अलिबाग : महान नाटककार, शब्दप्रभू, चांद्रसेनीय कायस्थ प्रभू ज्ञातीभूषण राम गणेश गडकरी तथा गोविंदाग्रज पुतळा विटंबना करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी व त्याच ठिकाणी त्यांच्या पुतळ्याची पुनर्स्थापना करावी, अशी मागणी करणारे निवेदन रायगड जिल्हा प्रशासनास रायगड विभाग चांद्रसेनीय कायस्थ प्रभू समाजाच्या वतीने शुक्रवारी दिले.जिल्हाधिकाऱ्यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाचे चिटणीस जयराज देशमुख यांनी निवेदन स्वीकारले. चांद्रसेनीय कायस्थ प्रभू समाज रायगड विभागाचे अध्यक्ष सुभाष राजे, प्रमुख कार्यवाह अशोक प्रधान, खजिनदार नागेश कुळकर्णी, माजी अध्यक्ष आत्माराम प्रधान, पत्रकार मिलिंद राजे, किशोर प्रधान, अशोक देशमुख, मधुकर प्रधान आदी पदाधिकारी उपस्थित होते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, पुण्याचे पालकमंत्री, तसेच पुण्याचे महापौर यांनी समस्त कायस्थ ज्ञातिबांधवांच्या भावनांचा आदर करून, राम गणेश गडकरी यांच्या २३ जानेवारी या स्मृतिदिनापूर्वी त्यांचा पुतळा परत त्याच जागेवर विराजमान करावा व विकृत जात्यांधांवर योग्य ती कारवाई करावी, अशीही मागणी या निवेदनात केली आहे. (विशेष प्रतिनिधी)
विटंबना करणाऱ्यांवर कारवाई करा
By admin | Published: January 07, 2017 3:03 AM