बारामती : कोरोनामुळे बदल्या होणार नाही असे वाटत असताना अचानक शासनाने ३१ जुलै पूर्वी राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या करण्याच्या सुचना दिल्या आहेत. त्यामुळे राज्यातील प्राथमिक शिक्षकांनी सोयीच्या बदल्यांसाठी ज्येष्ठ नेते शरद पवार यांना साकडे घातले आहे .पवार यांच्यासह प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या सूचनेनुसार शिक्षक नेते संभाजीराव थोरात यांच्या नेतृत्वाखाली शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाची ग्रामीण विकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासोबत आज कोल्हापूर येथे बैठक होत आहे .ग्रामविकास विभागाच्या निर्णयाकडे राज्यभरातील शिक्षकांचे लक्ष लागले आहे. शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब मारणे यांनी याबाबत माहिती दिली. प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या ३१ जुलै पूर्वी करण्याचा आदेश राज्य शासनाने जिल्हा परिषदांना दिला आहे, २७ फेब्रुवारी १७ च्या जुन्या शासन निर्णयाप्रमाणे या बदल्या होत आहेत.जुन्या शासन निर्णयामुळे यावर्षी विस्थापित ,रँडम राऊंड , समानीकरण, आंतर जिल्हा बदलीने आलेले शिक्षक, पती पत्नी तसेच एकल यापैकी कोणत्याही शिक्षकांना विशेष लाभ मिळत नसल्याने शिक्षकांमध्ये नाराजी आहे. प्राथमिक शिक्षक संघाच्या कोल्हापूर येथील महामंडळ सभेत शरद पवार यांच्या उपस्थितीत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी बदली धोरणात दुरुस्ती करून सोयीच्या बदल्या करण्याची घोषणा केली होती .त्यानंतर शासनाने संघटनांची भूमिका समजून घेण्यासाठी पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारीआयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यास गटाची स्थापना केली होती.या अभ्यासगटाचा अहवाल प्रतीक्षेत असतानाच अचानक राज्य सरकारने ३१ जुलै पूर्वी बदल्या करण्यास सुचविले आहे.त्यामुळे शिक्षक नेते संभाजीराव थोरात, राज्याध्यक्ष बाळकृष्ण तांबारे यांनी शरद पवार यांच्याकडे सोयीच्या बदली धोरणासाठी आग्रह धरला आहे.
सोयीच्या बदल्यांसाठी शरद पवारांना साकडे; ग्रामविकास विभागाच्या निर्णयाकडे राज्यभरातील शिक्षकांचे लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2020 11:28 AM
प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या ३१ जुलै पूर्वी करण्याचा आदेश राज्य शासनाने जिल्हा परिषदांना दिला आहे..
ठळक मुद्देआज शिक्षक संघाची ग्रामविकास मंत्र्यांसोबत कोल्हापूरमध्ये बैठक