मुंबई : भाजपा सरकार घोटाळेबाजांना पाठीशी घालत आहे. चिक्की घोटाळ्याप्रकरणी ज्यांच्यावर आरोप झाले आहेत, त्यांच्याकडूनच अभिप्राय घेत निर्णय घेण्यात आले. चोराच्या साक्षीवरून ‘क्लीन चिट’ देणारे हे राज्यातील ‘क्लीन चीटर’ सरकार असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे. चिक्की घोटाळ्याप्रकरणी दोषींवर कारवाई होईपर्यंत या प्रकरणाचा पाठपुरावा करणार असल्याचा इशाराही सावंत यांनी दिला आहे.चिक्की घोटाळ्याप्रकरणी महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांना दिलेल्या क्लीन चिटवर सावंत म्हणाले, ज्यांनी भ्रष्टाचार केला, ज्यांच्याविरोधात तक्रार आहे, त्याच महिला व बालकल्याण विभागाकडून अभिप्राय घेत लाचलुचपत विभागाने क्लीन चिट दिली आहे. खरेदीत नियमांची पायमल्ली झालेली आहे.‘एसीबी’वर दबाव-एसीबीने मुख्यमंत्र्यांच्या दबावाखाली मुख्यालयातील वातानुकूलित खोलीत बसूनच महिला व बालविकास विभागातील भ्रष्टाचाराला क्लीन चिट दिली़ संस्थांच्या ठिकाणी जाऊन पाहणी करून त्या संस्था अस्तित्वात आहेत की नाहीत, हे पाहण्याची तसदीही घेतली नाही, असा आरोप सावंत यांनी केला़
हे तर ‘क्लीन चीटर’ सरकार, चिक्की घोटाळ्याप्रकरणी कारवाई करा:सचिन सावंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2017 2:29 AM