शहरं
Join us  
Trending Stories
1
लढायचं की पाडायचं? मनोज जरांगेंनी २० तारखेला बोलावली अंतिम बैठक
2
ठाकरेंवर टीका करून पक्ष सोडला होता; आता ८ महिन्यात शिंदेसेनेलाही रामराम केला, कारण...
3
Maharashtra Assembly Election 2024 : 'एक महिन्यापासून अजितदादांसोबत बोललो नाही'; राजेंद्र शिंगणे मोठा निर्णय घेणार? दिले स्पष्ट संकेत
4
ICC कडून डिव्हिलियर्सला 'हॉल ऑफ फेम'; विराटचे मित्रासाठी लांबलचक पत्र, आठवणी अन्...
5
बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर अरबाज खानची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "कुटुंबात खूप काही..."
6
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीला जबर धक्का, जुन्या मित्रपक्षानं सोडली भाजपाची साथ, स्वबळावर लढणार 
7
'बिग बॉस'च्या घरातून बाहेर आल्यानंतर गुणरत्न सदावर्तेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले- "माझी पत्नी जयश्री..."
8
"...तर समाजवादी पार्टी स्वबळावर निवडणूक लढवणार", अबू आझमींचा महाविकास आघाडीला इशारा
9
3 दिवसांत 12 भारतीय विमानांना बॉम्बच्या धमक्या; आता गृहमंत्रालय करणार कडक कारवाई...
10
'मशाली'सारखा 'तुतारी'ला फटका; काँग्रेसच्या सांगली पॅटर्नची विदर्भात पुनरावृत्ती? 
11
राष्ट्रवादीतून मोठी आऊटगोईंग?; प्रश्न विचारताच अजित पवार भडकले, खंबीर असल्याचं सांगत म्हणाले...
12
मुख्यमंत्री शिंदेंनी ‘रिपोर्टकार्ड’वर नव्हे तर ‘रेट कार्ड’वर बोलावे; नाना पटोलेंचे टीकास्त्र
13
महाराष्ट्रात कोण असेल महायुतीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा? देवेंद्र फडणवीसांचं सूचक विधान
14
“आम्ही ठरवले आहे की पुन्हा सत्तेत आल्यास बहि‍णींना ३ हजार देणार”; शिंदे गटातील नेत्याचा शब्द
15
10 पत्नी, ६ गर्लफ्रेंड, जग्वार अन् विमानातून प्रवास; शौकीन चोराची चक्रावून टाकणारी गोष्ट!
16
दुसऱ्यांदा विमान बॉम्बने उडवण्याची धमकी, अकासा एअरच्या प्लेनचे दिल्लीत इमर्जन्सी लँडिंग
17
२ तास ३५ मिनिटं घाबरवलं; डिजिटल अरेस्ट करून वृद्धाला २८ लाखांचा गंडा, एक कॉल अन्...
18
जम्मू काश्मीरमध्ये बिघडला 'इंडिया' आघाडीचा खेळ; सत्तास्थापनेत काँग्रेस बाहेर
19
UPI पेमेंट सर्व्हिस लवकरच ५० नवीन ॲप्सवर मिळणार, NPCI कडून मोठी घोषणा
20
भारताला वर्ल्ड कप जिंकवून देणारा कोच आता मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात, अखेर घरवापसी झाली

शिक्षक आमदारकीची मदार ठाणे जिल्ह्यावर

By admin | Published: January 17, 2017 6:10 AM

कोकण विभाग शिक्षक मतदारसंघात पुन्हा शिवसेना-भाजपा परस्परांत भिडणार आहेत.

ठाणे : कोकण विभाग शिक्षक मतदारसंघात पुन्हा शिवसेना-भाजपा परस्परांत भिडणार आहेत. या मतदारसंघावर आजवर भाजपा पुरस्कृत उमेदवाराचाच विजय झालेला असला, तरी या वेळी मावळते आमदार रामनाथ मोते यांनी केलेल्या बंडामुळे भाजपाचे कितपत नुकसान होते, यावर सारी गणिते अवलंबून राहणार आहेत. उमेदवारी अर्ज भरण्याचा मंगळवारी शेवटचा दिवस असून, माघारीनंतरच लढतीचे नेमके चित्र स्पष्ट होईल. मात्र, निम्मे मतदार ठाणे जिल्ह्यात असल्याने, या जिल्ह्याचाच निवडणुकीवर प्रभाव राहील. शिक्षक परिषदेने या वेळी रामनाथ मोते यांच्याऐवजी बदलापूर येथील वेणुनाथ कडू यांना उमेदवारी दिली आहे. ते संघटनेचे राज्य व कोकण अध्यक्ष आहेत आणि त्यांना भाजपाने पाठिंबा जाहीर केला आहे. शिक्षक भारतीचे उमेदवार अशोक बेलसरे हेदेखील बदलापूरचे असून, ते दुसऱ्यांदा निवडणूक लढवित आहेत. कुळगांव-बदलापूरचे नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांचे बंधू ज्ञानेश्वर म्हात्रे यांना शिक्षक सेनेची उमेदवारी मिळाली आहे. या लढाईत अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरून मोते यांनी रंगत आणली आहे. या चार उमेदवारांव्यतिरिक्त रायगडचे शेकाप पुरस्कृत उमेदवार बाळाराम पाटीलही निवडणुकीच्या रिंगणात आहेत. ते काँग्रेस, राष्ट्रवादीचा पाठिंबा मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. २० जानेवारीला उमेदवारी मागे घेण्याची मुदत आहे. त्यानंतर, लढतीचे अंतिम चित्र स्पष्ट होईल. या पाच उमेदवारांपैकी चार उमेदवार ठाणे जिल्ह्यातील बदलापूर, उल्हासनगर येथील आहेत. या निवडणुकीसाठी ३७ हजार ६४४ मतदार आहेत. त्यातील १५ हजार ७६३ मतदार ठाणे जिल्ह्यात आहेत. पालघर जिल्हात पाच हजार ११५, रायगडमध्ये दहा हजार नऊ, रत्नागिरीत चार हजार ३२८ आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात दोन हजार ४५६ शिक्षक मतदार आहेत. (प्रतिनिधी)