मुंबई : दर्जेदार आरोग्य सेवा, गुणवत्तापूर्ण शिक्षण, कुपोषण निर्मूलन, महिला सक्षमीकरण आणि प्रशासनात विशेष सुधारणा करण्यासाठी महाराष्ट्र शासन व टाटा ट्रस्ट यांच्यात आज विविध महत्त्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व टाटा ट्रस्टचे अध्यक्ष रतन टाटा यांच्या उपस्थितीत विधान भवनात नऊ सामंजस्य करार करण्यात आले. वैद्यकीय क्षेत्रामध्ये राष्ट्रीय कर्करोग ग्रीड तयार करण्यात येणार असून त्यात महाराष्ट्रातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांच्या माध्यमातून कर्करोगाचे अत्याधुनिक पद्धतीने निदान व उपचार उपलब्ध होणार आहेत. बोनमॅरो रजिस्ट्री स्थापन करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य असेल. त्यामुळे रक्ताचा कर्करोग, सिकलसेल, थॅलेसेमिया अशा स्वरूपाच्या दुर्धर आजारांच्या उपचार पद्धतीमध्ये आमूलाग्र बदल होईल. महाराष्ट्र राज्य औषध पुरवठा महामंडळ स्थापन करण्याच्या अनुषंगाने लागणारे सर्व तांत्रिक व व्यवस्थापकीय सहाय्य टाटा ट्रस्ट उपलब्ध करून देणार आहे. इंटरनेटद्वारे महिला सक्षमीकरणमहिलांमध्ये संगणक साक्षरता वाढवून त्याद्वारे महिला सक्षमीकरण घडवून आणण्यासाठी इंटरनेट साथींच्या माध्यमातून महिलांना संगणक व इंटरनेट यांचे प्रशिक्षण देण्यात येईल. या मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात बचतगटात काम करणाऱ्या ३०० महिलांना प्रशिक्षित करु न त्यांच्या माध्यमातून १२०० गावांतील महिलांना ही सेवा पुरविली जाईल. त्यापुढील टप्प्यात १५ हजार खेडयांमध्ये हा कार्यक्र म विस्तारण्यात येणार आहे. मूल्यांवर आधारित प्रशासनकैद्यांना कायदेविषयक सहाय्य, शारीरिक-मानसिक आरोग्य सेवा तसेच कौशल्याधारित प्रशिक्षण देऊन त्यांच्यात मूलगामी परिवर्तन घडविण्यात येईल. पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील ५ मध्यवर्ती कारागृहांमधील १० हजार कैदी आणि त्यांच्या कुटुंबियांपर्यंत या सेवा पुरविण्यात येतील. प्रशासनाचे आदर्श मॉडेलसांख्यिकी आधारित जिल्हा विकास आराखडा बनविण्यासाठी पहिल्या टप्प्यात नागपूर व चंद्रपूर अशा दोन जिल्ह्यात हा कार्यक्र म राबवून प्रशासनाचे आदर्श मॉडेल निर्माण करण्यात येईल व नंतरच्या टप्प्यात हेच मॉडेल पूर्ण राज्यभर राबविण्यात येईल.भाषा प्राविण्यासाठी प्रशिक्षण शिक्षणामध्ये गुणवत्तापूर्वक बदल घडवून आणण्यासाठी भाषा विषयामध्ये प्राविण्य मिळविण्यासाठी पहिल्या टप्प्यात २५० प्रशिक्षक तयार करण्यात येणार आहेत. (विशेष प्रतिनिधी)पोषण आहार पुरवठाकुपोषण कमी करण्यासाठी विविध जीवनावश्यक सूक्षम पोषण द्रव्यांचा आहारात समावेश करण्यात येणार आहे. यामुळे आवश्यक जीवनसत्वे, लोह व इतर आवश्यक अन्नद्रव्ये यांचा योग्य त्या प्रमाणात आहारात समावेश झाल्याने कुपोषण कमी होण्यास मदत होणार आहे.प्रभावी आरोग्यासाठी यंत्रणासार्वजनिक आरोग्य विभाग व वैद्यकीय शिक्षण विभाग यांना तांत्रिक सहाय्य करण्यासाठी स्ट्रॅटेजिक हेल्थकेअर अॅडव्हायजरी युनिट स्थापन करण्यात येणार असून त्यामार्फत कुशल मनुष्यबळ उपलब्ध करण्यास मदत होणार आहे. नागपूर येथील मनोरु रुग्णालयात सेंटर आॅफ एक्सलन्स विकसित करण्यात येणार आहे.विधानसभा गॅलरीत टाटा : रतन टाटा हे आज करारासाठी विधानभवनात आले होते. मुख्यमंत्र्यांनी टाटा ट्रस्टशी सामंजस्य कराराची घोषणा केली तेव्हा ते प्रेक्षक गॅलरीत बसून होते. मुख्यमंत्र्यांचे सचिव प्रवीण परदेशी त्यांच्या समवेत होते. सभागृहाने बाके वाजवून कराराचे स्वागत केले.
आरोग्य सुविधांसाठी टाटांशी करार
By admin | Published: April 01, 2016 2:03 AM