मुंबई : पालघर जिल्ह्यातील जव्हार, मोखाडा, वाडा व विक्रमगड तालुक्यातील 0 ते ५ वर्षे वयोगटापर्यंतच्या सर्व बालकांचे १७ ते २१ सप्टेंबर या कालावधीत तातडीने पुन:सर्वेक्षण पूर्ण करावे, अशा सूचना आदिवासी विकासमंत्री विष्णू सवरा यांनी जिल्हा प्रशासनास दिल्या.आवश्यकतेनुसार इतर तालुक्यातील अथवा जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकारी व तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी यांच्या सेवा घ्याव्यात. २२ ते २५ सप्टेंबर कालावधीत सर्व मुलांची वैद्यकीय तपासणी संबंधित उपकेंद्रावर करण्यात यावी. तपासणीनंतर कुपोषित बालकांना आवश्यकतेप्रमाणे व्ही.सी.डी.सी., सी.टी.सी. किंवा एन.आर.सी.मध्ये दाखल करुन वैद्यकीय उपचार उपलब्ध करुन द्यावे. सर्व मोहिमेचे नियोजन जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हा शल्य चिकित्सक आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी (बालकल्याण) यांनी करावे, असेही सवरा यांनी सांगितले. (विशेष प्रतिनिधी)>पालघर जिल्ह्यातील कुपोषण रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांबाबत आढावा घेण्यात आला. सवरा म्हणाले, संबंधित तालुक्यात पुन:सर्वेक्षण करु न तीव्र व अतीतीव्र कुपोषित मुलांची यादी अद्ययावत करण्यात यावी. ही यादी प्रत्येक दिवशी अंगणवाडी पर्यवेक्षिकांनी आपल्या कार्यक्षेत्रातील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी यांना उपलब्ध करुन द्यावी. जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हा शल्य चिकित्सक यांनी यादीतील मुलांच्या १00 टक्के तपासणीचे उपकेंद्रनिहाय नियोजन करावे.
पालघरच्या बालकांचे पुन:सर्वेक्षण करा
By admin | Published: September 18, 2016 4:26 AM