पिंपरी : गेल्या पंधरा दिवसांपासून तापमानाचा पारा मोठ्या प्रमाणात वाढायला सुरुवात झाली असून, सकाळच्या सुमारास उन्हाचे चटके बसत आहेत. पिंपरी-चिंचवड शहराचे तापमान सध्या ३७ अंश सेल्सिअसवर पोहचले असून, एप्रिल व मे महिन्यांत तापमानाचा हा पारा आणखीनच वाढणार आहे. वाढत्या तापमानाचा परिणाम बालकांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वांवरच होत असल्याने उन्हाच्या तीव्र झळांपासून आरोग्याचे संरक्षण करण्यासाठी विविध उपाययोजना करण्याची माहिती शहरातील विविध आरोग्यतज्ज्ञांनी लोकमतशी बोलताना दिली. ... अशी घ्या बालकांची काळजी४सध्या तापमानाचा पारा वाढत असून, वाढत्या तापमानाचा सर्वाधिक परिणाम १ ते ५ वयोगटातील बालकांवर होण्याची शक्यता असते. हिवाळ्यात संसर्गजन्य आजार उद्भवतात असे नसून, उन्हाळ्यातही बालकांमध्ये संसर्गजन्य आजार उद्भवण्याचे प्रमाण जास्त असते. यामध्ये सर्दी-खोकला-ताप येऊन त्यांच्यात झटके येण्याचे प्रमाण वाढते. यासाठी बालकांना सकाळी ११ ते दुपारी ४ पर्यंत बाहेर घेऊन जाऊ नये. गरज असल्यावर घराबाहेर पडताना बालकाच्या डोक्याची, त्वचेची, डोळ्यांची काळजी घ्यावी. ४उघड्यावरील पदार्थ खायला देऊ नयेत. तसेच अति थंडपेयही देऊ नयेत. कारण यामुळे घशाचा त्रास होण्याची शक्यता असते. बाहेरून खेळून आल्यानंतर मुलांना लगेच पाणी देऊ नये. थोड्या विश्रांतीनंतर आधी खायला द्यावे. मगच पिण्यास पाणी द्यावे. ४उन्हाळ्यात बालकांना गोवर-कांजिण्या, कावीळ होण्याची जास्त शक्यता असते. याकरिता आई-वडिलांना डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे लसीकरण करून घ्यावे, अशी माहिती वायसीएम रुग्णालयाच्या बालरोग तज्ज्ञ डॉ. विद्या फडणीस यांनी दिली. पाणी पिताना काळजी घ्यावी४उन्हाळ्यात माणसाला गरज भासते ती सर्वाधिक पाण्याची आणि तहान लागल्यावर माणूस कोणत्याही ठिकानाचे पाणी पितात. मात्र, ते पाणी दूषित असल्यास गॅस्ट्रोएन्ट्रायटिस हा आजार होण्याची दाट शक्यता असते. उन्हाळ्यात याच आजाराचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येतात. या आजाराचे मुख्य लक्षण म्हणजे पोटदुखीचा त्रास आहे. हे टाळण्यासाठी कोणत्याही ठिकाणचे पाणी पिऊ नये. पाणी पिताना काळजी घेतली पाहिजे.४उघड्यावरील अन्नपदार्थांसह उघड्यावरील शीतपेये पिऊ नयेत.जास्त कालावधी झालेले अन्न खाऊ नये. ४घराबाहेर पडताना स्वच्छ पाण्याची बाटली घेऊनच बाहेर पडावे. बाहेरील पाणी पिण्यास शक्यतो टाळावे.४एखादा पदार्थ खाण्यात येऊन पोटदुखीचा त्रास उद्भवल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा, असे आवाहन डॉ. मनोज देशमुख यांनी केले.त्वचेच्या संरक्षणासाठी भरपूर पाणी प्या४कडक उन्हामुळे त्वचेच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. उन्हामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते. पाण्याचे प्रमाण कमी झाल्यामुळे त्याचे त्वचेवर परिणाम होण्याची शक्यता असते. यासाठी शरीरातील पाण्याचे प्रमाण संतुलित राहण्यासाठी भरपूर पाणी प्यायला हवे. ४थंड पदार्थ, तसेच पालेभाज्या खाव्यात.४सकाळी ११ ते सायंकाळी ५ पर्यंत घराबाहेर पडू नये. कामानिमित्त घराबाहेर जायचे असल्यास गॉगल, स्कार्फ, टोपी यांचा वापर करावा. शक्यतो सैल व सुती कपडे वापरावे. दिवसातून दोन वेळा थंड पाण्याने आंघोळ करावी. त्वचेच्या तजेलपणासाठी घरगुती उपाय करावेत. ४त्वचेवर खाज किंवा डाग आदी पडत असल्याचे जाणवल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा, अशी माहिती वायसीएम रुग्णालयाचे त्वचारोगतज्ञ्ज्ञ डॉ. प्रताप जयसिंघानी यांनी दिली.
उन्हाळ्यात घ्या काळजी
By admin | Published: April 06, 2016 1:16 AM