शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

आता अजित पवारांना पाडण्याचं लक्ष्य; चंद्रकांत पाटलांचा 'इरादा पक्का'

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2019 4:44 PM

बारामती मतदारसंघातून खासदार सुप्रिया सुळे यांचा पराभव करण्याच्या व्युहरचनेत आम्ही थोडे कमी पडलो.

ठळक मुद्दे दर १५ दिवसाला बारामती मतदारसंघात जाणार लोकसभेतील सहाही विधानसभा मतदारसंघांत जोर लावणार

पिंपरी : लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांचा निसटता विजय झाला. बारामती, भोर व इंदापूर मतदारसंघांत आम्ही कमी पडलो. आगामी विधानसभा निवडणुकीत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पराभव करण्याचे टार्गेट असून, त्यानंतर २०२४ च्या निवडणुकीत सुळे यांच्या पराभवाचे उद्दिष्ट आहे, अशी माहिती पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.  पुण्याच्या पालकमंत्रिपदी नियुक्ती झाल्यानंतर पाटील यांनी मंगळवारी पहिल्यांदाच पिंपरी-चिंचवड शहर भाजपाच्या कार्यालयाला भेट दिली. विधानसभा निवडणुकीसंदर्भात कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. यावेळी शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप, महापौर राहुल जाधव, आमदार महेश लांडगे, पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे, स्थायी समिती अध्यक्ष विलास मडिगेरी, सभागृहनेते एकनाथ पवार आदी उपस्थित होते. पाटील म्हणाले, बारामती मतदारसंघातून खासदार सुप्रिया सुळे यांचा पराभव करण्याच्या व्युहरचनेत आम्ही थोडे कमी पडलो. तसेच केवळ निवडणुकीपुरते बारामतीमध्ये येतात असे मतदारांना वाटू नये. यासाठी दर १५ दिवसाला बारामती मतदारसंघात जाणार आहे.  लोकसभेतील सहाही विधानसभा मतदारसंघांत जोर लावणार आहे.

टॅग्स :Puneपुणेchandrakant patilचंद्रकांत पाटीलAjit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूक