शहरं
Join us  
Trending Stories
1
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
2
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
3
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
4
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
5
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
6
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
7
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
8
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
9
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
10
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
11
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या
12
राहुल गांधी उद्या महाराष्ट्रात; काँग्रेस विधानसभा प्रचाराचे रणशिंग फुंकणार, मविआच्या सभा
13
भयंकर! यूट्यूबवर Video पाहून गर्भवती महिलेचं केलं ऑपरेशन; महिलेचा मृत्यू होताच डॉक्टर फरार
14
मधुरिमाराजेंनी अर्ज घेतला मागे; संभाजीराजे म्हणाले, "तसं घडायला नको होतं, पण..."
15
माहिममध्ये रंगतोय वेगळाच खेळ?; उद्धव ठाकरेंनी अमित ठाकरेंविरोधात उमेदवार दिला, पण आता...
16
"वाटणारे तुम्ही अन् फूट पाडणारेही तुम्हीच..." मुख्यमंत्री योगींच्या विधानावर खरगेंचा पलटवार
17
सरकार संपत्तीच्या वितरणासंदर्भात कायदा करू शकते, पण प्रत्येक खासगी मालमत्तेच्या अधिग्रहणाची परवानगी नाही - SC
18
मिचेल स्टार्कला KKR ने दाखवला बाहेरचा रस्ता; आता ऑस्ट्रेलियन खेळाडूनं दिली धक्कादायक माहिती
19
Saroj Ahire : "माझ्याविरोधात जे काही षडयंत्र रचलं..."; सरोज अहिरे प्रचारादरम्यान झाल्या भावुक
20
अमेरिकेत मतदानही सुरु, सोबत मोजणीही! ट्रम्प-हॅरिसना मिळाली ३-३ मते; सर्व्हेचा अंदाजही धक्कादायक

‘वंदे मातरम्’ला विरोध करणा-यांचा मताधिकार काढून घ्या - उद्धव ठाकरे 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2017 7:37 AM

'वंदे मातरम्'विरोध हा देशविरोधच मानून तसे करणाऱ्यांचा मताधिकार काढून घेणे हाच एक उत्तम पर्याय आहे, अशी भूमिका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयमधून मांडली आहे.

मुंबई, दि.21 - 'वंदे मातरम्'विरोध हा देशविरोधच मानून तसे करणाऱ्यांचा मताधिकार काढून घेणे हाच एक उत्तम पर्याय आहे, अशी भूमिका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयमधून मांडली आहे.  औरंगाबाद महापालिकेत 'वंदे मातरम्'वरुन झालेल्या गोंधळावर टीकास्त्र सोडत उद्धव यांनी ही भूमिका मांडली आहे.    ‘वंदे मातरम्’च्या विरोधकांना वठणीवर आणण्यासाठी कठोर धोरण अवलंबवावे लागेल, असेही ते म्हणालेत. औरंगाबाद महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत शनिवारी (19 ऑगस्ट) वंदे मातरम् म्हणण्यावरुन राडा झाला होता. वंदे मातरम् सुरू असताना एमआयएम व काँग्रेसचे नगरसेवक बसूनच होते. यावरुन शिवसेना-भाजपाचे नगरसेवक आक्रमक झाले होते. दरम्यान या प्रकरणी एमआयएम-काँग्रेसच्या मिळून तीन नगरसेवकांचे एका दिवसासाठी निलंबनही करण्यात आले होते.

काय आहे आजचे सामना संपादकीय ?‘वंदे मातरम्’वरून हिंदुस्थानात रोजच राडा व्हावा हे आजच्या राज्यकर्त्यांना लांच्छन आहे. मुंबई महापालिकेनंतर हे लोक संभाजीनगरात पोहोचले आहेत. ‘वंदे मातरम्’ हे राष्ट्रगान सुरू असताना ‘ओवेसी’च्या ‘एमआयएम’चे नगरसेवक बसून राहिले. शेख जफर, सय्यद मतीन, शेख समीना असे हे तीन नगरसेवक ‘वंदे मातरम्’चा अवमान करीत असताना सभागृहातील शिवसेना नगरसेवकांच्या संतापाचा स्फोट झाला व त्यांनी या ‘वंदे मातरम्’ विरोधकांना झोडपून काढले. सभागृहात अशा हाणामाऱ्या होऊ नयेत, तिथे शहराच्या व लोकांच्या प्रश्नांवर चर्चा घडावी या मतांचे आम्ही असलो तरी ‘वंदे मातरम्’सारख्या राष्ट्रीय प्रश्नांवर काही नतद्रष्टांना अवदसा सुचते त्याला शिवसेना काय करणार? ‘वंदे मातरम्’ हा मुसलमान समाजासाठी म्हणे ‘धार्मिक’ विषय बनला आहे. मातृभूमीला वंदन हे त्यांच्या इस्लाममध्ये बसत नाही. अल्ला सोडून हे लोक दुसऱ्या कुणापुढे झुकत नाहीत, असे त्यांच्या डोक्यात ठासून भरले आहे. या अनाडी अंधश्रद्धेतून बाहेर पडल्याशिवाय मुसलमानांचा विकास होणार नाही. मुसलमानांचे काही ‘पावलीकम’ पुढारी आजही त्याच अंधश्रद्धेच्या चिखलात त्या समाजाला ढकलत असतील तर हे लोक इस्लामचे मारेकरी आहेत व

अशा लोकांमुळेच इस्लाम खतऱ्यातआला आहे, त्यांचे डोके सडले आहे व रक्त नासले आहे. ज्या देशात आपण राहतो, खातो, पितो, श्वास घेतो, ज्या मातीत जन्म घेतो त्या मातीशी इमान राखण्यात कसला आलाय इस्लामद्रोह? नमाज पढताना डोके जमिनीवर ठेवता ना? मग मातृभूमीपुढे झुकणार नसल्याची भाषा का सुरू आहे? ‘‘वंदे मातरम्’ बोलणार नाही, देशातून धक्के मारून बाहेर काढले तरी चालेल’’ ही मस्तवाल भाषा बोलणारे लोकच मुसलमानांचे वैरी बनले आहेत. ज्या दिवशी समस्त मुसलमान समाज या टिनपाट पुढाऱ्यांचा त्याग करून मोकळा श्वास घेईल त्या दिवशी त्यांच्या उत्कर्षाचे दरवाजे खऱ्या अर्थाने उघडले जातील. संभाजीनगरात आजही औरंगजेबाची पिलावळ वळवळत असते व धर्मांधतेचे फूत्कार सोडत असते. त्यांना वेळीच ठेचण्याची जबाबदारी सरकारची आहे. संभाजीनगर महापालिकेतील या पिलावळीला ठेचण्याचे काम शिवसेनेच्या नगरसेवकांनी केले. या राष्ट्रकार्यास तेथील भाजपच्या नगरसेवकांनीही हातभार लावला हे चांगलेच झाले. आम्ही त्यासाठी त्यांचे कौतुकच करतो. मात्र ‘वंदे मातरम्’च्या विरोधकांना वठणीवर आणण्यासाठी आता याहीपेक्षा कठोर धोरण अवलंबवावे लागेल. कथित गोरक्षकांच्या बाबतीत जी भूमिका पंतप्रधान मोदी यांनी घेतली आहे

तशीच कठोर भूमिका‘वंदे मातरम्’ला विरोध करून धर्मांध फूत्कार सोडणाऱ्यांविरुद्ध घ्यावी लागणार आहे. सध्या गोरक्षकांनी देशात उच्छाद मांडला आहे. पंतप्रधान मोदी यांनी या गोरक्षकांची चांगलीच चंपी केली आहे, पण ‘वंदे मातरम्’वरून सध्या होत असलेल्या राडय़ांबाबतही तोंडे बंद ठेवता येणार नाहीत. ‘‘गोरक्षकांची हिंसा खपवून घेतली जाणार नाही,’’ असे बजावणाऱ्यांनी ‘‘वंदे मातरम्’चा अवमानही सहन करणार नाही, ‘वंदे मातरम्’ म्हणावेच लागेल’’ असे ठणकावले पाहिजे. मात्र गोरक्षकांच्या हिंसेइतकाच ‘वंदे मातरम्’ विरोध हादेखील चिंतेचा विषय आहे असे भाजप राज्यकर्त्यांना वाटत नाही. ‘वंदे मातरम्’बाबत कठोर कायदा करा असे आम्हाला सांगावे लागते हेसुद्धा दुर्दैवच! राष्ट्रगान कायद्याने सक्तीचे करा असे ज्या देशात सांगावे लागते त्या देशाने स्वतःचा खड्डा स्वतःच खणायला सुरुवात केली आहे असेच म्हणावे लागेल. ‘वंदे मातरम्’विरोध हा देशविरोधच मानून तसे करणाऱ्यांचा मताधिकार काढून घेणे हाच एक उत्तम पर्याय आहे. हिंदुत्वाचा प्रचार केला म्हणून शिवसेनाप्रमुखांचा मताधिकार काढून घेणारी येथील न्यायालये व हा देश आहे. जर हिंदुत्वाचा प्रचार हा गुन्हा तर मग ‘वंदे मातरम्’ विरोध हा त्याच तोलामोलाचा, किंबहुना जास्तच गंभीर गुन्हा आहे. काढून घ्या त्यांचा मताधिकार. बोला, करताय हे धाडस?

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेVande Mataramवंदे मातरम