अंबरनाथ : कुटुंबातील महिला ही कुटुंबातील प्रत्येक सदस्याच्या आरोग्याची काळजी घेत असते. मात्र, इतरांची काळजी घेत असताना स्वत:च्या आरोग्याकडे दुर्लक्ष करते. कुटुंबाचे आरोग्य चांगले राखत असताना प्रत्येक महिलेने स्वत:च्या आरोग्याकडेही लक्ष देण्याची गरज आहे, असे मत अभिनेत्री किशोरी शहाणे यांनी व्यक्त केले. अंबरनाथमध्ये नगराध्यक्ष प्रज्ञा बनसोडे आणि रोहित धेंडे यांच्या पुढाकाराने नवरेनगर परिसरात महिलांसाठी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. प्रभागात केलेल्या विविध विकासकामांचा लोकार्पण सोहळा आणि महिलांसाठी विविध स्पर्धा असा दुहेरी कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून अभिनेत्री शहाणे उपस्थित होत्या. महिला नगराध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळत असताना स्वत:च्या प्रभागावर अन्याय होणार नाही, याची काळजी घेणाऱ्या प्रज्ञा बनसोडे यांच्या कार्याची स्तुती केली. या कार्यक्रमाला शेकडो महिलांची उपस्थिती होती. या महिलांसाठी विविध मनोरंजनात्मक कार्यक्रम आयोजित केले होते. पाककला स्पर्धा, लहान मुलांसह महिलांचा मनोरंजन कार्यक्र म, स्वयंरोजगार कोर्सेस पूर्ण केलेल्या महिलांना प्रमाणपत्रवाटप करण्यात आले. पाककला स्पर्धेत ‘पुडाची पातोळी’ बनवणाऱ्या माधुरी संन्यासी व ‘साउथ इंडियन-पायसम’ बनवणाऱ्या श्रीदेवी मामिल्लपल्ली या अव्वल ठरल्या. तर, ‘हरा भरा कबाब’ बनवणाऱ्या संगीता गायकवाड व ‘बीट हलवा’ बनवणाऱ्या प्रेमा पवार यांना द्वितीय क्रमांक देण्यात आला. या कार्यक्र माला आ. डॉ. बालाजी किणीकर, अंबरनाथ शहरप्रमुख अरविंद वाळेकर, नगराध्यक्षा प्रज्ञा बनसोडे, महिला जिल्हा संघटक विजया पोटे, शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप गोडबोले, विजय पवार, नगरसेविका मनीषा वाळेकर, पूनम वारिंगे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
कुटंबासह स्वत:ची काळजी घ्यावी!
By admin | Published: February 14, 2017 2:47 AM