शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
3
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
4
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
5
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
6
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
7
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
8
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
9
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
10
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
11
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
12
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
13
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
14
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
15
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
16
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
17
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
18
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
19
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
20
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला

राज्यात अपघातांचा ‘आलेख’ चढाच!, नियमबाह्य वाहन चालकांवर कारवाई करा-परिवहन आयुक्त कार्यालयाची सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2017 5:08 AM

देशातील रस्ते अपघातात महाराष्ट्राचा तिसरा क्रमांक लागतो. वाहन चालवताना मोबाइलचा वापर करणे आणि ओव्हरस्पीड वाहन चालवणे ही रस्ते अपघातांची प्रमुख कारणे आहेत. वाढती लोकसंख्या आणि रस्त्यांवरील वाढते अपघातसत्र लक्षात घेता राज्यात नियमबाह्य वाहन चालकांवर कारवाई करण्याचे आदेश परिवहन आयुक्त कार्यालयाने दिले आहेत.

मुंबई : देशातील रस्ते अपघातात महाराष्ट्राचा तिसरा क्रमांक लागतो. वाहन चालवताना मोबाइलचा वापर करणे आणि ओव्हरस्पीड वाहन चालवणे ही रस्ते अपघातांची प्रमुख कारणे आहेत. वाढती लोकसंख्या आणि रस्त्यांवरील वाढते अपघातसत्र लक्षात घेता राज्यात नियमबाह्य वाहन चालकांवर कारवाई करण्याचे आदेश परिवहन आयुक्त कार्यालयाने दिले आहेत. त्याचबरोबर राष्ट्रीय महामार्ग व राज्य महामार्गावर वाहन तपासणी मोहीम राबवण्याच्या सूचना कार्यालयातून देण्यात आल्या आहेत.केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय २०१६च्या ताज्या आकडेवारीनुसार, देशातील सर्वाधिक अपघात होणाºया पाच शहरांत महाराष्ट्राचा तिसरा क्रमांक आहे. राज्यात ३९ हजार ८७८ रस्ते अपघातांमध्ये १२ हजार ९३५ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. सर्वोच्च न्यायालय नियुक्त रस्ता सुरक्षा समितीने दिलेल्या आदेशानुसार आॅगस्ट महिन्यातील कारवाई आवश्यक त्या वेगाने झालेली नाही, अशी माहिती परिवहन कार्यालयातून देण्यात आली. यामुळे १८ ते २२ सप्टेंबर या कालावधीत संपूर्ण राज्यात वाहने आणि वाहन चालक यांची तपासणी करण्याचे आदेश राज्य परिवहन आयुक्त कार्यालयातून देण्यात आले आहेत.वाहन चालवताना मोबाइलचा वापर करणे आणि ओव्हर स्पीड वाहन चालवणे यामुळे रस्ते अपघाताच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे अशा कारणांसह अनुज्ञप्ती (लायसन्स) वैधता, विमा प्रमाणपत्र, हेल्मेट न वापरणे, सीटबेल्ट न बांधणे, नियमांनुसार नंबरप्लेट नसणे, मल्टी टोन हॉर्न, दुचाकीवर दोनपेक्षा जास्त प्रवासी बसणे अशा गुन्ह्यांवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.वाहनांवर उत्पादकाने बसविलेले दिवे बदलून प्रखर दिवे बसवणा-यांवरदेखील कारवाईचा बडगा उगारण्यात यावा; त्याचबरोबर राज्यातील राष्ट्रीय व राज्य महामार्गांवर वाहन तपासणी मोहीम राबवावी, अशा सूचना संबंधिताना देण्यात आल्या आहेत.>अपघाती मृत्यूची टॉप पाच राज्येराज्ये अपघातीमृत्यूंची संख्याउत्तर प्रदेश १९,३२०तामिळनाडू १७,२१८महाराष्ट्र १२,९३५कर्नाटक ११,१३३राजस्थान १०,४६५