ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 30 - पुणे महापालिकेच्या २०१७-१८ च्या अर्थसंकल्पात पुणेकरांवर करवाढीची कु-हाड कोसळली आहे. आयुक्तांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात सर्वसाधारण कर आणि पाणीपट्टीत प्रत्येकी १५ टक्के करवाढ सुचवण्यात आली आहे. मिळकत करातही १२ टक्के करवाढ प्रस्तावित केली आहे.
पुणे महापालिकेचे २०१७-१८ या आर्थिक वर्षाचे ५ हजार ६०० कोटींचे अंदाजपत्रक आयुक्त कुणाल कुमार यांनी स्थायी समितीला गुरूवारी सादर केले आहे.
बांधकाम विभागामध्ये महसुलात झालेली घट आणि मोठ्या प्रकल्पांसाठी प्रस्तावित रक्कम यांचा अर्थसंकल्पावर ताण पडला आहे. त्यामुळे करवाढीचा प्रस्ताव दिला गेला आहे. अंदाजपत्रकात शिक्षण मंडळासाठी ३११ कोटीतर पीएमपीसाठी ३९२ कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. नियोजनाचे काम करण्यासाठी ५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
अंदाजपत्रकात आयुक्तांनी सायकलच्या वापरासाठी अनेक योजना सुचवल्या आहेत. यामध्ये शहरात 300 किलोमीटर लांबीचा सायकल ट्रॅक करणे तसेच सायकलचा वापर अधिकाधिक वाढविण्यासाठी प्रस्तावित आहे. रोड सेफ्टी परिक्षणालाही प्राधान्य देण्यात येणार आहे.