थगित करण्यात आले. ते पुन्हा सुरू झाल्यानंतरही गोंधळ सुरूच होता. शेवटी तालिका अध्यक्ष सुधाकर देशमुख यांनी कामकाज दिवसभरासाठी तहकूब केले. प्रश्नोत्तराचा तास गदारोळातच आटोपला. (विशेष प्रतिनिधी)सभागृहात गोंधळ‘आमच्या सरकारचा कर्जमाफीला विरोध नाही पण शेतकरी नेहमीसाठी कर्जमुक्त झाला पाहिजे, यासाठीच्या उपाययोजना करण्यावर आमचा भर आहे’, असे शिक्षण मंत्री विनोद तावडे आणि कृषी मंत्री भाऊसाहेब फुंडकर यांनी सांगितले. पण विरोधी आणि शिवसेनेचे सदस्य ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने सभागृहात गोंधळ सुरु होता.