शहरं
Join us  
Trending Stories
1
जयश्री थोरातांवर बोलताना भाजपा नेत्याची जीभ घसरली; संगमनेरमध्ये तणाव, वाहनांची तोडफोड
2
तुला नाउमेद करणार नाही; उद्धव ठाकरेंचा नाराज सुधीर साळवींना शब्द, शिवडीतील बंड थंड
3
IND vs AUS: ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर, पाहा कुणाला संधी?
4
काँग्रेसला कमी जागा मिळाल्याने राहुल गांधी नाराज; नाना पटोलेंनी सांगितले बैठकीत काय झालं?
5
बंडखोरी जिव्हारी; फक्त अजित पवारच नाही, शरद पवारांच्या हिटलिस्टमध्ये राष्ट्रवादीचे 'हे' 10 नेते
6
इन आँखो की मस्ती में... बॉलिवूड गाजवणाऱ्या मराठमोळ्या मृणाल ठाकूरचं 'रॉयल' फोटोशूट (Photos)
7
मेहबूब शेख यांच्या उमेदवारीमागे वेगळीच शंका; माजी आमदारांसह १५० पदाधिकाऱ्यांचा राजीनामा
8
पदयात्रेदरम्यान अरविंद केजरीवालांवर हल्ला; AAP चा दावा, भाजपवर हल्ल्याचा आरोप
9
Maharashtra Assembly election 2024: काटोलमध्ये महाविकास आघाडीत, तर उमरेडमध्ये महायुतीत बंडखोरी
10
कागलमध्ये राडा! मुश्रीफ आणि घाटगे समर्थक भिडले; एकमेकांची कॉलर पकडून हाणामारी
11
महायुतीत भाजपच मोठा भाऊ! साताऱ्यातील आणखी एक मतदारसंघ मिळण्याचे प्रयत्न
12
मनसेकडून पाच नावांची घोषणा, चौथ्या यादीत कोणत्या मतदारसंघात उतरवले उमेदवार?
13
आता खरी 'कसोटी'! बंगळुरू-पुणे मार्गावर खडतर प्रवास; भारत WTC फायनलमध्ये पोहोचणार?
14
महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला? 'या' 12 जागांचा वाद कायम, तिन्ही पक्षांचा दावा...
15
भायखळ्यात यामिनी जाधवांविरोधात ठाकरेंचा शिलेदार ठरला; कोण आहेत मनोज जामसुतकर?
16
"आम्हाला ५ जागा द्या, अन्यथा २५ जागांवर लढणार’’, मित्रपक्षाचा मविआला इशारा 
17
मृत्यू केव्हा गाठणार? एका रिपोर्टवर AI टूल करते भविष्यवाणी; लोकांच्या हॉस्पिटलमध्ये लागल्यात रांगा
18
जबरदस्त! Whatsapp मध्ये येणार कमाल फीचर; मोबाईल न वापरता मॅनेज करू शकता कॉन्टॅक्ट्स
19
Maharashtra Assembly Election: दिंडोशीत सुनील प्रभूंविरोधात शिंदेंच्या शिवसेनेचा उमेदवार कोण?

टीम देवेंद्र फडणवीस

By admin | Published: November 01, 2014 1:16 AM

राज्याचे नवनिर्वाचित व भाजपाचे पहिले राज्यातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रीमंडळात १० मंत्र्यांनी शपथ घेतली.

एकनाथ खडसे
कॅबिनेट मंत्री
मतदारसंघ: मुक्ताईनगर
विभाग: खान्देश
वय: 62
शिक्षण: बी.कॉम
गाव:कोथळी, 
ता. मुक्ताईनगर
व्यवसाय:शेती
समाज :लेवा पाटील
 
छंद गाणी जमा करण्याचा
हिंदी चित्रपटातील गाण्यांचा संग्रह करणो, प्रचंड जनसंपर्क.
सामाजिक कार्यात सहभाग 
उच्च शिक्षणासाठी विद्याथ्र्याना प्रोत्साहन, गोरगरिबांना शिक्षणासाठी तसेच वारक:यांना मदत करणो, सामाजिक कार्यक्रमांना आवजरून उपस्थित राहणो व मार्गदर्शन करणो. 
संस्थात्मक कार्य 
मुक्ताई सहकारी सूतगिरणीसह अनेक संस्थांच्या माध्यमातून ते कार्य करीत आहेत. ग्रामपंचायत सदस्य, सरपंचपदापासून तर मंत्रिपदार्पयत त्यांनी विविध पदे भूषविली असून, आपल्या कामाचा ठसा उमटविला आहे. 
सहाव्यांदा विजयी 
जनसंघ-भाजपाला मुक्ताईनगर मतदारसंघात यश मिळाले नसताना खडसे यांनी विजयाची परंपरा सुरू केली. 199क् मध्ये ते पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले. यंदा ते सहाव्यांदा विजयी झाले. 
 
न्याय मिळाल्याचा आनंद आहे. आता जबाबदारी वाढली आहे. यापूर्वीही मंत्रिपदे भूषविली. भविष्यातदेखील राज्यातील प्रश्नांना न्याय देण्याचा त्यांचा प्रय} असेल. विरोधी पक्षनेते असताना विविध प्रश्न मांडले, त्यामुळेच पक्षाने पुन्हा संधी दिली.     - मंदा खडसे, प}ी 
 
सुधीर सच्चिदानंद मुनगंटीवार
कॅबिनेट मंत्री
मतदारसंघ: बल्लारपूर
विभाग: विदर्भ
वय: 52
शिक्षण: एम.कॉम., एल. एल.बी., एम.फिल., डी.बी.एम., डी.आय.आर.पी.एम., बी.जे.
गाव:चंद्रपूर 
व्यवसाय:शेती
समाज :कोमटी
 
छंद 
पुस्तकांचा संग्रह व वर्गवारी करणो, प्रचंड जनसंपर्क.
सामाजिक कार्यात सहभाग 
गरीब व गरजू विद्याथ्र्यासाठी मोफत संगणक प्रशिक्षणाची सोय, अपंग मार्गदर्शन मेळावे, तीनचाकी सायकलींचे वितरण, बचतगटांसाठी मार्गदर्शन मेळावे व प्रशिक्षण शिबिर. 
संस्थात्मक कार्य 
डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालयाच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन. चंद्रपूर व बल्लारपुरात संस्थेअंतर्गत माहिती व मार्गदर्शन केंद्र कार्यरत. नेत्रचिकित्सा शिबिरांचे आयोजन.
पाचव्यांदा विजयी 
2क्1क् ते 2क्13 र्पयत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष. विधानसभेत जाण्याची त्यांची ही सलग पाचवी वेळ आहे. यापूर्वी चंद्रपूर मतदारसंघातून 1995 पासून सलग तीन व आता बल्लारपूरमधूून 2क्क्9 पासून सलग दुस:यांदा ते विजयी झाले आहेत. 
 
सुधीरजींचा मंत्रिमंळात समावेश होणो ही आनंदाचीच बाब आहे. त्यांनी आजवर घेतलेल्या कष्टाचे चीज झाले. पदाच्या लालसेने त्यांनी कधीच राजकारण केले नाही. जे खाते मिळेल त्यावर ते आपली छाप नक्कीच सोडतील. 
- सपना मुनगंटीवार, प}ी 
 
विनोद तावडे
कॅबिनेट मंत्री
मतदारसंघ: बोरीवली
विभाग: मुंबई
वय: 51
शिक्षण: बी.ई. इलेक्ट्रॉनिक्स
गाव:मुंबई
व्यवसाय:शेती
समाज :मराठा
 
छंद 
आत्मचरित्र, ऐतिहासिक साहित्य वाचनाची आवड. 
सामाजिक कार्यात सहभाग 
उच्च शिक्षणासाठी विद्याथ्र्याना प्रोत्साहन, राज्यातील भ्रष्टाचाराची विविध प्रकरणो बाहेर काढून त्यांचा पाठपुरावा केला.
संस्थात्मक कार्य 
1995 ते 99 आणि 2002 ते 11 या कालावधीत ते महाराष्ट्र भाजपाचे सरचिटणीस होते. 1999 मध्ये भाजपाच्या मुंबई महानगर युनिटचे अध्यक्ष म्हणून अवघ्या 36 व्या वर्षी निवड झाली. ते रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या संचालक मंडळाचे सदस्य आहेत.
पहिल्यांदाच विजयी 
तावडे यांनी महाराष्ट्र विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते पद भूषविले आहे. विधानपरिषदेवर त्यांची तीन वेळा सदस्य म्हणून निवड झाली आहे. मात्र ते बोरीवली मतदारसंघातून प्रथमच विधानसभेवर निवडून आले आहेत.
 
जास्तीत जास्त विधायक व जनतेच्या हिताचा निर्णय घेतात तेव्हा सर्वात जास्त आनंद होतो़ एखादे मंत्रिपद मिळाले तर आनंद नक्कीच होईल व ते जनतेच्या हिताची कामे करतील, याबाबत आशावादी आहे.
- वर्षा तावडे, प}ी 
 
पंकजा मुंडे-पालवे
कॅबिनेट मंत्री
मतदारसंघ: परळी
विभाग: मराठवाडा
वय: 35
शिक्षण: एमबीए
गाव:परळी, 
जि. बीड
व्यवसाय:शेती
समाज :वंजारी
 
छंद 
वाचन आणि लेखनाचा छंद, संगीताची आवड.
सामाजिक कार्यात सहभाग 
2क्13 अखेर त्यांनी राज्यातील आघाडी सरकारविरोधात एल्गार मेळावे घेऊन राज्यभर जनजागृती मोहीम राबविली. 2क्14 च्या लोकसभा निवडणुकीत गोपीनाथराव यांच्या प्रचारासाठी संपूर्ण बीड जिल्हा ढवळून काढला होता.  
संस्थात्मक कार्य 
संचालिका : दिनदयाळ सहकारी बँक 
संचालिका : वैद्यनाथ सहकारी बँक
संचालिका : वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना
संचालिका : वैद्यनाथ सर्वागीण विकास संस्था 
दणदणीत विजयी 
2क्क्5 साली रेणापूर मतदारसंघात गोपीनाथ मुंडे यांच्या विधानसभा निवडणुकीतील प्रचाराची जबाबदारी त्यांनी स्वीकारली. त्यांनी 2क्क्9 च्या विधानसभा निवडणुकीत परळीतून दणदणीत मताधिक्य मिळवित विजश्री खेचून आणली़  
 
पित्याचा राजकीय वारसा.. भाजपाचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर त्यांच्या मतदारसंघासह संपूर्ण वंजारी समाजाचे नेतृत्व करण्याची जबाबदारी पंकजा यांच्यावर येऊन पडली. भगवानगडावर झालेल्या कार्यक्रमात नामदेव शास्त्री महाराजांनी त्यांना मुंडे यांचा राजकीय वारसा चालविण्याचा आग्रह धरला. त्यामुळे पित्याच्या अपघाती निधनाचे दु:ख उराशी कवटाळून पंकजा यांनी राजकीय धुरा आपल्या खांद्यावर घेतली. 
 
प्रकाश महेता
कॅबिनेट मंत्री
मतदारसंघ: घाटकोपर पूर्व
विभाग: मुंबई
वय: 5क्
शिक्षण: मॅट्रिक
गाव:मुंबई, 
घाटकोपर
व्यवसाय:चहापत्ती व्यवसाय
समाज :गुजराती
 
छंद 
लोकसेवा हाच छंद, फावल्या वेळात ध्यान, अध्यात्म
सामाजिक कार्यात सहभाग 
1974मध्ये बिहार, गुजरातमध्ये छात्र संघर्ष वाहिनी, नवनिर्माण आंदोलनाच्या माध्यमातून भ्रष्टाचाराविरोधात लढणा:या विद्याथ्र्यावर गोळीबार झाला. या गोळीबारात ठार झालेल्या विद्याथ्र्याच्या कुटुंबीयांना सर्वोदयी चळवळीत सहभागी होऊन आर्थिक मदत. 
संस्थात्मक कार्य 
जनसंघात सहबूथप्रमुख या पदापासून राजकीय कारकिर्द सुरू केलेल्या महेता यांनी युवक आघाडीचे तालुकाध्यक्ष, भाजपात जिल्हा युवक मोर्चाचे प्रभारी, मुंबई युवक आघाडीचे अध्यक्ष, 1995मध्ये कामगार, सेवायोजन, गृहनिर्माण राज्यमंत्री, उत्पादन शुल्क मंत्रिपद भूषवले.
सहाव्यांदा विजयी 
199क्मध्ये भाजपातर्फे पहिल्यांदा निवडून आले. त्यानंतर सलग सहा वेळा आमदार होण्याची किमया त्यांनी साधली.
 
मला विचाराल तर महेतांच्या विजयाचा आनंद आहे. जनतेला त्यांचे हक्क मिळायला हवेत, सोयी-सुविधा मिळायला हव्यात यासाठी त्यांनी खटपट केली. आता मंत्री झाल्यानंतर ते जनतेची आणखी चांगल्या पद्धतीने सेवा करतील.
- किशोरी महेता, प}ी
 
चंद्रकांत बच्चू पाटील
कॅबिनेट मंत्री
मतदारसंघ: पुणो (पदवीधर)
विभाग: प. महाराष्ट्र
वय: 55
शिक्षण: बी.कॉम
गाव:कोल्हापूर. 
व्यवसाय:उद्योजक
समाज :मराठा
 
छंद 
शेती, वाचन, सातत्याने कार्यकत्र्याच्या संपर्कात राहणो, प्रवास 
सामाजिक कार्यात सहभाग 
महाविद्यालयापासून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे काम, पुढे राष्ट्रीय जबाबदारी. या कालावधीत त्यांच्याकडे महाराष्ट्र, गुजरात, गोवा या राज्यांची जबाबदारी. क्रीडापटूंना आर्थिक मदत. कार्यकत्र्याना सन्मान देणारा नेता.   
संस्थात्मक कार्य 
‘विद्या प्रबोधिनी’ या संस्थेच्या माध्यमातून तरुण-तरुणींसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, अनेक सहकारी संस्थांमध्ये संचालक, रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे सचिव, शिवाजी व सोलापूर विद्यापीठांचे सिनेट सदस्य. 
दुस:यांदा विजयी 
2क्क्8 मध्ये पुणो पदवीधर मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या राजेश पाटील-वाठारकर यांचा पराभव करून ते विधानपरिषदेवर निवडून गेले. 2क्14 मध्ये सलग दुस:यांदा निवडून आले. 
 
आजर्पयतच्या वाटचालीत पक्षाशी एकनिष्ठ राहून संघटनेसाठी केलेल्या कामाची पोचपावतीच या मंत्रिपदाच्या निमित्ताने मिळाली आहे. त्यांची काम करण्याची पद्धत पाहता, ते या सगळ्यांच्या अपेक्षांना न्याय देतील, याची खात्री वाटते. - अंजली चंद्रकांत पाटील
 
विष्णू रामा सवरा
कॅबिनेट मंत्री
मतदारसंघ: विक्रमगड
विभाग: कोकण
वय: 54
शिक्षण: बी.कॉम
गाव:गालतर, 
ता. वाडा
व्यवसाय:शेती
समाज :आदिवासी
 
छंद 
जनहितार्थ कार्यरत राहणो, वाचन आणि समाजकार्य
सामाजिक कार्यात सहभाग 
बँकेतील नोकरी सोडून भाजपाचे कार्य. अरविंद आश्रमशाळा दादडे, ता. विक्रमगड, माधवराव काणो आश्रमशाळा देवगाव ता. वाडा, आदिवासी आश्रमशाळा कळंभई ता. वाडा याद्वारे त्यांनी आदिवासींमध्ये शिक्षणाचा प्रसार केला.  
संस्थात्मक कार्य 
गरीब व गरजूंना आर्थिक मदतीचा हात देण्यासाठी वाडा येथे उत्कर्ष नागरी सहकारी पतसंस्था. मूकबधिर विद्यालय जव्हार, आदिवासी विद्यार्थी वसतिगृह मोखाडा व वाडा हे त्यांनी वनवासी बांधवांसाठी केलेले महत्त्वाचे काम आहे. 
सातत्याने विजयी 
पहिल्याच निवडणुकीत पराभव स्वीकारलेल्या सवरांनी 199क् मध्ये पुन्हा निवडणूक लढविली. ही व त्यानंतर प्रत्येक निवडणूक त्यांनी जिंकली.  
 
समाजासाठी आपले आयुष्य चंदनासारखं कसं ङिाजवावं हे त्यांच्याकडून शिकावं. पद, प्रसिद्धी, नावलौकिक या कशाच्या मागे न लागता ते नि:स्वार्थवृत्तीने कार्य करीत राहिले, त्याचे फळ पक्षाने आणि ईश्वराने त्यांना दिले.
- जयश्री सवरा
 
विद्या ठाकूर
राज्यमंत्री
मतदारसंघ: गोरेगाव
विभाग: मुंबई
वय: 45
शिक्षण: आठवी पास
गाव:मालाड, मुंबई  (मूळ - उत्तर प्रदेश )
व्यवसाय:विकासक
समाज :ठाकूर
 
छंद 
गरीब महिलांना रोजगारासाठी मदत करणो, मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहन देणो. 
सामाजिक कार्यात सहभाग 
बालपणापासून समाजसेवेची आवड असल्याने गरीब महिलांना रोजगार मिळवून देण्यासाठी सतत प्रयत्न सुरू असतो. साडीवाटप, गरिबांमध्ये दानधर्म, मुलींना शिक्षणासाठी मदत करणो.
संस्थात्मक कार्य 
सार्वजनिक आरोग्य समिती अध्यक्षा असताना गरीब रुग्णांवर मोफत उपचार, गरीब विद्याथ्र्याना मोफत शैक्षणिक साहित्य, पर्यावरणाच्या रक्षणासाठी दरवर्षी 1क् हजार तुळशींचे रोपण करणो, बेटी बचाओ बेटी पढाओ जनजागृती अभियान चालविले. निराधार महिलांना अन्नदान, ज्येष्ठ नागरिकांना मोफत छत्रीवाटप.
पहिल्यांदा विजयी 
चार वेळा नगरसेवकपद असलेल्या विद्या ठाकूर यांनी गोरेगाव मतदारसंघात सुभाष देसाई यांचा पराभव करुन भाजपाचा ङोंडा फडकवला.
 
भाजपा पक्ष आणि जनतेने दाखविलेल्या विश्वासामुळेच आज विद्या ठाकूर यांना हा बहुमान मिळतो आहे. याचा मला आनंद आहे. त्यांच्या प्रत्येक कार्यात माङो सहकार्य व साथ अशीच कायम राहील.
- जयप्रकाश ठाकूर, पती 
 
दिलीप ज्ञानदेव कांबळे
राज्यमंत्री
मतदारसंघ: पुणो काँटेनमेंट
विभाग: प.महाराष्ट्र
वय: 52
शिक्षण: बी.ए़
गाव:म्हैस, माढा. 
सोलापूर
व्यवसाय:समाजकार्य
समाज :मातंग
 
छंद 
नवीन माणसांशी गप्पा मारणो, माणसे जोडणो, पुस्तक वाचन 
सामाजिक कार्यात सहभाग 
शिक्षणासाठी विद्याथ्र्याना प्रोत्साहन, 
सामाजिक कार्यक्रमांना आवजरून उपस्थित 
राहणो व मार्गदर्शन करणो. गटई कामगारांना पत्र्याची शेड देणो, अण्णाभाऊ साठे यांचे डाक तिकीट प्रकाशन.
संस्थात्मक कार्य 
स्वामी विवेकानंद संस्थेतर्फे चालविल्या 
जाणा:या दोन आश्रमशाळांच्या माध्यमातून गोरगरिबांना शिक्षणासाठी  मदत, राज्य 
मातंग समाज संघटनेमार्फत गरीब मुलांना शिष्यवृत्ती, अण्णाभाऊ साठे यांच्या नावे नामवंतांना पुरस्कार.
दुस:यांदा विजयी 
भाजपाच्या पर्वती या बालेकिल्ल्यातून 1995मध्ये विजयी. त्या वेळी मंत्रिपद भूषविले. पुणो कॅन्टोमेंटमधून दुस:यांदा विजयी.
 
राज्यमंत्री होण्याची दोनदा संधी.. गरवारे महाविद्यालयात शिकत असताना अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेशी त्यांचा संबंध आला, तेव्हापासून राजकीय कारकिर्दीची सुरुवात करणा:या कांबळेंनी 1992 मध्ये महापालिकेची निवडणूक लढविली, मात्र त्यांना यश मिळू शकले नाही. त्यानंतर 95 साली विधानसभेच्या निवडणुकीत त्यांचा विजय झाला आणि ते राज्यमंत्रीही झाले. त्यानंतर या वेळी त्यांना पुन्हा राज्यमंत्री पदाची संधी मिळाली.