मुंबई : अॅट्रॉसिटीच्या कायद्यावरून उलटसुलट चर्चा होत असताना त्यावर चर्चा करण्यासाठी राज्य विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलवावे, अशी मागणी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी केली. तसेच, अॅट्रॉसिटीबद्दलची भूमिका शरद पवार यांनी स्पष्ट करावी, असे आवाहनदेखील केले.महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, मुंबईतील काँग्रेसच्या आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. गुरुदास कामत यांचे निकटवर्ती माजी नगरसेवक बबलू बारुदगर यांचाही त्यात समावेश होता. ठाकरे म्हणाले की, पवार यांना दलित व मराठा दोन्ही समाजांना जवळ ठेवायचे आहे. त्यांचे राजकारण मराठा समाजाला कळते. अॅट्रॉसिटीचा गैरवापर झाला असे पवार म्हणतात, मग राज्यात सगळ्यात जास्त काळ सरकार आघाडीचेच होते. त्यांनी अन्याय केला असे म्हणायचे आहे का? (विशेष प्रतिनिधी)पोलीस विलास शिंदे मारले गेले याबद्दल पवार काहीही का बोलत नाहीत? राज्याला स्वतंत्र गृहमंत्री असण्याची गरज आहे. मुख्यमंत्री सक्षम आहेत, पण त्यांना अधिक व्याप आहे, असे मत त्यांनी एका प्रश्नात व्यक्त केले. मराठा समाजाचे आज मोठमोठे मोर्चे निघत आहेत. त्यांचा उद्रेक होण्याआधी या समाजाची भावना सरकारने समजून घेतली पाहिजे. अॅट्रॉसिटीबद्दल बरीच उलटसुलट चर्चा सुरू आहे. जातीय तणाव वाढू नये अशी आमची भूमिका आहे. या कायद्याचा आढावा घेतला पाहिजे; पण सर्वांनी आपली भूमिका स्पष्ट करायला हवी. - उद्धव ठाकरे
‘अॅट्रॉसिटी’ चर्चेसाठी विशेष अधिवेशन घ्या
By admin | Published: September 04, 2016 3:40 AM