मुंबई : उन्हाळ्याची दीर्घ सुट्टी मुलांना असते शिक्षकांना नाही, या शिक्षण सचिव नंदकुमार यांच्या विधानाने सध्या शिक्षकांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. शिक्षण व्यवस्थेच्या बळकटीकरणासाठी शिक्षकांना ही दीर्घ सुट्टी आवश्यक आहे. त्यामुळे शिक्षण विभागाने सुट्टीत कोणतीही वारी, प्रशिक्षण अथवा शाळाबाह्य कामे लावू नयेत, असे मत शिक्षकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.वर्षभर सतत उपक्रम, नोंदी, रॅली, उत्सव, गॅदरिंग, सहल, यू डायसवर शालेय माहिती भरणे, सरल, अल्पसंख्यांक फॉर्म, निवडणूक, जनगणनाड्युटी, विद्यार्थी वाहतूक नोंदी, चाचण्या पेपर्स, सहामाही, वार्षिक पेपर्स सेट करणे, वह्या तपासणे, शाळाबाह्य सर्वेक्षण आदी जबाबदाऱ्या शिक्षकांवर सोपविण्यात येतात, तसेच शिक्षकांना दैनंदिन अध्यापनासोबतच शिक्षण विभागाच्या अशैक्षणिक कामाला जुंपले जाते. मात्र, वर्षभर इतके राबूनही जर शिक्षकांच्या उन्हाळी किंवा दीर्घ सुट्टीवर आक्षेप घेतले जात असतील, तर ते योग्य नाही, असे मत शिक्षण समूहातील अनेक शिक्षकांनी व शिक्षणतज्ज्ञांनी व्यक्त केले.शिक्षकांना सरकारी व बँक कर्मचाºयांना मिळणाºया सुट्ट्या देण्यात येत असल्याने अनेकांचा गैरसमज होतो. मात्र, शासकीय कर्मचाºयांना दुसरा व चौथा शनिवार सुट्टी असते. ती शिक्षकांना नसते. शिक्षकांना वर्षभरात केवळ १० अर्जित रजा व १२ कॅज्युअल लिव्ह असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे अनिल बोरनारे यांनी दिली. प्रत्यक्षात दिवाळी व मे महिना इतकीच सुट्टी शिक्षकांना असते. त्यामुळे त्याबाबत आक्षेप घेणे योग्य नसल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवितात. त्यामुळे जेव्हा विद्यार्थ्यांना सुट्टी असते, तेव्हा शिक्षकांनाही ती मिळायलाच हवी. त्यांना त्यापासून वंचित ठेवायचा प्रयत्न का केला जातो आहे? मुळात असलेल्या सुट्ट्याही शिक्षकांना उपभोगू दिल्या जात नाहीत. त्यातही प्रशिक्षण, शाळेची कामे असतात. प्रत्यक्षात शिक्षक बौद्धिक काम करत असल्याने, त्यांना दीर्घ सुट्टीची आवश्यकता आहेच. शिक्षकांना दीर्घ सुट्टी असायलाच हवी.- उदय नरे, शिक्षक, हंसराज मोरारजी पब्लिक स्कूल, अंधेरी.नियमानुसार सुट्टी द्याबौद्धिक काम करावे लागत असल्यामुळे शिक्षही थकतात, शिवाय अनेक नवीन उपक्रम हाती घेण्यासाठी शिक्षकांना सुट्टीची गरज आहेच. शिक्षकांनी उन्हाळी सुट्टीच्या काळात काम करावे, असे अपेक्षित असेल, तर इतर कर्मचाºयांना नियमानुसार वर्षभरात ज्या सुट्ट्या मिळतात, त्या सर्व सुट्ट्या शिक्षकांनाही मिळायला हव्यात.- वसंत काळपांडे, शिक्षणतज्ज्ञ.
शिक्षकांना उन्हाळ्याची सुट्टी गरजेची!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2018 4:52 AM