शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीला आणखी एक धक्का? हितेंद्र ठाकूर मविआला पाठिंबा देणार? भाजपाला धडा शिकवायचा निर्धार!
2
मोठी बातमी! आम आदमी पक्ष महाराष्ट्रात निवडणूक लढवणार नाही; 'मविआ'ला ताकद देणार?
3
टीम इंडियाचा पहिला डाव अवघ्या ४६ धावांत आटोपला; Matt Henry चा 'पंजा' अन् William ORourke चा 'चौका'
4
लॉरेन्स बिश्नोई टोळीविरोधात मोठी कारवाई! देशभरात छापे, पानिपतमधून शूटरला अटक
5
समीर वानखेडे विधानसभेच्या रिंगणात? महायुतीकडून निवडणूक लढवण्याची शक्यता
6
Video: अफलातून कॅच! हवेत उडी अन् एका हाताने भन्नाट झेल; सर्फराज खान शून्यावर बाद!
7
लाडकी बहीण योजना बंद होणार का? जयंत पाटलांचे सूचक विधान; म्हणाले, “आम्ही सत्तेत आल्यास....”
8
वरळीत चुरस वाढणार, भाजपाच्या आघाडीच्या महिला नेत्या आदित्य ठाकरेंविरोधात लढणार?  
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live: 'मातोश्री'चं बोलावणं! उद्धव ठाकरे आमदारांशी संवाद साधणार
10
७ पक्षांतरं केलेल्या नेत्याला पक्षात प्रवेश दिल्यानं शरद पवार गटात होणार राजकीय भूकंप?
11
उत्तर कोरियाने संविधानात बदल केले, दक्षिण कोरियाचे टेन्शन वाढले; वाचा नेमकं प्रकरण काय?
12
Ola, Ather अन् TVS... 'या' कंपन्या किती वर्षांची बॅटरी वॉरंटी देतात?
13
Oriana Power : २१०० रुपयांपार पोहोचला 'या' सोलर कंपनीचा शेअर; ११८ रुपयांवर आलेला IPO, तेजीचं कारण काय?
14
टीम इंडियाचे ५ 'हिरों' ठरले 'झिरो'; न्यूझीलंडसमोर घरच्या मैदानावर ओढावली ही नामुष्की
15
सावधान! बँक खात्यात पैसे नसले तरी होऊ शकते लाखोंची लूट: डिजिटल अरेस्ट अन् पर्सनल लोन
16
Atal Pension Yojna : ७ कोटी लोकांचा भरवसा, तुम्हीही दररोज वाचवा ७ रुपये; नंतर ₹५००० ची पेन्शन पक्की
17
भाजपाकडून मनधरणी? रात्री २ वाजता खलबते; राधाकृष्ण विखे पाटील यांनी घेतली मनोज जरांगेंची भेट
18
Rohit Sharma, IND vs NZ: "रोहित शर्मा 'कॅप्टन्सी कोट्या'तून खेळतो"; २ धावांत बाद झालेल्या 'हिटमॅन'वर चाहते संतापले!
19
“न्यायदेवतेच्या हातात संविधान देणे हा भाजपा अन् RSSचा अजेंडा”; संजय राऊतांची टीका
20
लेबनॉनमध्ये इस्रायलच्या हल्ल्यात आतापर्यंत 2,000 हून अधिक जणांचा मृत्यू; आरोग्य मंत्रालयाच्या रिपोर्टमधून खुलासा

तिसऱ्या आघाडीसाठी जरांगे, आंबेडकर यांच्याशी चर्चा, १७ तारखेनंतर उमेदवार जाहीर करू - संभाजीराजे 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2024 8:33 AM

१७ तारखेला आमची पुण्यात बैठक होईल. त्यानंतर आमच्या सर्व जागा जाहीर करू, असेही त्यांनी सांगितले.   

नाशिक : ‘प्रहार’सह शेतकरी संघटनेच्या सहभागातून तिसरी आघाडी महाराष्ट्रासाठी भक्कम पर्याय असून, राज्यातील सर्व जागा लढविण्याची आमची तयारी आहे. यासाठी मी प्रकाश आंबेडकर आणि मनोज जरांगे यांच्याशी चर्चा केली असून, अजूनही त्यांच्या संपर्कात असल्याची माहिती स्वराज्य पक्षाचे अध्यक्ष संभाजीराजे छत्रपती यांनी दिली. 

नाशिक येथे कार्यकर्ता मेळाव्यासाठी आले असता, संभाजीराजे यांनी बुधवारी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, फुले-शाहू-आंबेडकरांच्या महाराष्ट्रात त्यांच्या नावाने केवळ राजकारणच सुरू आहे. आता त्यांच्या विचारांचे सरकार स्थापन करण्याची वेळ आली असून, मतदारांना आम्ही एक भक्कम पर्याय देत आहोत. १७ तारखेला आमची पुण्यात बैठक होईल. त्यानंतर आमच्या सर्व जागा जाहीर करू, असेही त्यांनी सांगितले.   

आरक्षण विषय सुटण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती आवश्यक असून, आम्ही सत्तेत आल्यास त्यावर नक्कीच तोडगा काढू, असा दावाही त्यांनी केला. मायावती यांच्या बसपाचे राज्यातील निरीक्षक सिद्धार्थ यांच्याशीही चर्चा झाल्याचे ते म्हणाले.  

टॅग्स :NashikनाशिकSambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपती