लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यातील सर्व मंडळांच्या, सर्व माध्यमांच्या सर्व शाळांमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत होण्यासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात येणारी परीक्षा यंदा २२ जुलै रोजी होणार आहे. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०१७साठी ३० जूनपर्यंत अर्ज करता येणार आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्यातर्फे महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०१७ (MAHATET2017) ची नोंदणी प्रक्रिया ३० जूनपर्यंत सुरू राहणार आहे. या परीक्षेसंदर्भातील माहिती www.mahatet.in आणि www.mscepune.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेचा आॅनलाइन अर्ज व शुल्क भरण्याचा कालावधी १५ ते ३० जून असा आहे.
शिक्षक पात्रता परीक्षा २२ जुलैला
By admin | Published: June 20, 2017 1:22 AM