मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रानौत हिने मुंबई आणि मुंबई पोलिसांबद्दल केलेल्या वक्तव्यावरून राजकीय गदारोळ सुरू आहे. मुंबईची बदनामी केल्याप्रकरणी कंगना रानौतवर कारवाई करण्याची मागणी शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी केली आहे. प्रताप सरनाईक यांनी विधानसभा अध्यक्षांकडे ही कारवाई करण्याची मागणी केली आहे. याबाबत अध्यक्षांनी गृह विभागाला २४ तासात अहवाल देण्याच्या सूचना दिल्या आहेत.
प्रताप सरनाईक यांनी यासंदर्भात ट्विट करून माहिती दिली आहे. "मुंबईची पाकव्याप्त काश्मीर व तालिबानशी तुलना करून बेछूट आरोप करणाऱ्या कंगनावर योग्य ती कारवाई करण्याची लेखी विनंती मी आज विधानसभा अध्यक्षांना केली. त्यांनी गृहमंत्र्यांना याची तातडीने चौकशी करून २४ तासात अहवाल सादर करण्यास सांगितले," असे ट्विटरच्या माध्यामातून प्रताप सरनाईक यांनी म्हटले आहे.
दरम्यान, याआधी प्रताप सरनाईक यांनी कंगना रानौत मुंबईत आली तर आमच्या रणरागिणी तिचे थोबाड फोडल्याशिवाय राहणार नाहीत, असे ट्विट केले होते. त्यामुळे राष्ट्रीय महिला आयोगाने प्रताप सरनाईक यांना अटक करण्याची मागणी केली होती. मात्र, प्रताप सरनाईकांनी आपल्या विधानावर ठाम असल्याचे म्हटले होते.
'थोबाड फोडल्याशिवाय राहणार नाहीत'कंगना रानौतला शिवसेना नेते संजय राऊत यांनी सौम्य शब्दांत समज दिली. ती इथे आली तर आमच्या रणरागिणी तिचे थोबाड फोडल्याशिवाय राहणार नाहीत. उद्योजक व सेलिब्रिटी घडवणाऱ्या मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी करणाऱ्या कंगना राणौतवर देशद्रोही म्हणून गुन्हा दाखल करण्याची मी गृहमंत्र्यांना मागणी करणार आहे, असे प्रताप सरनाईक म्हणाले होते.
'मुंबई व महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी तुरुंगात जायलाही तयार''महिला आयोगाला हाताशी धरून भाजपाने मला अटक करण्याचा खेळ रचला आहे. पण मुंबई व महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी कितीही वेळा तुरुंगात जायला मी तयार आहे,' असे प्रताप सरनाईक यांनी म्हटले होते. याशिवाय, 'मी माझ्या विधानावर ठाम आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत १०६ वीरांनी पत्करलेल्या हौतात्म्यामुळे मुंबई महाराष्ट्राला मिळाली. मराठी माणसाने रक्त सांडून मिळवलेल्या मुंबईबद्दल कोणीही काहीही बोलेल तर खपवून घेणार नाही,' असेही प्रताप सरनाईक यांनी ठणकावले होते.
आणखी बातम्या...
- "माझी ताकद काय आहे, ते १०५ आमदार असूनही विरोधी पक्षात बसलेल्यांना विचारा!"
- दाऊदचा हस्तक बोलतोय, उद्धव ठाकरेंशी बोलायचंय; 'मातोश्री'वर दुबईहून फोन
- दिपेश सावंतच्या अटकेप्रकरणी 'एनसीबी' अडचणीत, कोर्टाने मागितले उत्तर
- सहा सरकारी बँकाच्या खासगीकरणावर भाजपाचा डोळा, राष्ट्रवादीच्या नेत्याचा आरोप
- राष्ट्रवादीला काँग्रेसमध्ये विलीन करा अन् शरद पवारांना अध्यक्ष बनवा; रामदास आठवलेंची सूचना
- 'ना भूले हैं, ना भूलने देंगे'; सुशांतच्या मृत्यूवरून राजकारण, भाजपाने छापले स्टिकर्स
- "२०२४ आणि २०२९ मध्येही भाजपा जिंकणार", सुब्रमण्यम स्वामींचा मोदी सरकारला सल्ला
- मुंबईत येतेय, कोणाच्या बापात हिंमत असेल तर थांबवा; कंगनाचे खुले आव्हान