शेगाव (जि. बुलडाणा) : शेतकरी, भूमिहीन, शेतमजूर यांच्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी गुरुवारी शेगावात भूमिमुक्ती मोर्चाकडून रेल्वे रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला. या वेळी पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले. पाळा येथील आदिवासी मुलीचे लैंगिक शोषण करणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी, भूमिहीन शेतकऱ्यांची व मजुरांची कर्जातून मुक्ती व्हावी, अशा मागण्यांच्या पूर्ततेसाठी गुरुवारी शेगावात भूमिमुक्ती मोर्चाचे प्रमुख प्रदीप अंभोरे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. त्यांनी रेल्वे स्थानकावर जाऊन फलाटावर उभ्या असलेल्या गीतांजली एक्स्प्रेससमोर ठाण मांडून घोषणाबाजी केली. या वेळी रेल्वे पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले. (शहर प्रतिनिधी)
‘रेलरोको’चा शेगावात प्रयत्न
By admin | Published: December 23, 2016 4:41 AM