शहरं
Join us  
Trending Stories
1
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
2
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
3
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
4
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
5
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
6
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
7
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
8
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
9
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
10
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
11
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
12
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
13
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
14
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
15
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
16
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
17
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
18
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
19
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
20
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला

मेहतांचा राजीनामा घ्या, मुख्यमंत्र्यांवर दबाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 04, 2017 4:24 AM

गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांच्या राजीनाम्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर दोन्ही बाजूंनी दबाव वाढत चालला आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीने राजीनाम्यासाठी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज रोखून धरले आहे.

अतुल कुलकर्णी ।मुंबई : गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांच्या राजीनाम्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर दोन्ही बाजूंनी दबाव वाढत चालला आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीने राजीनाम्यासाठी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज रोखून धरले आहे. तर मेहतांचा राजीनामा घेऊ नका, असे सांगत भाजपातील काही नेत्यांनी मुख्यमंत्र्यांवर दबाव टाकणे सुरू केले आहे.विरोधकांचे कामच राजीनामे मागण्याचे असते. या दबावाला बळी पडू लागलो तर काम करणे कठीण होऊन जाईल. खडसेंचा राजीनामा घेतल्याने बहुजन समाजात भाजपाबद्दल चुकीची प्रतिमा निर्माण झाली. आता मेहतांचा राजीनामा घेतला तर गुजराती समाजही नाराज होईल, असे पक्षातील ज्येष्ठ मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितल्याचे कळते. राज्यात भाजपाची अवस्था अत्यंत नगण्य होती त्या काळात पक्ष वाढविण्यासाठी ज्या नेत्यांनी प्रयत्न केले त्यात मेहता व खडसे यांच्यासारखे नेते होते. त्यांनाच खड्यासारखे वेचून बाजूला केले जाणार असेल आणि काँग्रेस, राष्ट्रवादीतून स्वत:च्या स्वार्थासाठी भाजपात येणाºयांना डोक्यावर घेणार असू तर अशाने पक्ष वाढणार नाही. उलट निवडणुका आल्या तर आज पक्षात येणारे आपल्यासोबत राहतील याची खात्री कोण देणार, असा सवालही ज्येष्ठ नेत्याने केला.विरोधात असताना पाच वर्षे पक्ष कोणी दिलेल्या ‘आॅक्सिजन’वर चालला, त्या वेळी खर्च करताना कोणाला भ्रष्टाचार दिसला नाही का? पक्ष वाढवणारे जुने लोक नको असतील तर तसे पक्षाने सांगून टाकावे, असा संतप्त सवालही मेहता समर्थक आमदारांनी केला आहे.मेहतांबाबतची लढाई मोदी व शहा या दोन गटांतील असल्याचे सांगत राष्ट्रवादीचे गटनेते जयंत पाटील यांनी भाजपातील वादात तेल ओतण्याचे काम केले आहे. मुख्यमंत्री फडणवीस हे मोदी गटाचे तर चंद्रकांत पाटील हे अमित शहा गटाचे मानले जातात. मेहता हे अमित शहांच्या जवळचे आहेत म्हणून त्यांच्याविरोधात बोललेले सहन न झाल्याने चंद्रकांत पाटील यांनी सभात्याग केल्याचा आरोप पाटील यांनी केला आहे.सभापतींनी सोडविला पेच-सत्ताधारी पक्षांनीच विधान परिषदेच्या कामकाजावर बहिष्कार टाकत सभात्याग केल्याने निर्माण झालेली कोंडी सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या मध्यस्थीने फुटली. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत विरोधी पक्षनेते व गटनेत्यांची आपल्या दालनात बैठक घेत सभापतींनी सभागृहातील पेच सोडविला.मोपलवार यांना पदावरून दूर करण्याची घोषणा झाल्याने विरोधक उत्साहित झाले. मेहता व मोपलवार प्रकरण काढल्याबद्दल अनेक आमदारांनी पृथ्वीराज चव्हाण, अजित पवार यांना भेटून आनंद व्यक्त केला.मदन येरावार यांचे नाव चर्चेत-‘प्रकाश मेहता हटाव’ मोहिमेला पडद्याआड गती आली आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या विरोधात जाण्याची ताकद राज्यातील एकाही मंत्र्यामध्ये नाही. त्यामुळे मेहता यांना दूर करायचे आणि मुख्यमंत्र्यांच्या विश्वासातील राज्यमंत्री मदन येरावार यांना बढती देऊन त्यांना गृहनिर्माणमंत्री करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. विरोधकांचे दबाव तंत्र किती काम करते यावरही बºयाच गोष्टी अवलंबून आहेत.