शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Exit Poll 2024 : खरी ठरली अजित दादांची भविष्यवाणी...! Exit Poll मध्ये एवढ्या जागा जिंकतंय महायुतीचं 'ट्रिपल इंजिन'
2
Exit Poll: पुन्हा जरांगे फॅक्टर चालणार! महायुतीला फटका बसणार? मराठवाड्यात मविआच सरस ठरणार?
3
Exit Poll: अजितदादा भाकरी फिरवणार की शरद पवार करेक्ट कार्यक्रम करणार? कोण ठरेल वरचढ?
4
मतदान आटोपल्यावर फडणवीस पोहोचले संघ मुख्यालयात; सरसंघचालकांशी २० मिनिटे चर्चा
5
शिंदे, ठाकरे, फडणवीस की पवार..; मुख्यमंत्रिपदासाठी पहिली पसंती कोणाला? पाहा...
6
राज ठाकरे किंगमेकर ठरणार का? मनसेला किती जागा मिळणार? Exit Poll ची धक्कादायक आकडेवारी
7
Exit Poll: महाराष्ट्रात १० पैकी ६ एक्झिट पोल महायुतीच्या बाजुने; एकाने तर कोणालाच बहुमत दिले नाही
8
Maharashtra Exit Poll 2024: खरी शिवसेना कुणाची...? एकनाथ शिंदे की...? Exit Poll मध्ये उद्धव ठाकरेंना दुहेरी धक्का!
9
Exit Poll of Maharashtra: एक्झिट पोलमध्ये ठाकरेंपेक्षा शरद पवार, काँग्रेस सर्वात मोठ्या फायद्यात...; भाजपा सर्वात मोठा पक्ष
10
"यावेळी चेतेश्वर पुजारा टीम इंडियात नसणार..."; ऑस्ट्रेलियन गोलंदाजाचा आनंद गगनात मावेना!
11
मुंबईत धक्कादायक निकालाची शक्यता; एक्झिट पोलनुसार महायुती आणि मविआला समान जागा
12
महाराष्ट्रात पुन्हा महायुती सरकार ; Matrize एक्झिट पोलमध्ये 150-170 जागा मिळण्याचा अंदाज
13
झारखंडमध्ये इंडिया आघाडीला मोठा धक्का; Exit Poll मध्ये NDA ला स्पष्ट बहुमताचा अंदाज
14
Maharashtra Election Exit Poll : राज्यात मविआचं सरकार येणार...! भाजप सर्वात मोठा पक्ष ठरणार; जाणून घ्या कुणाला किती जागा मिळणार?
15
विदर्भात भाजपचं मोठं कमबॅक; महायुतीला ३७ जागा मिळण्याचा अंदाज
16
Maharashtra Election Exit Poll Results 2024 : महाराष्ट्रात एक्झिट पोलचे अंदाज समोर; मॅट्रिझ, चाणक्यचा महायुतीचा अंदाज, तर...
17
Exit Poll: भाजपा सर्वांत मोठा पक्ष ठरणार, महायुतीचे सरकार येणार, मविआला किती जागा मिळणार?
18
परभणीतील मतदान केंद्रावर सहा वाजेनंतर शेकडो मतदार रांगेत; प्रक्रिया सुरूच राहणार
19
Exit Poll Of Maharashtra:२०१९ मध्ये एक्झिट पोलचे काय होते अंदाज? मतदानाच्या तारखांत केवळ एका दिवसाचा फरक, पण...
20
महाराष्ट्र साठचा आकडा पार करणार; सायंकाळी ५ वाजेपर्यंत एवढे मतदान, अजून एक तास बाकी

तन्मय भटला अटक होण्याची शक्यता?

By admin | Published: May 30, 2016 9:38 PM

भारतरत्न सचिन तेंडुलकर आणि लता मंगेशकर यांच्यावर एआयबी रोस्टचा विनोदवीर तन्मय भटने केलेल्या आक्षेपार्ह शेरेबाजी विरोधात सर्व स्तरातून टिकेची झोड उठली आहे. याविरोधात

तन्मयचा व्हिडिओ काढण्यासाठी सायबर सेलचे गुगलला पत्र
 
मुंबई : भारतरत्न सचिन तेंडुलकर आणि लता मंगेशकर यांच्यावर एआयबी रोस्टचा विनोदवीर तन्मय भटने केलेल्या आक्षेपार्ह शेरेबाजी विरोधात सर्व स्तरातून टिकेची झोड उठली आहे. याविरोधात शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात मनसेकडून तक्रार दाखल होताच विशेष शाखेकडून याचा तपास सुरु केला आहे. युट्युब आणि फेसबुकवरुन हा व्हीडिओ काढण्यासाठी सायबर सेलने गुगलकडे अर्ज केला आहे. त्यानुसार हे व्हीडिओ हटविण्यात येत आहे. पोलीस सुत्रांकडून तन्मय भटला अटक होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. 
बॉलीवूडकरांसह मनसे आणि शिवसेना या राजकीय पक्षांनीही तन्मयचा निषेध व्यक्त केला. तसेच त्याच्याविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली गेली. या तक्रारीनंतर सायबर सेलने या प्रकरणी कारवाईस सुरूवात केली आहे. तन्मयचा व्हिडिओ काढून टाकण्यासाठी गुगल, फेसबुक आणि यूट्युबशी संपर्क साधण्यात आल्याची माहिती सायबर सेलचे सहायक पोलीस आयुक्त यशवंत पाठक यांनी दिली आहे. याशिवाय, व्हिडिओ टाकण्यासाठी वापरण्यात आलेल्या सिस्टीमचा आयपी शोधण्याचेही काम सुरू असल्याचे ते म्हणाले. तसेच या व्हीडिओची ट्रान्सस्क्रिप्ट काढून त्यावर विधी तज्ज्ञांचे मत घेऊन पुढील कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस प्रवक्ते संग्रामसिंग निशाणदार यांनी दिली.
 दरम्यान, सचिन आणि लतादीदींवरील आक्षेपार्ह शेरेबाजी करणाºया तन्मय भटला ठोकून काढण्याची धमकी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दिली आहे. तन्मय भट जिथे दिसेल तेथे मनसेचे कार्यकर्ते मनसे स्टाईलने त्याला उत्तर देतील, असे मनसे चित्रपटसेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी सांगितले. त्यांनी शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात तन्मय विरोधात तक्रार दाखल केली असून त्याच्या अटकेची मागणी केली आहे. त्यामुळे तन्मय भटच्या अटकेची शक्यता पोलीस सुत्रांकडून वर्तविण्यात येत आहे. 
 
बॉलीवूडकरांकडूनही खंत...
विनोदाच्या नावाखाली लता मंगेशकर आणि सचिन तेंडुलकर यांच्यासारख्या दिग्गज व्यक्तिमत्त्वांची थट्टा करणारा हा प्रकार सहन केला जाणार नाही, अशा शब्दांत बॉलीवूडकरांनी टीका केली आहे. 
’सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता म्हणून मी नऊ वेळा पुरस्कार घेतला आहे आणि मला विनोदाची चांगलीच जाण आहे. मात्र एआयबीच्या या नव्या प्रकाराला विनोद म्हणता येणार नाही, अशा शब्दांत टीका करत लतादीदी आणि सचिनचा अनादर करण्याचा हा प्रकार असल्याचे अभिनेता अनुपम खेर यांनी म्हटले आहे. तर अशा प्रकारे कुणाचा अनादर करणे याला गंमत किंवा विनोद म्हटले जाऊ शकत नाही. हा अतिशय धक्कादायक प्रकार असल्याची टीका रितेश देशमुखने केली आहे. सेलिना जेटलीसारख्या अभिनेत्रीनेही हा वाईट प्रकार असून या प्रकरणी एआयबीने लता मंगेशकर यांची माफी मागितलीच पाहिजे, असे म्हटले आहे.
 
सर्वपक्षीय आक्रमक
दुसरीकडे तन्मय भटच्या आक्षेपार्ह व्हिडीओविरोधात सर्वपक्षीयांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. याप्रकरणी मनसेने मुंबईच्या शिवाजी पार्क पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. तर शिवसेना नेत्या निलम गो-हे यांनी मुख्यमंत्र्यांना ई-मेलद्वारे निवेदन करत, तन्मयवर कडक कारवाईची मागणी केली आहे. याशिवाय मुंबई भाजप अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनीही तन्मय भटविरोधात पोलीस आयुक्तांकडे तक्रार दाखल केली आहे. लताताई मंगेशकर आण सचिन तेंडुलकर  या दोन भारतरत्न आणि संगीत - क्रिकेट क्षेत्रातील आदरणीय व्यक्तीमत्वांवर तन्मय भट आणि एआयबीच्या टीमने कुचेष्टापर व्हिडिओ तयार करून सामाजिक माध्यमात प्रसृत केला आहे.  स्वत:च्या बोगस प्रसिद्धिसाठी अथवा मानसिक विकृत भावनेतून हा व्हिडिओ तन्मय भटने प्रकाशित केला आहे. नंतर अशी माणसे माफी मागूनही मोकळी होतात, परंतु सामाजिक माध्यमांचा दुरूपयोग आणि विनाकारण उपद्रवकारी प्रवृत्तींना रोखण्यास राज्य शासनाने कारवाई करावी हे गरजेचे आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी कडक पावले उचलावी अशी मागणी गो-हे यांनी केली आहे.
 
 
तन्मय भटची मुजोरी कायम...
 भारतरत्न सचिन तेंडुलकर आणि लता मंगेशकर यांच्यावर अश्लाघ्य टिपण्णी करणाºया एआयबीच्या तन्मय भटची मुजोरी कायम आहे. तन्मय भटविरोधात पोलिसात तक्रार दाखल झाली असतानाही, त्याने माफी न मागता आपल्या व्हिडीओचे समर्थन केले आहे. याबाबत त्याने ट्विट करुन आपली भूमिका योग्य असल्याचे एकप्रकारे दाखवले आहे. माझ्या व्हिडीओवर सगळेजण असे काही तुटून पडले आहेत, जसे काही प्रत्येकाने आतापर्यंत सभ्य जोकच ऐकवले आहेत, असे टिष्ट्वट तन्मयने केले आहे.