विधानसभा निवडणूक बॅलेटपेपरवर घ्या : अजित पवार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2019 04:00 PM2019-07-18T16:00:50+5:302019-07-18T16:06:51+5:30
लोकसभेला एकतर्फी निकाल लागल्याने संशय वाढला आहे.
पिंपरी : निवडणुकीतील इव्हीएम मशिनबाबत अनेकांच्या मनात संभ्रम आहे. सगळ्यांची वेगवेगळी मते आहेत. लोकसभेला एकतर्फी निकाल लागल्याने संशय वाढला आहे. मशिनमधील चीप बदलली जावू शकते. प्रगत देशात निवडणूका बलेट पेपरवर होत आहे. त्यामुळे आगामी विधानसभानिवडणूक बॅलेट पेपरवर घ्यावी, अशी मागणी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत केली.
सांगवीतील पत्रकार परिषदेत पवार बोलत होते. पवार म्हणाले, आपले मत ज्याला दिले आहे. त्यालाच झाले आहे का याची मतदाराला माहिती कळणे आवश्यक आहे. बॅलेट पेपरवर मतदान घेतल्यास लोकांचा गैरसमज दूर होईल. त्यासाठी विधानसभा निवडणूक बलेट पेपरवर घेण्यास हरकत नाही.
पवार म्हणाले,
१) लोकसभेच्या पराभवाने खचून न जाता नव्या जोमाने विधानसभा निवडणुकीत जनतेचा जनाधार मिळविणे. जनतेला विश्वास देण्याचे आमचे ठरलं आहे. विधानसभा निवडणूक मोठ्या ताकदीने लढणार आहोत. जागावाटपासंदर्भात काँग्रेस सोबत सकारात्मक चर्चा झाली आहे. सर्व मित्रपक्षांना सोबत घेणार आहोत.
२) निवडणुकीच्या तोंडावर पक्षांतर होत होते. परंतू, आता चौकशाची भीती दाखवून, प्रलोभने दाखवून विरोधी पक्षातील आमदारांना फोडले जात आहे. काहीजण आपले काही खरे नाही, ही शेवटची निवडणूक असल्याचे समजून पक्षांतर करतात. निष्ठेला महत्व दिले जात नाही.
३) भिंती, इमारती पडण्याचा घटना घडत आहेत. नागरिकांचा जीव जात आहे. त्यावर काहीच कारवाई होत नाही. एकमेकांवर चुका ढकलण्याचे काम सुरू आहे. सत्ताधारी याला फोड त्याला फोड, प्रलोभने दाखवून सत्ता मिळविण्यात दंग आहे. आर्थिक स्थिती डबघाईला आली आहे. राज्यावर साडे चार लाख कोटींचा कजार्चा बोजा आहे.