टाटांचा मोलाचा वाटा; स्कील डेव्हलपमेंटसाठी देणार १०,००० कोटी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2020 11:53 AM2020-01-25T11:53:28+5:302020-01-25T11:55:42+5:30
राज्य शासनाचा वाटा हा १५00 कोटी रुपयांचा असेल. जूनपासून या उपक्रमास सुरुवात केली जाईल आणि तो टप्प्याटप्प्याने राबविला जाईल.
मुंबई : कौशल्य विकासाला चालना देण्यासाठी राज्यातील आयटीआयच्या मुलामुलींना प्रशिक्षित करणे आणि त्यांना रोजगारक्षम करण्यासाठी टाटा ट्रस्ट १० हजार कोटी रुपयांची मदत देणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी पत्रकारांना दिली.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, आपण स्वत: आणि टाटा ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांची गुरुवारी बैठक झाली आणि त्यात हा उपक्रम राबविण्याचे ठरले. त्यात राज्य शासनाचा वाटा हा १५00 कोटी रुपयांचा असेल. जूनपासून या उपक्रमास सुरुवात केली जाईल आणि तो टप्प्याटप्प्याने राबविला जाईल. त्या अंतर्गत आयटीआयना सुसज्ज आणि आधुनिक रुप दिले जाईल. उद्योगांच्या गरजांनुसार रोजगारांची निर्मिती करणे हे मुख्य सूत्र असेल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मान्यतेने याबाबतचा अंतिम निर्णय लवकरच घेण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
मुंबईत हेरिटेज वॉक
मुंबईत अनेक हेरिटेज वास्तू आहेत. पर्यटनवाढीच्या दृष्टीने ‘हेरिटेज वॉक’ अशी संकल्पना राबविण्यात येणार आहे. त्या अंतर्गत अशा वास्तूंना पर्यटकांच्या भेटीचे कार्यक्रम आयोजित केले जातील, अशी माहिती अजित पवार यांनी दिली.
मुंबईसह कोकणातील जिल्ह्यांना भरीव निधी
जिल्हा विकास योजनेत (डीपीसी) मुंबईसह कोकणातील जिल्हा नियोजन मंडळांना भरीव निधी देण्यात आला आहे. डीपीसीला कोणताही कट लावला जाणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.
Discussed on setting up 6 ITI hubs across the State to develop skills & increase employment opportunities for the educated youth at meeting held in Sahayadri Guesthouse, under the guidance of @PawarSpeaks Saheb today. pic.twitter.com/WETReicrTb
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) January 23, 2020
माळशेजमध्ये ग्लास ब्रिज
माळशेज घाटात असलेल्या दीड किलोमीटर लांबीच्या दरीवर ग्लासब्रिज उभारण्याचा प्रस्ताव आहे. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी आपली या बाबत चर्चा झाली आहे. हा ब्रिज पर्यटकांचे मोठे आकर्षण केंद्र ठरेल, असे ते म्हणाले.
'कृषी आयटीआय सुरु होणार, राज्यातील ITI कॉलेजचा चेहरामोहरा बदलणार'
ओळखलंत का सर मला, रतन टाटांनी फोटो शेअर केलेला तरुण कोण?
मालवण, वेंगुर्लेतील विश्रामगृहे सुधारणार
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण आणि वेंगुर्लेतील शासकीय विश्रामगृहांच्या दुरुस्तीसाठी ८ कोटी रुपयांचा निधी दिला जाईल. त्यातील प्रत्येकी २ कोटी रुपये देण्यात आले आहेत, असे ते म्हणाले.