शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
2
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
3
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
4
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
6
तिसरी बार, १०० पार; भाजपाला 'ही' हॅटट्रिक जमेल? नेमकं कसं आहे समीकरण
7
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
8
"लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, तेव्हा...;" रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका 
9
श्रद्धा वॉकर हत्याकांडातील आरोपी आफताब बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर, तिहार प्रशासन सतर्क
10
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
11
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
12
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
13
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब
14
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
15
"...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये"; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल
16
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
17
Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!
18
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
19
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
20
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी त्रिपुरी वात जाळा; महादेवाच्या कृपेने दुःख-दैन्य टाळा!

टीसी-सीबीआय अधिका-यांमध्ये ‘फ्री स्टाईल’

By admin | Published: January 16, 2015 6:10 AM

विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून वसूल केलेला दंड स्वत:च्या खिशात भरणारे तीन टीसी गजाआड झाले.

मुंबई : विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून वसूल केलेला दंड स्वत:च्या खिशात भरणारे तीन टीसी गजाआड झाले. टिळकनगर रेल्वे स्थानकात गुरुवारी पहाटे ६च्या सुमारास सीबीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली. या कारवाईदरम्यान टीसींनी सीबीआय अधिकाऱ्यांना मारहाण करून पळ काढला. याबद्दल त्यांच्याविरोधात वडाळा रेल्वे ठाण्यात स्वतंत्र गुन्हा नोंदविण्यात आला आहे.अमितकुमार सिंग (२८), विजय व्होडा (३९), नरेश कुमार (३९) अशी अटक झालेल्या टीसींची नावे आहेत. हे तीन टीसी गेल्या अनेक दिवसांपासून टिळकनगर रेल्वे स्थानकात कर्तव्यावर होते. विनातिकीट प्रवास करणाऱ्या किंवा मालवाहतुकीचे नियम मोडणाऱ्या प्रवाशांना ते अडवत. त्यांच्याकडून दंडही वसूल करीत. मात्र त्या दंडाची पावती देत नसत. जमा झालेले पैसे या तिघांच्या खिशात जात असत. या घोटाळ्याची माहिती सीबीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला मिळाली. सीबीआय अधिकाऱ्यांनी पहाटेच टिळकनगर रेल्वे स्थानकात सापळा रचला.नेहमीप्रमाणे आरोपी टीसी स्थानकात आले. त्यांनी प्रवाशांना पकडले. दंडाची रक्कम खिशात भरू लागले. हे पाहून सीबीआय अधिकाऱ्यांनी या तिघांना घेराव घालून ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा तिघांनी सीबीआय अधिकाऱ्यांवर हात उचलला. आरोपी टीसींनी सीबीआय अधिकाऱ्यांना मारहाण करून पावत्या, प्रवाशांकडून उकळलेले पैसे तिथेच फेकून पळ काढला. तसेच पळतापळता त्यांनी स्वत:चे कपडेही फाडले. मात्र सीबीआय अधिकाऱ्यांनीही पाठलाग करून तिघांना पकडले. सीबीआयने या तिघांविरोधात लाचखोरीचा गुन्हा नोंदविला. तसेच वडाळा रेल्वे पोलीस ठाण्यात या तिघांविरोधात सरकारी कामात अडथळा, मारहाण आणि जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याची तक्रार नोंदवली. त्यानुसार वडाळा पोलिसांनी आरोपी टीसींविरोधात स्वतंत्र गुन्हा नोंदविला. या प्रकरणी वडाळा रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक प्रमोद धावरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन्ही आरोपी सीबीआयच्या ताब्यात आहेत. (प्रतिनिधी)