जितेंद्र कालेकर, ठाणेनेपाळमध्ये शनिवारी झालेल्या भूकंपाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील शासकीय रुग्णालयांतील पाच तज्ज्ञ डॉक्टरांची वेगवेगळी पथके काठमांडूला रवाना करण्यात येणार आहेत. यात ठाणे सर्कलमधून डॉ. बंडू देशमुख यांच्या नेतृत्वाखाली सहा वैद्यकीय अधिकाऱ्यांचे पथक रविवारी रात्री रवाना झाले.राज्यातून ठाणे, नाशिक, नागपूर, अकोला आणि पुणे या प्रत्येक सर्कलमधून प्रत्येकी आठ अशी ४० जणांची पाच वेगवेगळी पथके नेपाळच्या मदतीसाठी पाठविण्यात येत असल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागाचे सहायक संचालक के.पी. आहेर यांनी ‘लोकमत’ला दिली. याशिवाय, रायगडमधूनही काही डॉक्टर सोमवारी जाणार आहेत. तसेच नाशिक, नागपूर, अकोला आणि पुण्याची पथके सोमवारी रवाना होणार आहेत, अशी माहिती ठाणे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. गौरी राठोड यांनी दिली.
नेपाळच्या मदतीसाठी डॉक्टरांचे पथक रवाना
By admin | Published: April 27, 2015 3:54 AM