नांदेड : मुख्यमंत्र्यांनी आदेश देऊन सुद्धा मंत्री मंत्रालयामध्ये बसत नाहीत, त्यासाठी आधी मंत्रिमंडळाची पटपडताळणी करा, मंत्र्यांची सेल्फी घ्या, अशी टीका माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा़ अशोक चव्हाण यांनी शुक्रवारी येथे केली़शिक्षण खात्याने विद्यार्थ्यांच्या उपस्थितीसंदर्भात शिक्षकांनी सेल्फी घेण्याचा आदेश जारी केला आहे़ त्यावर बोलताना खा़ अशोक चव्हाण म्हणाले, शाळांमध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढली पाहिजे, याबद्दल दुमत नाही़ उलट काँग्रेसच्या सत्ताकाळातच पटपडताळणीबाबत कठोर निर्णय घेतले गेले़ त्याच्या अंमलबजावणीचा नांदेडने पॅटर्न निर्माण केला़ शाळांमधील उपस्थिती वाढली़ आता मात्र विद्यार्थ्यांच्या उपस्थितीसाठी सेल्फीचा निर्णय घेणे, हे हास्यास्पद व धक्कादायक आहे़ शैक्षणिक दर्जा सुधारला पाहिजे, विद्यार्थ्यांना सुविधा मिळाल्या तरच शाळांमधील उपस्थिती वाढेल, असे त्यांनी सांगितले. शिक्षण खात्याने शाळांची अचानक तपासणी करावी़ तसेच कठोरपणे अन्य योग्य मार्ग अवलंबावेत, असेही खा़चव्हाण म्हणाले़ (प्रतिनिधी)
‘मंत्र्यांची पटपडताळणी करा अन् सेल्फी घ्या’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 05, 2016 4:22 AM