मुंबई : विधान परिषदेच्या शिक्षक मतदारसंघातील कोकण, नागपूर व औरंगाबाद विभागातील शिक्षक परिषदेच्या उमेदवारांना रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाने (आठवले) पाठिंबा घोषित केला आहे. रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी ही घोषणा केली.शिक्षक परिषदेतर्फे कोकणातून वेणुनाथ कडू, नागपूर विभागातून नागो गाणार व औरंगाबाद विभागातून सतीश पत्की शिक्षक परिषदेचे उमेदवार आहेत. आठवले यांनी शिक्षकांना संबंधित उमेदवारांना विधान परिषदेवर निवडून देण्याचे आवाहन केले आहे. ३ फेब्रुवारी रोजी या तीनही विभागांत मतदान होणार असून, रिपाइं शिक्षक परिषदेच्या पाठीशी असल्याचे आठवले यांनी स्पष्ट केले. रिपाइंच्या पाठिंब्यामुळे शिक्षक मतदारसंघात शिक्षक परिषदेचेच उमेदवार निवडून येतील, असा विश्वास शिक्षक परिषदेचे अनिल बोरनारे यांनी व्यक्त केला आहे. (प्रतिनिधी)>महादेव सुळेही रिंगणातकोकण शिक्षक मतदारसंघातून महाराष्ट्र काँग्रेस शिक्षक सेलचे उपाध्यक्ष महादेव सुळे हे मंगळवारी अर्ज दाखल करणार आहेत. याआधी सुळे यांनी सोमवारी अर्ज करण्याची घोषणा केली होती. मात्र शिक्षकांच्या आग्रहास्तव मंगळवारी सकाळी १० वाजता कोकण भवन येथे अर्ज भरणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
शिक्षक परिषदेस रिपाइंचा पाठिंबा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2017 2:24 AM