मुंबई : महाराष्ट्र विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाली आहे. नाशिक, अमरावती पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाली आहे. तर औरंगाबाद, नागपूर आणि कोकण शिक्षक मतदारसंघाची देखील निवडणूक जाहीर झाली आहे. त्यामुळे या आगामी निवडणुकीकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निर्णयानुसार ३० जानेवारी २०२३ ला मतदान होणार आहे. तर, २ फेब्रुवारीला मतमोजणी होईल. या संदर्भात ५ जानेवारीला अधिसूचना निघणार आहे. राज्यात २ पदवीधर मतदारसंघ आणि ३ शिक्षक मतदारसंघाच्या जागांसाठी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी १२ जानेवारीपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे.
दरम्यान, नाशिक पदवीधर मतदारसंघात काँग्रेसचे सुधीर तांबे, अमरावती पदवीधर मतदारसंघातील भाजपचे रणजीत पाटील आणि औरंगाबाद शिक्षक मतदारसंघात राष्ट्रवादीचे विक्रम काळे, कोकण शिक्षकमध्ये बाळाराम पाटील आणि नागपूरचे नागो गाणार हे दोन या अपक्ष आमदारांच्या मतदारसंघात निवडणूक आयोगाने ही निवडणूक जाहीर झाली आहे. या मतदार संघात कोण बाजी मारणार, हे पाहण्यासाठी आगामी निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.
स्थानिक स्वराज संस्था मतदारसंघाची निवडणूक प्रलंबितमहाराष्ट्र विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज संस्था मतदारसंघांची निवडणूक देखील प्रलंबित आहे. मात्र, त्या जागांवरील निवडणूक जाहीर झालेली नाही.