शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका, भाजपाचा CM होण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
2
अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
3
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
4
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
5
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
6
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
7
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
8
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
9
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
10
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
11
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
12
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज
13
शिंदेंनी बंडखोरी केली नसती तर भाजपा सत्तेत आली नसती; महायुतीच्या जुन्या सहकाऱ्याचे वक्तव्य
14
Eknath Shinde, Maharashtra CM Politics : “नापी है मुठ्ठी भर जमीन, अभी सारा आसमान बाकी है...”; एकनाथ शिंदेंनी शायरीतून सांगितला 'फ्युचर प्लॅन'
15
भयंकर! व्लॉगरची हत्या करून २ दिवस मृतदेहासोबत राहिला बॉयफ्रेंड; काय आहे हे संपूर्ण प्रकरण?
16
क्रेडिट कार्डशिवाय एअरपोर्टवर लाउंजचा आनंद घ्या... 'या' डेबिट कार्ड्सद्वारे मिळेल ॲक्सेस 
17
“देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंचा पाठिंबा आहे का?”; भाजपाने केले स्पष्ट
18
महिला आणि पुरुषही का करतात एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर...? सामोर आली दोन कारणं!
19
Maharashtra Politics : मोदी-शाह म्हणतील तसं! जो मुख्यमंत्री ठरवाल, त्याला आमचा पाठिंबा; एकनाथ शिंदेंनी जाहीरच करून टाकलं
20
"...अन्यथा तुम्हाला सरकारी नोकरी गमवावी लागेल", मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय

कर्करोग रुग्णांचा असा करा सांभाळ, टाटा मेमोरिअल देणार प्रशिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 06, 2018 5:04 AM

टाटा मेमोरिअल सेंटरने टाटा इन्स्टिट्यूट आॅफ सोशल सायन्स यांच्या सहकार्याने एक वर्षाचा संपूर्ण वेळ असलेला ‘अ‍ॅडव्हान्स डिप्लोमा इन पेंशट नेव्हीगेशन’ (केइव्हॅट) हा प्रशिक्षण अभ्यासक्रम सुरू करण्याचे ठरविले आहे. रुग्णसेवा क्षेत्रात पहिल्यांदाच कर्करोग रुग्णांची गरज ओळखून या प्रशिक्षण अभ्यासक्रमाचा आराखडा तयार करण्यात आला आहे.

मुंबई  - टाटा मेमोरिअल सेंटरने टाटा इन्स्टिट्यूट आॅफ सोशल सायन्स यांच्या सहकार्याने एक वर्षाचा संपूर्ण वेळ असलेला ‘अ‍ॅडव्हान्स डिप्लोमा इन पेंशट नेव्हीगेशन’ (केइव्हॅट) हा प्रशिक्षण अभ्यासक्रम सुरू करण्याचे ठरविले आहे. रुग्णसेवा क्षेत्रात पहिल्यांदाच कर्करोग रुग्णांची गरज ओळखून या प्रशिक्षण अभ्यासक्रमाचा आराखडा तयार करण्यात आला आहे. या रुग्णांची सेवा कशी करावी, त्यांचा सांभाळ कसा करावा, याचे प्रशिक्षण अभ्यासक्रमाद्वारे देण्यात येणार आहे.टाटा मेमोरिअलच्या वर्धापन दिनी २८ फेब्रुवारी रोजी या प्रशिक्षण अभ्यासक्रमाचे अनावरण करण्यात येणार आहे. या अभ्यासक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे, पहिल्यांदाच या माध्यमातून काळजीवाहकांना (केअरगिव्हर्स) व्यावसायिक पातळीचे प्रशिक्षण देण्यात येईल. आरोग्य सेवा क्षेत्रातील रुग्णांची निदान प्रक्रिया, उपचार पर्याय आणि उपलब्ध स्रोत या सर्व टप्प्यांवरील प्रशिक्षण काळजीवाहकांना देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे, या रुग्णांना पूर्णपणे बरे होण्याच्या प्रक्रियेत समुपदेशन, आर्थिक पाठबळ यासाठीही हे काळजीवाहक मार्गदर्शन करतील.हा अभ्यासक्रम केवळ टाटा मेमोरिअलपुरता मर्यादित नसून या माध्यमातून राष्ट्रीय स्तरावरील ‘पेशंट नेव्हीगेशन प्रोग्राम अ‍ॅप्लिकेशन’ तयार करण्याचा विचार आहे. जेणेकरून या काळजीवाहकांची फळी तयार होऊन देशभरातील रुग्णालये व संस्थांमध्ये कार्यरत होईल. या माध्यमातून रुग्णसेवा क्षेत्रात नवा पायंडा पाडून कर्करोग रुग्णांचे आयुष्य अधिकाधिक सुकर करण्याचा प्रयत्न आहे.- हा प्रशिक्षण अभ्यासक्रम रुग्ण आणि काळजीवाहक यांच्यातील दुवा ठरेल.- राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील तज्ज्ञ, प्राध्यापक प्रशिक्षण देतील.- टाटा मेमोरिअलमध्ये सहा महिन्यांचा इंटर्नशिप कालावधी- अन्य रुग्णालये व संस्थांमध्ये नोकरीसाठी प्रयत्न

टॅग्स :cancerकर्करोगTataटाटाhospitalहॉस्पिटलMumbaiमुंबई