पुणो : शहराला पाणीपुरवठा करणा:या धरणांच्या पाणलोट क्षेत्रत चांगला पाऊस सुरू झाला असला, तरी पुढील पावसाबाबत अनिश्चितता असल्याने शहरात सुरू असलेली दिवसाआड पाणीकपात आणखी काही दिवस कायम ठेवावी, अशी विनंती महापालिका आयुक्त विकास देशमुख यांनी आज महापालिकेच्या मुख्य सभेत केली. दिवसाआड पाणीपुरवठय़ामुळे जलवहिन्यांमध्ये हवा भरली जात असल्याने शहराच्या मध्यवर्ती भागातील पेठांमध्ये नागरिकांना तीन तीन दिवस पाणी मिळत नसल्याने दिवसाआड पाणीकपात रद्द करून शहरात एक वेळ पाणी द्यावे, अशी मागणी भाजपा-सेनेसह काँग्रेसच्या नगरसेवकांनी केली, तसेच याबाबत आज निर्णय न घेतल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला.
शहराला पाणीपुरवठा करणा:या धरणांच्या पाणलोट क्षेत्रत कमी पाणीसाठा असल्याने महापालिकेने 11 जुलैपासून शहरात दिवसाआड पाणीकपात सुरू केली आहे. मात्र, या कपातीचा फटका जलवाहिन्यांच्या शेवटच्या भागात नळजोड असलेल्या नागरिकांना बसत आहे. त्यातही प्रामुख्याने पर्वती जलकेंद्रावर पाणीपुरवठा असलेल्या पेठांच्या परिसरात जलवाहिनीत हवा भरल्याने नागरिकांना तीन तीन दिवस पाणीच मिळत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे नागरिकांकडून टँकरची मागणी करण्यात आल्यानंतर पालिकेकडून टँकरही पाठविले जात नसल्याचे चित्र आहे. यामुळे संतापलेल्या काँग्रेस आणि भाजपाच्या नगरसेवकांनी प्रशासनास चांगलेच धारेवर धरले. दिवसाआड कपात लागू केल्यानंतर धरणांमध्ये सुमारे 1.1क् टीएमसी पाणी होते. आता हा साठा सहा टीएमसीवर पोहोचला आहे. हे पाणी एक वेळ पाणी देण्यात आल्यानंतरही शहरास सहा महिने पुरेल, एवढे असल्याने तत्काळ ही कपात मागे घ्यावी, अशी मागणी काँग्रेस, भाजपा व शिवसेनेच्या नगरसेवकांनी केली, तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसेच्या नगरसेवकांनी, तसेच रिपब्लिकन पक्षाच्या नगरसेवकांनी आणखी काही दिवस वाट पाहून हा निर्णय घ्यावा, अशी मागणी केली. तर दिवसातून एकदा पाणी द्यावे, पण त्याची वेळ कमी करावी, अशी मागणीही या वेळी करण्यात आली. यावरून सभागृहात चांगलाच गदारोळ झाला. मात्र, पाण्याची स्थिती बिकट असल्याची बाब निदर्शनास आणून देत आयुक्त विकास देशमुख यांनी एक वेळ पाणी देण्याच्या निर्णयासाठी आणखी काही दिवस वाट पाहावी, अशी विनंती सभागृहास केली. (प्रतिनिधी)
पाणीस्थिती बिकटच - आयुक्त
शहराला पाणीपुरवठा करणा:या धरणांच्या पाणीसाठय़ात वाढ होत असली, तरी अद्यापर्पयत एकाही धरणात जोराचा पाऊस झाला नसल्याचे सांगत पाण्याची स्थिती बिकट असल्याचे आयुक्त देशमुख यांनी या वेळी सांगितले. नागरिकांना पाण्यासाठी होणा:या मनस्तापामुळे सदस्यांच्या भावना तीव्र आहेत. त्या आपण समजू शकतो.
पण पावसाची स्थिती आणि वेधशाळेने पुढे वर्तविलेले अंदाज पाहता धरणांच्या पाणलोट क्षेत्रत या वर्षी 25 टक्के कमी पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यामुळे धरणो जेमतेमच भरतील. या वर्षी धरणामधून पाण्याचा ओव्हरफ्लो होणार नाही.
त्यामुळे धरणात आणखी पाणी वाढल्यानंतरच कपात कमी करणो सयुक्तिक होईल. मात्र, घाईघाईने कोणताही निर्णय न घेता, प्रशासनास वेळ द्यावा, तसेच आणखी काही दिवस वाट पाहावी यासाठी आपण सभागृहास नम्र विनंती करतो, असे देशमुख या वेळी म्हणाले.
दिवसातून चारऐवजी दोन तासांचा प्रस्ताव
दिवसाआड पाण्यामुळे समस्या निर्माण होत असल्याने प्रशासनाने पूर्वीप्रमाणोच एक वेळ पाणी देताना, चार तासांऐवजी दोनच तास पाणी द्यावे, पण दररोज द्यावे, अशी मागणी विरोधी पक्षनेते अरविंद शिंदे यांनी सभागृहात केली. त्यासाठी प्रशासनाने 8क्क् एमएलडीऐवजी 9क्क् ते 95क् एमएलडी पाणी दररोज घ्यावे, असे ते म्हणाले. मात्र, जलवाहिन्यांमधील सदोषामुळे हे शक्य नसल्याचे आयुक्तांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. मात्र, नगरसेवकांनी काही वेळ दिल्यास या प्रस्तावाची प्रत्यक्ष तांत्रिक चाचपणी करून ते शक्य आहे, हे पाण्याचे आश्वासन देशमुख यांनी सभागृहास दिले. याबाबत येत्या दोन दिवसांत तपासणी शक्य असल्यास हा निर्णय घेऊ, असेही देशमुख म्हणाले.
1क् टीएमसी साठा झाल्यावर निर्णय घेणार
आयुक्त देशमुख यांनी खुलासा केल्यानंतरही काँग्रेस तसेच भाजपा-सेनेच्या नगरसेवकांनी कपात रद्द करण्याबाबत आयुक्तांनी ठोस मुदत जाहीर करण्याची मागणी केली. या वेळी आयुक्तांनी धरणांमध्ये 1क् टीएमसी पाणीसाठा आल्यानंतर पाटबंधारे विभाग, तसेच जिल्हा प्रशासनाशी चर्चा करून निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. तसेच, ज्या भागात टँकरची गरज असेल, तेथे स्वतंत्र सोय करण्याचे आश्वासन
दिले. तर सभागृहनेते सुभाष जगताप यांनी एक वेळ पाण्याबाबत
निर्णय घेण्यासाठी नगरसेवकांच्या वतीने प्रशासनास चार दिवसांची
मुदत दिली.