शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीसांनी 'व्होट जिहाद'वरून चढवला हल्ला; शरद पवारांनी दिलं प्रत्युत्तर; म्हणाले...
2
"ही भाषा...", अजित पवार यांच्या 'वाली' वक्कतव्यावर सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या; PM मोदी, अमित शाह यांचंही नाव घेतलं!
3
भाजपाला मत देणाऱ्या मुस्लिमांना शोधून काढा, अन्...; महाविकास आघाडीवर गंभीर आरोप
4
महायुतीचे उमेदवार विलास भुमरे गॅलरीतून पडले, हात-पाय फ्रॅक्चर, उपचार सुरु
5
Meta चा Video, लोकेशनसह अलर्ट; पोलिसांनी १२ मिनिटांत ९ किमी जाऊन वाचवला तरुणाचा जीव
6
Sunita Williams : सुनीता विल्यम्सच्या अडचणी वाढल्या, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात तडे, अनेक ठिकाणाहून गळती
7
जेफरीजनं 'या' ५ Stock वर सुरू केलं कव्हरेज, दिला खरेदीचा सल्ला; HAL, PNB सारख्या दिग्गजांचा समावेश
8
खळबळजनक! सलमान खानवर गोळीबार केल्यानंतर लॉरेन्स बिश्नोई गँगने केलेला 'हा' प्लॅन
9
Astrology: शनिदोष टाळण्यासाठी सगळ्याच राशीच्या लोकांनी आवर्जून 'अशी' घ्या काळजी!
10
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
11
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
12
भयंकर! नर्सने माचिसची काडी पेटवली अन् आग लागली; वॉर्डमध्ये नेमकं काय घडलं?
13
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
14
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
15
Vastu Tips: लक्ष्मीविष्णुंना प्रिय असलेले कमळ घरात लावल्याने होणारे आर्थिक लाभ जाणून चकित व्हाल!
16
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
17
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
18
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
19
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
20
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र

टेलरिंग हा व्यवसायच नाही, तर मिशन... एका ब्रॅण्डची पन्नाशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 03, 2017 3:25 AM

‘उनकी त्वचा से उनकी उम्र का पता ही नही चलता,’ असे चिरतरुण माणसाबाबत म्हटले जाते. अशाच एका लिजेंडरीचे नाव आहे, माधव अगस्ती. वय वर्षे ६८. फिटनेस बघत राहण्यासारखा.

- विशेष प्रतिनिधी ।मुंबई : ‘उनकी त्वचा से उनकी उम्र का पता ही नही चलता,’ असे चिरतरुण माणसाबाबत म्हटले जाते. अशाच एका लिजेंडरीचे नाव आहे, माधव अगस्ती. वय वर्षे ६८. फिटनेस बघत राहण्यासारखा. ‘ही लुकस् यंग बिकॉज ही थिंकस् यंग.’ दिलीपकुमार, सुनील दत्तपासून अक्षयकुमारपर्यंतच्या बदलत्या फॅशनचे ते शिल्पकार, तसेच आडवाणी, सुशीलकुमार शिंदेंपासून देवेंद्र फडणवीसांपर्यंतच्या बदललेल्या राजकीय पिढीतील फॅशनचा न बदललेला दुवाही तेच.असे म्हणतात की, कपड्यांचे माप घेण्यासाठी त्यांनी टेप हातात घेतलाच पाहिजे, असे नाही. ते नजरेनेही माप घेऊ शकतात. बºयाच दिग्गजांची अशी नजरेने मापे घेऊन त्यांनी त्यांचे शिवलेले कपडे त्यांच्या पुढ्यात ठेवत, सुखद आश्चर्याचा धक्का दिलाय. ७० च्या दशकात कपडे शिवायला सुरुवात करणारा हा अवलिया जगातील लेटेस्ट फॅशनचा दरदिवशी अभ्यास करतो. त्यासाठी पदरमोड करून जगभर फिरतो. टेलरिंग हा त्यांचा व्यवसायच नाही, तर ते मिशन आहे. त्यांच्या व्यवसायाचे हे सुवर्णमहोत्सवी वर्ष. ५० वर्षांपूर्वी हाती कात्री, टेप घेतलेला हा माणूस आज स्वत:च एक ब्रँड बनलाय.नागपूरच्या हडस हायस्कूलमध्ये शालेय शिक्षण घेतल्यानंतर, तिथल्याच जीएस कॉमर्स कॉलेजमध्ये पदवीपर्यंतच शिक्षण अर्धवट सोडावे लागलेल्या भिक्षुकाच्या या मुलाने आज मोठ्ठ विश्व निर्माण केलेय. बॉलीवूड आणि फॅशन हे शब्द हातात हात घालून चालतात. वेगवेगळ्या फॅशन्सबाबत बॉलीवूडची मक्तेदारी होती.माधव टेलर यांचे सर्वात मोठे योगदान काय, तर त्यांनी राजकीय नेत्यांनाही फॅशनेबल केले. एक काळ असा होता की, सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांचे पेहराव एकसारखे असत. पुढाºयांचे सिनेमातील कॅरेक्टरही टिपिकल होते. त्यांनी या विशिष्ट साच्यातील राजकीय नेत्यांना ‘इम्प्रेसिव लूक’ दिला.एका धाटणीचे कपडे घातलेनाहीत, तर आपले मतदारहीआपल्याला स्वीकारणार नाहीत, हा राजकारण्यांमधील न्यूनगंड काढून टाकण्याचे मोठे श्रेय माधव अगस्ती यांना जाते. आजचे आमदार, खासदार, मंत्री वेगवेगळ्या फॅशनचे कपडे घालतात. ते सगळेच माधवरावांकडे जातही नसतील, पण ज्यांच्याकडे बघून त्यांनी पेहरावाची विशिष्ट चौकट तोडली, ते सगळे राजकारणी माधव टेलर यांच्याकडूनच कपडे शिवून घेत वा अजूनही शिवून घेतात.राष्ट्रपती रामनाथ कोविंद, माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जीपासून अनेक दिग्गज नेत्यांचे कपडे ते शिवतात.कोविंद यांनी राष्ट्रपतिपदाची शपथ घेतली, तेव्हा घातलेला सूटहा माधवरावांनीच शिवलेला होता. भाजपाच्या नेत्यांशी त्यांची ओळख करून देण्यासाठी एके काळी हात धरून घेऊन गेले ते वेदप्रकाश गोयल. म्हणजे आताचे केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांचे वडील.आज माधवरावांना जगभरातून बोलावणे असते. व्यवसायाची ५० वर्षे पूर्ण करताना त्यांना पत्नी मृणाल अन् दोन्ही मुलांची (राहुल आणि शंतनू) यांची उत्तम साथ लाभली आहे. उच्चशिक्षित असलेली ही दोन्ही मुले मुंबईतच व्यवसायाची धुरा नवनव्या फॅशन्सचा वेध घेत सांभाळत आहेत.बाबूजींशी खास ऋणानुबंध‘लोकमत’चे संस्थापक दिवंगत बाबूजी जवाहरलाल दर्डा यांच्याशी माधव अगस्ती यांचा खास ऋणानुबंध. ते भारावून सांगतात, ‘बाबूजी हे माझे पहिले व्हीआयपी ग्राहक. मी शिवून दिलेले नीटनेटके कपडे तेवढ्याच रुबाबदार बाबूजींनी घालणे, याची राजकीय वर्तुळात नेहमीच कौतुकाने चर्चा व्हायची. माझ्या कारकिर्दीच्या प्रारंभी बाबूजी माझ्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले,’ अशी कृतज्ञताही त्यांनी व्यक्त केली.