शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
4
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
5
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
6
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
7
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
8
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
9
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
10
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
11
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
12
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
13
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
14
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
15
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
16
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
17
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
18
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
19
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
20
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य

तावडे एक नव्हे ६ कंपन्यांचे संचालक - विखे पाटील आणि निरुपनी केला राजीनाम्याच्या मागणीचा पुनरुच्चार

By admin | Published: February 26, 2016 8:53 PM

तावडे यांनी कायद्याचा भंग केला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी राधाकृष्ण विखे पाटील आणि संजय निरुपम यांनी पत्रकार परिषदेत केली.

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. २६ - राज्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे केवळ एकच नव्हे तर तब्बल सहा कंपन्यांचे संचालक आहेत. मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर ६० दिवसात कंपनीच्या संचलकपदाचा राजीनामा देणे बंधनकारक असतानाही तावडेंनी कोणत्याच कंपनीचे संचालक पद सोडलेले नाही. तावडे यांनी कायद्याचा भंग केला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील आणि मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी पत्रकार परिषदेत केली. काँग्रेस पक्ष कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत विखे-पाटील आणि संजय निरुपम यांनी विनोद तावडे यांच्याविरोधातील कागदपत्रांची जंत्रीच सादर केली. विनोद तावडे आणि केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी संचालक असलेल्या श्री मल्टीमिडिया व्हिजन कंपनीला भाजपाने २५ लाख रुपये ट्रेड अ‍ॅडव्हान्स म्हणून दिले. त्याची अद्याप परतफेड झालेली नाही. याबाबत स्पष्टीकरण देताना तावडे यांनी आपण मानद संचालक असल्याचा खुलासा केला होता. मात्र, कंपनी कायद्यानुसार व्यावसायिक कंपनीत मानद संचालक हा प्रकारच नसतो. शिवाय तावडे यांनी श्री मल्टिमिडिया कंपनीच्या ताळेबंदावर केवळ संचालक म्हणूनच स्वाक्षरी केल्याचा आरोप काँग्रेस नेत्यांनी केला. श्री मल्टिमिडीयासह आणखी सहा कंपन्यांचे संचालक पद तावडे यांच्याकडे आहे. मंत्री झाल्यानंतरही त्यांनी संचालक पदाचा राजीनामा दिलेला नाही. तसेच या कंपन्यांच्या स्थावर आणि जंगम मालमत्तेची माहितीही निवडणुक आयोगापासून लपवून ठेवली. कायद्यानुसार हा गुन्हा असून त्यासाठी सहा महिन्यांच्या कारावासाची आणि दंडाची शिक्षा आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब तावडे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अशी मागणी विखे पाटील आणि निरुपम यांनी केली. तावडे यांच्या कंपन्या पुढील प्रमाणे (कंसात नियुक्तीची तारीख)श्रीरंग प्रिंटर्स प्रा. लिमिटेड (१५ जुलै १९९६), तावडे-नलावडे बिल्डवेल प्रा. लिमिटेड (१ नोव्हेंबर २००२), नाशिक मरिन फीडस् प्रा. लिमिटेड (१२ मार्च २००३), इनोव्हेटीव्ह आॅफशोअरींग प्रा. लिमिटेड (३० सप्टेंबर २०१०) आणि महाराष्ट्र फील्म स्टेज अँड कल्चरल डेव्हलपमेंट कार्पोरेशन लिमिटेड (२ नोव्हेंबर २०१४). डीन नंबरचाही घोटाळा उघडनितीन गडकरी आणि विनोद तावडे यांचा आणखी एक घोटाळा काँग्रेसने उघडकीस आणला. गडकरी यांच्याकडे ६ तर तावडेंकडे ३ डायरेक्टर आयडेंटिफिकेशन नंबर (डीन), संचालक ओळख क्रमांक) आहेत. कायद्यानुसार एका व्यक्तीच्या नावे केवळ एकच डीन नंबर असू शकतो. ज्यांना आपली मालमत्ता लपवायची असते अथवा गैरप्रकार करणारीच मंडळी एकाहून अधिक डीन नंबर मिळवितात. मंत्री पदावर असणा-या नेत्यांनी सहा-सहा डीन नंबर मिळविले आहेत. स्वच्छ कारभाराचा दावा करणा-या भाजपाचा खरा चेहरा याप्रकारामुळे उघड झाला आहे. या गुन्ह्याबद्दल दोन्ही नेत्यांचा राजीनामा घेवून त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्याची मागणी काँग्रेसने केली. विनोद तावडे यांच्या नावावर असणारे डीन क्रमांक : ०१७२०२८४, ०२६१८०२३, ०१४२७३७५नितीन गडकरी यांच्या नावे असणारे डीन क्रमांक : ००४०३७१४, ००१९२१०७, ००१९२१८०, ००२५६९०५, ०१२५९२४३ आणि ०१५९८५२०. काँग्रेसचे आरोप निराधार - माधव भांडारीकेंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या विरोधात काँग्रेसने केलेले आरोप बिनबुडाचे आणि निराधार आहेत. केवळ आरोपांसाठी आरोप करण्याचा एककलमी कार्यक्रम काँग्रेसने चालविला असल्याचा आरोप भाजपा प्रवक्ता माधव भांडारी यांनी केला.