शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारत एक हिंदू राष्ट्र, आपल्या सुरक्षिततेसाठी...; सरसंघचालक मोहन भागवत यांचं हिंदूंना मोठं आवाहन
2
तिलक वर्मा की नितीश रेड्डी? मयंक यादव की रवी बिश्नोई? आकाश चोप्राने निवडली टीम इंडियाची Playing XI
3
"..तर मी स्वतः पीएम नरेंद्र मोदींसाठी प्रचार करेन", अरविंद केजरीवालांचे मोठे वक्तव्य
4
Maharashtra Elections 2024: दादाजी भुसेंविरोधात उद्धव ठाकरेंचा उमेदवार ठरला!
5
चेंबूर आग दुर्घटनेची होणार सखोल चौकशी; मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५ लाख देण्याची CM शिंदेंची घोषणा
6
Beed: चिमुरडीने फोटो बघितला अन् बलात्कारी शिक्षकाला पोलिसांनी केली अटक
7
Israel-Hamas war : हिजबुल्लाहने सेल्सगर्लवर विश्वास ठेवून केली चूक; झाला मोठा घात, इस्त्रायल १० वर्षापासून पेजरवर काम करत होते
8
अजित पवारांना बसणार मोठा झटका! 'तुतारी हाती घ्यायची का?', रामराजेंना कार्यकर्त्यांनी दिला 'होकार'
9
"पिझ्झा घेऊन पोलीस स्टेशनमध्ये जाता, ही मस्ती घरी दाखवायची"; सुप्रिया सुळेंची सुनील टिंगरेंवर जहरी टीका
10
"मोदींनी भाषण करण्यापूर्वी थोडा..."; संजय राऊतांनी पंतप्रधानांना पाटील, राठोडांवरून घेरलं
11
धक्कादायक! श्री रामची भूमिका साकारताना स्टेजवरच हृदयविकाराचा झटका, लाइव्ह परफॉर्मन्स दरम्यान मृत्यू झाला
12
गाझातील मशिदी आहेत 'हमासचा अड्डा'? इस्रायल बनवतोय निशाणा, एअर स्ट्राइकमध्ये अनेकांचा मृत्यू
13
चुकीच्या दिशेने आलेल्या टेम्पोची कारला जोरदार धडक; माय लेकरांसह चौघे ठार, तिघे गंभीर
14
EPF च्या पैशाने होमलोनची परतफेड करणे योग्य आहे का? समजून घ्या हिशोब
15
आता नेतन्याहू फ्रान्सवर भडकले! लेबनॉनमध्ये फ्रेन्च कंपनीवर इस्रायची बॉम्बिंग, नेमकं काय घडलं?
16
काँग्रेस आमदार हिरामण खोसकर अचानक शरद पवारांच्या भेटीला; कारण आले समोर
17
बच्चू कडूंना CM शिंदेंनी दिला जबर झटका! प्रहारचा 'हा' आमदार शिवसेनेत करणार प्रवेश?
18
चेंबुरमध्ये पहाटे अग्नितांडव; चाळीत लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील सात जणांचा मृत्यू
19
"त्यांना लाज वाटली पाहिजे", पंतप्रधान नेतन्याहू फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांवर भडकले
20
दुकानातल्या रॉकेलने केला घात; छेदिराम गुप्तांनी पत्नी, मुलगा, सून नातवडं सर्वांनाच गमावलं

गळक्या वर्गात सुरू आहे शिक्षण

By admin | Published: July 19, 2016 3:56 AM

शहरातील पद्मानगर येथील शाळा क्र मांक ५९ च्या वर्गातील पत्रे तुटल्यामुळे पाणी गळत असून पत्रा पडण्याच्या भीतीने पालकांनी महापालिकेच्या मुख्यालयात धाव घेतली.

भिवंडी : शहरातील पद्मानगर येथील शाळा क्र मांक ५९ च्या वर्गातील पत्रे तुटल्यामुळे पाणी गळत असून पत्रा पडण्याच्या भीतीने पालकांनी महापालिकेच्या मुख्यालयात धाव घेतली. अशा गळक्या वर्गातच विद्यार्थ्यांना शिक्षण घ्यावे लागत आहे.महापालिका शिक्षण मंडळाच्या शाळेतील गळक्या वर्ग खोल्या, परिसरातील अस्वच्छता, नादुरु स्त स्वच्छतागृह, उघड्यावरील वीज वाहिन्या यामुळे विद्यार्थ्यांना अशा वातावरणाचा उबग आल्याने शेवटी सोमवारी तेलगू माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांसह भिवंडी महापालिका आयुक्त कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन केले. पालिका अधिकाऱ्यांनी सात दिवसात दुरु स्तीचे आश्वासन विद्यार्थी व पालकांना दिले. २०१४ मध्ये प्रभाग समिती कार्यालयाची इमारत झाल्यानंतर येथील इमारतीत महापालिकेच्या वतीने माध्यमिक शाळांचे वर्ग सकाळच्या सत्रात तर दुपारच्या सत्रात मराठी प्राथमिक शाळेचे वर्ग भरविले जातात. या शाळेच्या वर्ग खोल्यांवरील पत्रे तुटलेले असल्याने पावसाळ््यात वर्गखोल्यांमध्ये पाणी गळत असून अशा वर्गात बसणे विद्यार्थ्यांच्या नशिबी आले आहे. खिडक्यांची तावदाने तुटलेली असल्याने पावसाची झड खिडक्यांमधून येते. याचा विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. तसेच वर्गातील वायर लटकत आहेत. पंखा, ट्यूूब सुरु करण्यासाठी गेले असता विद्यार्थ्यांना विजेचा धक्का लागला आहे. त्यासोबतच येथील स्वच्छतागृहांची दुरवस्था झाली असून दुर्गंधी पसरली आहे. या प्रकारांमुळे हवालदिल झालेल्या विद्यार्थ्यांनी पालकांसोबत महापालिका मुख्यालयात आयुक्तांचा दरवाजा ठोठावला. आयुक्त कार्यालयात नसल्याने विद्यार्थी व पालकांनी कार्यालया बाहेर सुमारे एक तास ठिय्या आंदोलन केले. आयुक्त आल्यानंतर त्यांनी विद्यार्थी व पालकांशी चर्चा करुन सात दिवसात शाळा इमारतीची दुरु स्ती करण्याचे आश्वासन आंदोलकांना दिले. या शाळेच्या परिसरात अस्वच्छता असून शाळेच्या मागील बाजूस उकिरडा झाला आहे. सांडपाण्याच्या दुर्गंधीत विद्यार्थ्यांना शिक्षण घ्यावे लागते. (प्रतिनिधी)>पालिकेला पत्र पाठविले होते मुख्याध्यापिका अरु णा सामल यांनी सांगितले की, शाळा जूनमध्ये सुरु होण्यापूर्वीच वर्ग खोल्यांची दुरु स्ती करावी याबाबत महापालिका प्रशासन, शिक्षण मंडळ व नगरसेवक यांना पत्र देऊन विनंती केली होती.यापूर्वी शाळेतील वर्गखोल्यांमध्ये लावलेले पीओपी शाळा सुरु असताना पडले होते. येथील कार्यालय इतरत्र स्थलांतरीत केल्यानंतर अधिकाऱ्यांनी शाळांच्या खोल्या सुधारणे आवश्यक होते. नवीन कार्यालये सजविली आणि वर्गखोल्यांकडे दुर्लक्ष केले. - रेवती नंदाल, पालक.शाळेच्या बाजूची भिंतही कोसळली आहे. त्यामधून लहानमुले ये-जा करत असतात. तेथील गटाराचे चेंबरही उघडे आहे. त्यामधून मुलांच्या अपघाताची शक्यता आहे. - सुनिता भैरी,पालक.वर्गांबाबत तक्रारी आल्यानंतर पाहणी करुन त्या कामाचे अंदाजपत्रक बनविले आहे. त्यासाठी दोन लाख खर्च येणार असून लवकर काम सुरु होईल. - अरुण निर्भवणे, अभियंता