शहरं
Join us  
Trending Stories
1
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
2
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
3
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
4
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
5
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
6
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
7
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
8
विमानात अमेरिकन महिलेचा श्वास गुदमरू लागला, देवदूत बनून धावली काँग्रेसची महिला नेता आणि वाचवले प्राण   
9
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
10
टेक इंडस्ट्री हादरली! AI मुळे २०२५ मध्ये १.२० लाख नोकऱ्या संपुष्टात; कर्मचारी कपातीत कोणती कंपनी पुढे?
Daily Top 2Weekly Top 5

सिंहगडावर सापडली तानाजी मालुसरे यांची देहसमाधी; राज्याला मिळाली अमूल्य ऐतिहासिक भेट 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2019 13:34 IST

सिंहगड शब्द कानावर आला की त्याक्षणी डोळ््यासमोर उभा राहतो तो तानाजी मालुसरे यांचा १६७० साली अद्वितीय पराक्रम..

ठळक मुद्देसिंहगडावर नरवीर तानाजी मालुसरे समाधीस्थळाचे सुशोभीकरण काम सुरु

पुणे/ खडकवासला : सिंहगड शब्द कानावर आला की त्याक्षणी डोळ््यासमोर उभा राहतो तो तानाजी मालुसरे यांचा १६७० साली अद्वितीय पराक्रम..याच युध्द प्रसंगात स्वराज्यासाठी तानाजी मालुसरे धारातीर्थी पडले होते. सिंहगडावरचा हा पराक्रम इतक्या वर्षांनतरही आपल्या सर्वांच्या अंगावर शहारे आणल्याशिवाय व स्वराज्य निर्मितीसाठी स्वत:च्या प्राणांची आहुतीचे स्मरण केल्याशिवाय राहत नाही. त्याच सिंहगडावर पुणे महानगरपालिकेच्या वतीने नरवीर तानाजी मालुसरे यांच्या समाधी व पुतळा परिसराचे सुशोभीकरणाचे काम सुरु आहे. ते सुरु असताना मालुसरे यांची देह समाधी मिळाली आहे. छत्रपती शिवरायांनी मालुसरे यांची समाधी बांधली. यामुळे, शिवाजी महाराजांच्या काळातील एक ऐतिहासिक अमूल्य असा ठेवा या समाधीच्या स्वरुपात राज्याला मिळाला आहे. 

पुरातत्व विभागाच्या परवानगीने पुणे महापालिकेच्या वतीने सिंहगडावर नरवीर तानाजी मालुसरे यांच्या पुतळा, समाधीस्थळाचे सुशोभीकरण आणि स्वराज्य निष्ठा शिल्पाचे कामाला सुरुवात करण्यात आली आहे. पुतळा बसविण्यासाठी सिमेंट चौथरा काढून तेथे दगडी बांधकामातील चौथरा बांधण्याचे नियोजन होते. पुतळा बाजूला काढून ठेवला. त्याच्या काँक्रीटचा ठोकळा काढल्यानंतर त्याच्या खाली एक चौकोनी दगड होता. त्याखाली समाधीचे वृंदावन सापडले. तर, पुतळ्याशेजारी एका चौकोनी दगडावर समाधीचा शिरोभाग होता. ती आतापर्यंत नरवीर तानाजी मालुसरे यांची समाधी म्हणून ओळखली जात होती. वृंदावन व त्यावरील चौकोनी दगड व त्यावर शिरोभाग अशी जोडणी केल्यावर ही नरवीर तानाजी मालुसरे यांनी मूळ समाधी असल्याचे दिसून आले आहे. नरवीर तानाजी मालुसरे यांच्या वंशज असलेल्या शीतल मालुसरे म्हणाल्या, हे स्फूर्तिस्थळ मालुसरे यांच्यासह अनेक मावळ्यांच्या बलिदानाने पावन झालेल्या पराक्रमाची साक्ष आहे. छत्रपती शिवाजी महाराज व त्यांच्या मावळ्यांचे एकमेकांशी असलेली निष्ठा या समाधीमुळे यांचे अधोरेििखत झाली आहे. नरवीर धारातीर्थी पडले ते स्फूर्तीस्थळ मालुसरे यांच्या ३४९ व्या पुण्यतिथी आधी प्र्रकाशझोतात आले हा एक अभूतपूर्व योगायोग आहे. छत्रपती शिवरायांनी स्वत: ही समाधी बांधून घेतली. पूर्ण झाल्यावर समाधीचे दर्शन घेतले आहे. मालुसरे यांच्या मृत शरीराला उमरठ येथे अग्नी दिला. त्या ठिकाणी अग्नी समाधी आहे.

ब्रॉंझमधील मेघडंबरीचे सिंहगडावरील स्मारकाच्या ठिकाणी उभारणीचे काम पुर्ण झाले आहे. समाधीचे काम सुरू करताना समाधी स्थानकावरील काँक्रीटचा चौथरा काढून घडीव शीळेतील चौथरा करण्यात येणार आहे. काँक्रीटचा चौ थरा वाढल्यावर तेथे मूळ स्वरुपातील समाधीचे वृदावन दिसले. वृदावनाला बाधा न पोहचवता काँक्रीट काढले. पुरातत्व विभागाचे सहायक संचालक विलास वाहने यांनी समाधीस्थळाची पाहणी केली. त्यांनी सांगितले की पुरातत्व विभागाच्या नियमानुसार आता  मूळ समाधीचे जतन करणार आहे.

.....................

सुशोभीकरणाचे काम पूर्ण करून समाधी शिवप्रेमीसाठी खुलीविशेष बाब म्हणून सुमारे सहा कोटी रूपये निधी महापालिकेकडून मिळवून नरवीर तानाजी मालुसरे यांची समाधीचे आणि स्वराज्य निष्ठा शिल्प आणि परिसराच्या सुशोभीकरणाचे काम अंतिमटप्प्यात आले. मूळ समाधी दिसल्यामुळे सध्या अस्तित्वात असलेला ब्रॉझचा पुतळा समाधी परिसरात बसवण्यात येईल असे पालिकेचे विरोधी पक्षनेते दिलीप बराटे यांनी सांगितले. तीथीनुसार नरवीरांची पुण्यतिथी २७ फेब्रुवारी आहे. त्यापूर्वी सुशोभीकरणाचे काम पूर्ण करून समाधी शिवप्रेमीसाठी खुली केली जाईल.

टॅग्स :sinhagad fortसिंहगड किल्लाhistoryइतिहासShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराज