शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
3
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
4
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
5
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
6
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
7
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
8
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
9
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
10
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
11
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
12
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
13
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
14
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
15
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
16
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
18
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
19
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार
20
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...

तासगाव बाजार समिती राष्ट्रवादीकडे

By admin | Published: August 03, 2015 12:50 AM

तासगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीत राष्ट्रवादीने १९ पैकी १८ जागांवर एकतर्फी विजय मिळविला. भाजपा आणि काँग्रेसच्या

तासगाव : तासगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीत राष्ट्रवादीने १९ पैकी १८ जागांवर एकतर्फी विजय मिळविला. भाजपा आणि काँग्रेसच्या पॅनेलचा धुव्वा उडवला. भाजपाला व्यापारी गटात एका जागेवर विजय मिळाला. तालुक्याच्या राजकारणात राष्ट्रवादीचे अस्तित्व, तर भाजपाची अस्मिता पणाला लागलेल्या या निवडणुकीत राष्ट्रवादी पक्षच ‘बाहुबली’ ठरला. बाजार समितीत २४ वर्षांनंतर पहिल्यांदाच दोन तुल्यबळ गट आमने-सामने आले होते. त्यामुळे मोठ्या चुरशीने ही निवडणूक लढविली गेली. दुपारी एक वाजेपर्यंत सर्व जागांचे निकाल जाहीर झाले. शनिवारी भाजपा आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांत झालेल्या मारामारीच्या पार्श्वभूमीवर मतमोजणी केंद्राच्या परिसरात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मतमोजणी केंद्रातही तणावाचे वातावरण होते. समितीच्या १९ जागांपैकी राष्ट्रवादीची एक जागा यापूर्वीच बिनविरोध झाली होती. उर्वरित १८पैकी १७ जागांवर राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा विजय झाला.विजयानंतर सर्व उमेदवारांसह कार्यकर्ते सूतगिरणीच्या कार्यस्थळावर जमले. या ठिकाणी आमदार सुमनताई पाटील यांच्या उपस्थितीत सभा झाली. त्यानंतर सर्व विजयी उमेदवारांनी अंजनी येथे माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांच्या समाधिस्थळाचे दर्शन घेतले. (प्रतिनिधी)