शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
2
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
3
"शिवसेनेत बसलेल्या सासूमध्ये प्रॉब्लेम"; शेवटच्या सभेत राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
4
मणिपूरबाबत केंद्राचा मोठा निर्णय; सीएपीएफच्या ५० तुकड्या पाठविणार
5
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
6
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
7
यशाच्या शिखरावर असताना लग्न का केलं? माधुरी दीक्षित म्हणाली, "मी माझं स्वप्न..."
8
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
9
ईडी-सीबीआयच्या दबावाखाली पक्ष बदलला नाही - कैलाश गेहलोत
10
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
11
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
12
₹२२० प्रीमिअमवर पोहोचला 'हा' IPO, लिस्टिंगवर होऊ शकतो ९८ टक्क्यांचा नफा; कधी करता येईल गुंतवणूक?
13
Maharashtra Vidhan Sabha 2024: सर्वांत तरुण उमेदवार कोणत्या पक्षाचे?
14
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!
15
भाजपा नेत्यांच्या या दहा घोषणांनी बदलली प्रचाराची दिशा, निकालात ठरू शकतात निर्णायक
16
भारतात गेलेलो तेव्हा डोक्यात किडा घुसला; अमेरिकेच्या नव्या आरोग्य मंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य चर्चेत
17
"काँग्रेसची सत्ता असलेल्या कर्नाटकात सोयाबीनला केवळ ३,८०० रुपयांचा भाव’’; भाजपा खासदाराने दाखवला आरसा
18
एक Home Loan घेतल्यानंतर दुसरं होम लोन घेता येतं का? जाणून घ्या काय आहे दुसऱ्या लोनची प्रोसस
19
कैलाश गेहलोत भाजपमध्ये सामील, दिल्ली निवडणुकीपूर्वी अरविंद केजरीवालांना मोठा झटका
20
Gold-Silver Rates Today : लग्नसराईच्या काळात सोन्या-चांदीच्या किंमतीत मोठा बदल, स्वस्त झालं की महाग? पटापट चेक करा 14 ते 24 कॅरेट सोन्याचा लेटेस्ट रेट

मीरा-भार्इंदरपर्यंत मेट्रो रेल्वे नेणार

By admin | Published: March 30, 2017 4:41 AM

वसई-मीराभार्इंदर असा जलवाहतूक प्रकल्प उभारण्यात येईल, मुंबईतील मेट्रो रेल्वे प्रकल्पाचा विस्तार दक्षिणेकडे

मुंबई : वसई-मीराभार्इंदर असा जलवाहतूक प्रकल्प उभारण्यात येईल, मुंबईतील मेट्रो रेल्वे प्रकल्पाचा विस्तार दक्षिणेकडे विमानतळापर्यंत तर उत्तरेकडे मीरा-भार्इंदरपर्यंत करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणीवस यांनी आज विधानसभेत जाहीर केले. मुंबईत मेट्रोचे मेट्रो ३, २ अ, २ ब, ४, ७ हे प्रकल्प सुरू आहेत. १७२ किमीपर्यंत प्रस्तावित असलेल्या मेट्रोचा विस्तार २०० किमीपर्यंत होणार आहे. मेट्रो प्रकल्पामध्ये डीएनएनगर ते दहिसर ही मेट्रो २ आहे आणि अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व ही मेट्रो ७ आहे. या मार्गाला दक्षिण बाजूकडे विमानतळापर्यंत तर उत्तर बाजूकडे मीराभार्इंदरपर्यंत नेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कुलाबा-सिप्झ मेट्रो ३ आणि डीएननगर ते मंडाले मेट्रो २ ब, वडाळा-घाटकोपर कासरवडवली मेट्रो ४, ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो ५, स्वामी समर्थनगर - विक्रोळी मेट्रो ६ या सगळ्यांचं इंटिग्रेशन मेट्रो प्रकल्पाशी झाले असून यामुळे शहरातील कोणत्याही भागापासून कोणत्याही भागापर्यंत पोहोचणे सहज शक्य होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मुंबई मेट्रो भाग २ दहिसर पूर्व डीएनएनगर १८.५० किमी लांबीच्या मार्गिकेच्या प्रकल्पासाठी ६४१० कोटी रुपयांचा खर्च प्रस्तावित आहे. रेल्वे लाइन ७ अंधेरी पूर्व - दहिसर पूर्व १६.५० किमीच्या प्रकल्पासाठी ६२०८ कोटींचा खर्च प्रस्तावित आहे. हे दोन्ही प्रकल्प २०१९ पर्यंत पूर्ण होणार आहेत. मेट्रो २ ब डीएननगर-वांद्रे-मानखुर्द-मंडाले या २३ किमीच्या लांबीच्या प्रकल्प १०,९८६ कोटी रुपये तर मेट्रो मार्ग ४ वडाळा-मुलुंड-ठाणे-कासारवडवली ३२ किमीच्या प्रकल्पाची प्रस्तावित किंमत १४ हजार ५४९ कोटी रुपये आहे. दोन्ही प्रकल्पांचे भूमिपूजन झाले असून निविदाप्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याचे ते म्हणाले. (विशेष प्रतिनिधी) मुख्यमंत्र्यांनी अनुभवला होता लोकलचा प्रवासमीरा रोडवरून आपणही एकदा लोकलने मुंबईत आलो होतो, अशी आठवण मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितली. ते म्हणाले की, सकाळी साडेआठच्या सुमारास मी मीरारोडला होतो. लोकल आल्यानंतर स्टेशनवरील सुमारे तीन हजार प्रवासी ती प्लॅटफॉर्मवर यायच्या आतच लोकलमध्ये घुसले. मी देखील कसाबसा आत शिरकाव केला. दादर येईपर्यंत मला हात देखील खाली करता आला नाही. स्वत:च्या हाताला खाज आली तर स्वत:चा हात देखील खाजवू शकत नव्हतो इतकी गर्दी होती. मुख्यमंत्र्यांच्या या अनुभवकथनाने सभागृहात हशा पिकला.