शहरं
Join us  
Trending Stories
1
यूएनच्या सरचिटणिसांना इस्रायलमध्ये प्रवेशबंदी; इराणला योग्य वेळी प्रत्युत्तर देण्याची इस्रायलची धमकी
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक व व्यावसायिक दृष्टिकोनांतून आजचा दिवस लाभदायी
3
बदलापूर बलात्कार प्रकरणात मोठी कारवाई, त्या शाळेच्या दोन फरार पदाधिकाऱ्यांना अखेर अटक
4
मविआतील लहान घटक पक्षांना हव्यात ४० जागा; प्रस्तावावर ७ आणि ८ ऑक्टोबरला पुन्हा चर्चा
5
अजित पवार गटाला हव्यात महायुतीतील ६५ ते ६८ जागा; अमित शाह यांच्याकडे आग्रही मागणी
6
मुलगी जर दिसायला चांगली असेल तर... अजित पवार समर्थक आमदार देवेंद्र भुयार यांचे सभेत वादग्रस्त विधान
7
स्वस्त पेट्राेल-डिझेल आता विसरा; युद्धाचे ढग; कच्च्या तेलाचे दर वाढले
8
मुंबईकर सरफराझ खानचे ऐतिहासिक नाबाद द्विशतक
9
माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांचे निधन
10
नाेकऱ्या अन् पगारवाढही! पण, उत्पादन क्षेत्रातील वाढ नीचांकावर
11
मराठीला अभिजात दर्जासाठी अवघ्या 26 आमदारांनीच दाखविला रस
12
मानवरहित सौर ऊर्जा बोटीद्वारे कचरा संकलन; समुद्र होणार चकाचक
13
आहारामुळे विद्यार्थ्यांची आबाळ; शिक्षणमंत्री मध्यरात्री आले; झोपलेल्या मुलांना उठवून गेले
14
‘एमएमआरडीएचे अधिकारी संवेदनशील का नाहीत?’ आयुक्तांनी उपस्थित राहून स्पष्टीकरण द्यावे
15
देहविक्रयासाठी थायलंडच्या मुलीचा पाच हजारांत सौदा; ठाण्यात चौघांना अटक
16
लोकसभेत महायुतीने भिवंडीत ‘सिंह’ गमावला आता गड राखण्याचे आव्हान
17
“अमित शाह यांना दररोज नमस्कार केला पाहिजे”; चंद्रकांत पाटील यांनी सांगितले कारण
18
Video: जपानच्या विमानतळावर अमेरिकन बॉम्बचा अचानक स्फोट, ८७ विमान उड्डाणे रद्द
19
X युजर्सना यापुढे 'ही' सुविधा मिळणार नाही; इलॉन मस्क यांनी केली घोषणा, काय बदलले? पाहा...
20
Harbhajan Singh, IPL 2025 Auction: ना विराट, ना रोहित... 'या' भारतीयावर IPLमध्ये लागेल ३०-३५ कोटींची बोली; भज्जीचा मोठा दावा

कल्याण ग्रोथ सेंटरसाठी प्रीमिअरची जागा घ्या

By admin | Published: May 21, 2016 3:35 AM

: कल्याण ग्रोथ सेंटर म्हणजे नक्की काय, हे आधी सांगा आणि मगच ते विकसित करा.

कल्याण : कल्याण ग्रोथ सेंटर म्हणजे नक्की काय, हे आधी सांगा आणि मगच ते विकसित करा. ग्रोथ सेंटरला मनसेचा विरोध नाही. ग्रोथ सेंटरसाठी १० गावांतील गावकऱ्यांच्या जागा घेण्याऐवजी बंद पडलेल्या प्रीमिअर कंपनीच्या जागेवर ग्रोथ सेंटर विकसित करावे, अशी मागणी शुक्रवारी मनसेने केली.मनसेचे विरोधी पक्षनेते प्रकाश भोईर व गटनेते मंदार हळबे यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवले आहे. १० गावांत ग्रोथ सेंटरसाठी १०८९ हेक्टर जागेपैकी पहिल्या टप्प्यात ३३० हेक्टर विकसित केले जाणार आहे. पण, ग्रोथ सेंटर म्हणजे नक्की काय, हे १० गावांना अद्याप समजलेले नाही. ग्रामस्थांमध्ये संभ्रमावस्था आहे. ग्रोथ सेंटरसाठी एक हजार ८९ कोटी रुपयांचा निधी मुख्यमंत्र्यांनी घोषित केला आहे. त्याची तरतूद राज्याच्या अर्थसंकल्पात केली आहे का, ग्रोथ सेंटरमुळे गावकऱ्यांचे जीवनमान उंचावणार आहे का, त्यांना खरोखरच रोजगार मिळणार आहे का, मल्टीनॅशनल कंपन्या आणि सेवाक्षेत्रातील कंपन्यांत भूमिपुत्रांना सामावून घेतले जाणार आहे का, हे सेंटर व्यवसायाभिमुख नसेल तर त्याचा स्थानिकांना काय उपयोग होणार, असे प्रश्न त्यांनी विचारले आहेत. (प्रतिनिधी) ।बाधितांना रेडी रेकनरच्या चार पट मोबदला द्यामुख्यमंत्र्यांनी ग्रोथ सेंटरच्या माध्यमातून एक लाख हातांना रोजगार देण्याचे घोषित केले होते. ग्रोथ सेंटरसाठी १० गावकऱ्यांच्या जागा घेण्याऐवजी २७ गावांच्या कार्यक्षेत्रातील बंद पडलेल्या प्रीमिअर कंपनीची जागा घेऊन तेथे ग्रोथ सेंटर उभे करावे आणि ग्रोथ सेंटरच्या मॉडेलचा नमुना दाखवावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.ग्रोथ सेंटरमध्ये बाधित होणाऱ्या १०० मीटरच्या रस्त्यासाठी प्रकल्पग्रस्तांना प्रकल्पात ५० टक्के भूखंड देण्यात यावा, बाधितांना रेडी रेकनरच्या दराच्या चार पट मोबदला मिळावा, गावांसाठी एमएमआरडीएने विशेष निधी द्यावा, अशा मागण्याही भोईर, हळबे यांनी पत्रात केल्या आहेत. एमएमआरडीएचे कार्यालय या १० गावांच्या हद्दीत असावे. गुरचरण जागांचाही मोबदला देण्यात यावा, असे त्यांनी सुचवले आहे.