प्रशांत ननवरे।लोकमत न्यूज नेटवर्कबारामती : नाशिकला देवदर्शनाला निघालेल्या तामिळनाडूच्या आजोबांनी प्रवासातच शेवटचा श्वास घेतला. लॉकडाउनमुळे त्यांच्या नातूला आजोबांचे पार्थिव तामिळनाडूला नेता आले नाही. त्याच्या विनंतीवरून पोलिसांनीच आजोबांवर सोमवारी (दि. ६)अंत्यसंस्कार केले.
अरुण मुथाई असे या पणतूचे नाव आहे. अरुण हा चेन्नई (तामिळनाडू)चा रहिवासी आहे. त्याचे पणजोबा शिवा स्वामीगल हे शंकराचे भक्त असल्याने नाशिकला देवदर्शनासाठी आले होते. माघारी येताना ते पुण्यात कुठेतरी अडकले. त्यांनी अरुण आणि त्याच्या कुटुंबियांना कॉल केला आणि मदत पाहिजे म्हणून सांगितले. मात्र, त्यांचा फोन ‘डिसकनेक्ट’ झाला. पुन्हा संपर्क होऊ शकला नाही. अरुण आणि कुटुंबियांनी महाराष्ट्र पोलिसांच्या वेबसाईटवर तक्रार दिली. पोलिसांनी कळवले की पणजोबांना पोलिसांंनी २५ मार्च रोजी हॉस्पिटलमध्ये अॅडमिट केले होते. उपचारादरम्यान रविवारी (दि.५) त्यांचे निधन झाले.लॉकडाउनमुळे पणजोबांवर अंत्यसंस्कार करता येणार नसल्याने त्यांचे कुटुंब दु:खी झाले. त्यांनी पोलिसांनाच पणजोबांचा अंत्यविधी उरकण्यास सांगितले. त्यासाठी आवश्यक ती सर्व कागदपत्र पाठवली. अरुण यांनी पत्र पाठवून पोलिसांचे आभार मानले आहेत.
आजोबांकडील पैसा कोरोनाबाधितांसाठीआजोबांकडे १ लाख ३५ हजार १०० रुपयांची रोकड होती. लवकरच ती रक्कम त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार आहे. ती रक्कम कोरोना मदतनिधीसाठी देण्याचा मानस त्यांच्या नातेवाईकांनी व्यक्त केला आहे.