शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: अनेक मतदारसंघांमध्ये उलथापालथ; या क्षणाला कोणी घेतली आघाडी? सर्व अपडेट्स
2
बीडमधून मोठी अपडेट; परळी विधानसभेत धनंजय मुंडे पहिल्या फेरीत आघाडीवर!
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : ३५ मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी थेट लढत; कोण मारणार बाजी?
4
माहीममधून मोठी बातमी! अमित ठाकरेंची आघाडी, सदा सरवणकर पिछाडीवर
5
Maharashtra Assembly Election 2024 Result Dahisar Vidhansabha : दहिसरमधून भाजपच्या मनीषा चौधरी आघाडीवर, तिसऱ्यांदा उतरल्यात मैदानात; उबाठाचे विनोद घोसाळकर पिछाडीवर
6
Maharashtra Assembly Election Result 2024: पहिल्या १३० जागांचे कल हाती, महायुती आणि मविआत काटे की टक्कर, भाजपा वरचढ
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results: निकालापूर्वीच शरद पवार-उद्धव ठाकरेंचं सावध पाऊल; दगाफटका टाळण्यासाठी महत्त्वाचा निर्णय!
8
पोस्टल मतदानात युगेंद्र पवार आघाडीवर; बारामतीत काय होणार? सर्वांचे लक्ष लागले
9
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 ५१ मतदारसंघात एकनाथ शिंदे- उद्धव ठाकरे आमनेसामने; खरी शिवसेना कुणाची जनता ठरवणार
10
पुन्हा २३ नोव्हेंबर! आताही असेच काही घडले तर?
11
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
12
'शाका लाका बूम बूम' फेम संजू अडकला लग्नाच्या बेडीत, मराठी पद्धतीने पार पडला विवाहसोहळा
13
...तर आम्हालाही आत्मरक्षणाचा अधिकार; मणिपूरचे मंत्री मैतेई यांनी दिला इशारा
14
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
15
जगभर : ‘चिरतरुण’ होण्यासाठी चरबीचं ‘इंजेक्शन’!
16
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
17
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
18
विशेष लेख: ‘प्रोजेक्ट गॅदर’ : एकटेपणावर ‘अमेरिकन’ उपाय
19
अमोल पालेकर नावाच्या ‘थोड्याशा रुमानी’ ‘आक्रिता’ची कहाणी

रस्त्यावर उतरून विरोध करा; राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या बैठकीत पवारांनी दिला पाच कलमी कार्यक्रम

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2023 9:58 AM

कुटुंबाच्या मालमत्तेत महिलांना अधिकार देण्याचा निर्णय आपण घेतला. याची पूर्ण अंमलबजावणी होत नाही, त्यासाठी  सरकारकडे आग्रह धरावा लागेल. 

मुंबई : राज्य सरकारच्या विद्यार्थी, तरुण, महिलांविरोधातील धोरणांचा रस्त्यावर उतरून विरोध करा, असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या महिला आघाडीला पाच कलमी कार्यक्रम दिला आहे. राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान इथे महिला पदाधिकारी, कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्या बैठकीत शरद पवार बोलत होते.

कुटुंबाच्या मालमत्तेत महिलांना अधिकार देण्याचा निर्णय आपण घेतला. याची पूर्ण अंमलबजावणी होत नाही, त्यासाठी  सरकारकडे आग्रह धरावा लागेल. 

मणीपूरमध्ये महिलांची धिंड काढली जाते, त्यांना जिवंत मारले जाते. याबाबत जागरूक राहावे लागेल. असा प्रकार घडला तर राष्ट्रवादीच्या त्या भागातील भगिनी रस्त्यावर उतरल्याच पाहिजेत, असे सांगत यासाठी अंगावर केसेस घ्याव्या लागल्या तरी चालेल, पक्ष त्याची काळजी घेईल, असे पवार म्हणाले. राज्य सरकारने शाळांचे समायोजन करण्यासाठी काही शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. 

 कंत्राटी नोकरभरतीत आरक्षण नाही. त्यामुळे या धोरणाला विरोध केला पाहिजे. १ जानेवारी ते  ३१ मे २०२३ या काळात राज्यात १९ हजार ५५३ तरुणी आणि महिला बेपत्ता झाल्या. हा प्रश्न गंभीर असून, यावरही आवाज उठवण्याचे आवाहन पवार यांनी केले.

...तर पहिला हार मी घालीन : सुप्रिया सुळेअजित पवार मुख्यमंत्री झाले तर त्यांना पहिला हार घालायला मी जाईन, असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्षा आणि खासदार सुप्रिया सुळे यावेळी म्हणाल्या. 

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, २०२४ मध्ये पाच वर्षांसाठी अजित पवारांना मुख्यमंत्री करणार, स्वागत करायला राष्ट्रवादी महिला काँग्रेस आणि मी स्वतः दादाला पहिला हार घालायला जाईन. का नाही जाणार... भाऊ पहिला माझा आहे. नंतर त्यांचा हक्क आहे, असे सुप्रिया म्हणाल्या. 

 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसWomenमहिला