मुंबई : कोकण व पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांना अरबी समुद्रातील ‘तौत्के चक्रीवादळाचा मुसळधार पावसासह तडाखा बसणार आहे. या पार्श्वभूमीवर वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महावितरणची यंत्रणा सज्ज ठेवली आहे. वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी आपत्कालीन आराखडा तयार करण्यात आला आहे.
कोविड रुग्णालये, ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प व रिफीलिंग उद्योग, विलगीकरण कक्ष, लसीकरण केंद्रे, पाणीपुरवठा, मोबाईल टॉवर्स, रेल्वे व अत्यावश्यक सेवेसह घरगुती ग्राहकांचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यास प्राधान्य देण्यात येणार आहे.
पश्चिम रेल्वेच्या ५० गाड्या रद्द तौक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर पश्चिम रेल्वेच्या ५० हून अधिक गाड्या रद्द करण्यात आल्या १५ ते २१ मेदरम्यान दादर-भूज, बांद्रा टर्मिनस-भूज, मुंबई सेंट्रल-ओखा, बांद्रा टर्मिनस-भावनगर टर्मिनस, भावनगर-बांद्रा टर्मिनस भूज-बांद्रा टर्मिनस, पुणे-भूज यांसह ५०हून अधिक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. चक्रीवादळामुळे १४ मे १८ मेदरम्यान काही गाड्या अहमदाबादपर्यंतच धावणार आहेत.
अशी करणार व्यवस्थास्थानिक प्रशासन व पोलीस विभागाशी समन्वय ठेवून वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी युद्धपातळीवर काम करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पाणी साचेल किंवा वीजयंत्रणेला धोका निर्माण होईल, तेथील वीजपुरवठा सुरक्षेच्या कारणास्तव बंद ठेवण्यात येणार आहे. वीजयंत्रणेच्या दुरुस्तीसाठी इतर ठिकाणांहून अभियंते व कर्मचारी संबंधित दुरुस्ती कामासाठी पाठविण्यात येणार आहेत.
पर्यायी व्यवस्थेतून करणार वीजपुरवठा सुरळीतकमी नुकसान व्हावे यासाठी पूर्वतयारी सुरू करण्यात आली आहे. आवश्यक यंत्रसामग्रीचा साठा करून ठेवण्यात येत आहे. यामध्ये विजेचे खांब, रोहित्र, वीजतारा, ऑईल व इतर तांत्रिक साहित्यांचा समावेश आहे. सर्व एजन्सीजना आवश्यक मनुष्यबळ, सामग्री व वाहनांसह तयार राहण्याचा सूचना देण्यात आल्या आहेत. - विजय सिंघल, अध्यक्ष, महावितरण
मुंबईचे तापमान ३७.४०अरबी समुद्रात उठलेल्या ताउके या चक्रीवादळाने धडकी भरविली असतानाच दुसरीकडे मुंबईकरांना वाढत्या कमाल तापमानाने घाम फोडला आहे. शनिवारी मुंबईचे कमाल तापमान ३७.४ अंश सेल्सिअस एवढे नोंदविण्यात आले असून, सरासरी कमाल तापमानाच्या तुलनेत शनिवारीचे कमाल तापमान तीन अंशांनी अधिक नोंदविण्यात आले. वाढते कमाल तापमान, चक्रीवादळाने हवामानात झालेला बदल, ढगाळलेली मुंबई आणि उकाड्यात झालेल्या वाढीने मुंबईकर घामाघूम झाले आहेत. ३७.४ अंश ही नोंद यंदाच्या हंगामातील उच्चांक आहे.