मुंबई : शिक्षक व शिक्षकेतर भरतीसाठी येत्या शुक्रवारी (१ सप्टेंबर) पवित्र पोर्टल सुरू करण्यात येईल. पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी पात्र उमेदवारांनी १५ दिवसांची मुदत दिली जाणार आहे, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिली.
शिक्षक भरतीसाठी शालेय शिक्षण विभाग मागील काही महिन्यांपासून विविध प्रक्रियेवर काम करीत आहे. अजूनही १४ लाख विद्यार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण बाकी आहे. त्यामुळे संचमान्यता व रोस्टरचे काम अंतिम झालेले नाही. मात्र, ९५ टक्के संचमान्यता व रोस्टरचे काम झाल्याचे सरकारचे म्हणणे आहे.
पुढील दोन महिन्यांत पहिल्या टप्प्यात ३० हजार शिक्षकांची भरती करण्यात येईल, तर त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात २० हजार शिक्षकांची भरती केली जाईल, असे केसरकर यांनी सांगितले.