- लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबई, पुण्यासह उर्वरित राज्यात विजेवरील रिक्षा व टॅक्सी चालविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या निर्णयामुळे तब्बल २० वर्षांपासून बंदी असलेले विजेवरील आॅटोरिक्षा-टॅक्सी परवाने देण्याचे सरकारने ठरविले आहे. एका अध्यादेशाद्वारे ही माहिती सर्व प्रादेशिक परिवहन विभागांना कळविण्यात आली आहे. या निर्णयामुळे मुंबई महानगर क्षेत्रात नवीन परवान्यांसह इलेक्ट्रिक आॅटोरिक्षा आणि काळी-पिवळी टॅक्सी लवकरच धावताना दिसू शकणार आहेत.प्रदूषणाच्या समस्येवर मात करण्यासाठी विजेवर चालणाऱ्या आॅटोरिक्षेसह काळी-पिवळी टॅक्सीतून प्रवासी वाहतूक सुरू करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. विजेवर चालणाऱ्या रिक्षांना मीटर बसवल्याशिवाय परवाने देऊ नयेत, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. केंद्राच्या नियमांनुसार, १९९७ पासून इलेक्ट्रिक आॅटोरिक्षा-टॅक्सी परवान्याला बंदी घालण्यात आली होती. सद्यस्थितीत मुंबई महानगर क्षेत्रात सुमारे २.५ लाख रिक्षा आणि ५० हजार टॅक्सी सीएनजी आणि एलपीजीवर धावत आहेत. सरकारच्या नवीन अध्यादेशामुळे अॅप बेस टॅक्सीदेखील विजेवर धावण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नवीन परवान्यांसाठी अटी, शर्ती योग्य लायसन्स, टॅक्सी चालविण्याचा बॅच कॅब आवश्यक पोलीस विभागाचा चारित्र्य पडताळणी दाखला आवश्यकअर्जदाराकडे आधीचा परवाना नसल्याचे प्रतिज्ञापत्र आॅटोरिक्षा-टॅक्सीमध्ये जीपीआरएस, आरएफआयडी टॅग बंधनकारक
मुंबईत विजेवरही धावणार टॅक्सी-रिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2017 3:21 AM