शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
5
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
6
"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान
7
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
8
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
9
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

‘गोडसेचे स्मारक उभारणाऱ्यांवर कारवाई करा’

By admin | Published: May 22, 2017 12:34 AM

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्या करणारा नथूराम गोडसे हा राष्ट्रपुरुष नव्हे, तर हत्यारा आहे. हिंदू महासभेतर्फे कल्याणमधील सापड

विरोधकांची मागणी : पुतळ्याला परवानगी नाही, शासनाची भूमिकालोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्या करणारा नथूराम गोडसे हा राष्ट्रपुरुष नव्हे, तर हत्यारा आहे. हिंदू महासभेतर्फे कल्याणमधील सापड गावात खासगी ठिकाणी स्मारक उभारुन सशस्त्र प्रशिक्षण वर्ग चालविण्याचा डाव आहे. राज्य सरकारने त्याबाबत तातडीने लक्ष घालून संबंधितावर कारवाई करावी, अशी मागणी विधान परिषदेत विरोधकांनी केली. त्यावर याबाबत चौकशी करुन सभागृहात माहिती सादर करण्याची हमी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.कॉँग्रेसचे आमदार संजय दत्त यांनी औचित्याचा मुद्दा उपस्थित करीत सापड गावात नथुराम गोडसे याचा पुतळा उभारला जात असल्याची माहिती सभागृहाला सादर केली. गोडसेचे गोडवे गाणाऱ्यांकडून त्याचा पुतळा बांधण्यात येत असून अशा घटनांमुळे पुरोगामी राज्यावर डाग लागणार आहे. त्याला वेळीच आवर घातला पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली. धनंजय मुंडे, हेमंत टकले व दत्त यांनी केलेल्या टिकेमुळे अस्वस्थ झालेल्या भाजपा सदस्यांनी त्यांच्या भाषणात हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे काहीवेळ गोंधळ निर्माण झाला.