दीपक जाधव।पुणे : प्राथमिक शाळांमधील शिक्षकपदाची पात्रता असलेल्या डी. एड. (डीटीएड) अभ्यासक्रम प्रवेशाच्या सर्व ५ फे-या पूर्ण झाल्यानंतरही राज्यातील एकूण ६० हजार जागांपैकी ५० हजार जागा रिक्त राहिल्या आहेत. मिळणा-या नोक-यांची शक्यता खूपच कमी उरल्याने शिक्षकी पेशाला नकार मिळत आहे. यंदा डी.एड.साठी १६ टक्के प्रवेश होऊन अनेक जागा रिक्त राहिल्याने अध्यापक महाविद्यालयांचे अस्तित्व धोक्यात आले आहे.बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर ९४९ डी.एड. महाविद्यालयांच्या ६० हजार जागांसाठी आॅनलाइन पद्धतीने ३१ मे ते ३१ जून या कालावधीत प्रवेशाच्या ५ फेºया पार पडल्या. यासाठी राज्यभरातून १० हजार ८०० अर्ज प्राप्त झाले, त्यापैकी ९ हजार ८४६ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले.डीएड प्रवेश स्थिती-एकूण महाविद्यालये : ९४९एकूण जागा : ६० हजारप्रवेशासाठीचे अर्ज : १० हजार ८००प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची संख्या : ९ हजार ८४६रिक्त जागा : ५० हजार १५४
शिक्षकी पेशा...नको रे बाबा! केवळ ९ हजार ८४६ प्रवेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 02, 2017 3:53 AM