सुधीर चेके पाटील/ चिखली (जि. बुलडाणा) : विदर्भ पटवारी संघाच्या चिखली शाखेने ह्यखासदार ग्राम दत्तक योजनेह्ण च्या धर्तीवरी ह्यतलाठी ग्रामदत्तक योजनाह्ण राबविण्याचा संकल्प केला आहे. शासन व जनतेच्या हितासाठी आपल्या परिघाबाहेर जावून तलाठी संघटनेचा हा राज्यातील पहिलाच उपक्रम दिशादर्शक ठरणार आहे. विदर्भ पटवारी संघाच्या चिखली शाखेने पुढाकार घेवून तालुक्यातील पळसखेड जयंती हे गाव विकासासाठी दत्तक घेतले आहे. ह्यतलाठी ग्रामदत्तक योजनेह्ण अंतर्गत पळसखेड जयंती येथे वर्षभरात शासनाच्या विविध योजना प्रत्येक घटकापर्यंत पोहचवून गावाचा सर्वांगीण विकास करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. तलाठी दत्तक ग्राम योजनेचा शुभारंभ २४ जानेवारी रोजी ग्रामस्वच्छता अभियान राबवून करण्यात येणार आहे. हा उपक्रम यशस्वीपणे राबवून आदर्श गाव निर्मितीसाठी पटवारी संघाचे जिल्हाध्यक्ष मनोज दांडगे, उपाध्यक्ष भगवान पवार, सचिव सुनिल ढवळे, मंगला सवडतकर, तालुकाध्यक्ष अनिरूध्द खेडेकर, विनोद गिरी, अनिल जाधव यांच्यासह तालुक्यात कार्यरत सर्व तलाठी सरसावले आहेत. * राज्यातील पहिला प्रयोगखासदारांप्रमाणे राज्यात अनेक आमदार तसेच इतर लोकप्रतिनिधींनी गावे विकासासाठी दत्तक घेतली आहेत. मात्र, शासकीय सेवेत कार्यरत राहून चिखली तालुक्यातील तलाठी वर्गाने संयुक्तरीत्या विकासासाठी गाव दत्तक घेवून राज्यात सर्वप्रथम पुढाकार घेतला आहे.
आता तलाठी ग्रामदत्तक योजना !
By admin | Published: January 22, 2015 12:51 AM