शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या ₹1500 चे लवकरच ₹2100 होणार, मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा!
3
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
4
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
5
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
6
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
7
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
8
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
9
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
10
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
11
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
12
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
13
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
14
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
15
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
16
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
17
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
18
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
19
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया

रातोरात शिक्षकांनी स्वत:बरोबर मुलांनाही केले अपंग, मतिमंद

By admin | Published: June 04, 2016 12:33 AM

समानीकरणातून वाचण्यासाठी बारामतीचे दोन शिक्षक रातोरात एका संघटनेचे कोषाध्यक्ष झाल्याचा प्रकार ताजा असतानाच इंदापूरमध्ये काही शिक्षकांनी स्वत:बरोबर मुलांनाही अपंग, मतिमंद केल्याचे उघडकीस येत आहे.

इंदापूर : समानीकरणातून वाचण्यासाठी बारामतीचे दोन शिक्षक रातोरात एका संघटनेचे कोषाध्यक्ष झाल्याचा प्रकार ताजा असतानाच इंदापूरमध्ये काही शिक्षकांनी स्वत:बरोबर मुलांनाही अपंग, मतिमंद केल्याचे उघडकीस येत आहे.पस्ौा व समानीकरणातून तालुकाबाह्य झालेल्या शिक्षकांच्या बदल्या रद्द करण्यासाठी हे प्रकार सुरू आहेत. १३ मे रोजी पेसा अंतर्गत इंदापूर तालुक्यातील ४ शिक्षक व उर्वरित तालुक्यांमधून २२ शिक्षक घेऊन त्या जागा भरण्यात आल्या. आदिवासी भागातील ‘खडतरपणा’मुळे या बदल्यांना शिक्षकांच्या संघटनांनी विरोध केला. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी शिक्षकांच्या संघटनांनी चर्चा केली. सर्व बदल्या रद्द करण्यात आल्या.यानंतर गेल्या २८ तारखेला परत एकदा बदल्या झाल्या. एकूण ५७ जणांचा त्यामध्ये समावेश होता. त्या बदल्यांबाबत येत्या पाच तारखेला जिल्हा परिषदेत अंतिम निर्णय होणार आहे. त्याआधी झालेल्या बदल्या रद्द करण्यासाठी शिक्षक गण नानाविध क्लृप्त्या लढवत असल्याचे उघड होत आहे. शिक्षक स्वत: अपंग असल्याचा दाखला असल्यास त्यास दरमहा दोन हजार रुपये अपंग भत्ता मिळतो. प्राप्तिकरातून दरमहा दोनशे रुपये सूट मिळते. जर मुले अपंग वा मतिमंद असतील तर बदली रद्द होते. शिक्षक संघटनेचे पदाधिकारी असाल तरीही बदली टळते. हे बदली टाळण्याचे रस्ते मिळाल्याने त्याच रस्त्यांनी शिक्षकांची वाटचाल सुरू आहे. बोरी नावाच्या बागायती गावातील तब्बल तीस शिक्षकांनी अपंग असल्याचे बोगस दाखले आणले आहेत. ४५ ते ५० टक्के शिक्षकांनी स्वत: अपंग असल्याचे दाखले आणले आहेत. आठ ते दहा शिक्षकांनी मुले मतिमंद असल्याचे, तर पाच ते सात शिक्षकांनी मुले अपंग असल्याचे दाखले आणले आहेत. शिक्षक संघटनांचे अध्यक्ष, कार्याध्यक्ष, कोषाध्यक्ष, सरचिटणीस असणाऱ्यांना बदलीतून सूट दिली जात असल्याने, या पदावर रातोरात नेमणुका होण्याची साथ सुरू झाली आहे. एका काँग्रेस पक्षप्रणित शिक्षक संघटनेमध्ये शिक्षक पती अध्यक्ष व त्याची शिक्षक पत्नी सरचिटणीस म्हणून कार्यरत आहे. दोन वर्षांत या संघटनेने प्रशासनाशी कसलाही पत्रव्यवहार केला नाही. संघटनेत इतर तालुक्यातील पदाधिकारी नाहीत. मात्र सरचिटणीस या पदामुळे त्या शिक्षिकेची बदली रद्द झाली आहे.> बदलीस स्थगिती द्यावीइब्टा नावाच्या संघटनेचे शिक्षक संघटना जिल्हास्तरावर काम करते. त्या संघटनेचे सर्व पदाधिकारी इंदापूर तालुक्यातील आहेत. मात्र पदाधिकारी असल्याचे पत्र आणून एका शिक्षिकेने आदिवासी भागात झालेली आपली बदली रद्द केली आहे, असे प्रकार शरद कृष्णा काकडे या शिक्षकाने निवेदनाद्वारे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना कळविले आहेत. बदलीतून सूट मिळवण्यासाठी बोगस कागदपत्रांचा आधार घेण्यात आला आहे. बदलीस पात्र असणारे शिक्षक रातोरात संघटनांचे पदाधिकारी कसे झाले? हा सवाल उपस्थित केला आहे. या सर्व प्रकरणांची चौकशी होईपर्यंत आपल्या बदलीस स्थगिती देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. >इंदापूरला आज तालुका बदल्याइंदापूर तालुक्यातील ९२ शिक्षकांच्या प्रशासकीय, तर ४६ शिक्षकांच्या विनंती बदल्या होणार आहेत. उद्या तालुक्यातील बहुतेक शिक्षक, त्यांच्या संघटना बदल्यांच्या मुद्द्यावर इंदापूर पंचायत समितीमध्ये येणार आहेत. जिल्हा परिषदेच्या पाच तारखेच्या निर्णयाआधी इथेच निकाल लावण्याचा त्यांचा इरादा आहे.