शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाने जे ठाकरेंसोबत केले, तसेच आता शिंदेंशी वागतायत का? शिंदे गटाचे नेते म्हणाले...
2
एकनाथ शिंदे यांची दुपारी ३ वाजता पत्रकार परिषद, मोठा निर्णय जाहीर करणार? 
3
मुख्यमंत्री कोण होणार? लवकरच उत्तर मिळेल; देवेंद्र फडणवीसांचे सूचक वक्तव्य
4
काय आहे 'वन नेशन, वन सबस्क्रिप्शन' योजना, कोणाला होणार फायदा?
5
IPL Auction 2025: धडामsss ! मॅक्सवेल ते स्टार्क… ‘या’ ५ बड्या खेळाडूंचा भाव ‘धाडकन्’ कोसळला..!!
6
Enviro Infra Engineers IPO Allotment : एन्व्हायरो इन्फ्रा IPO चं अलॉटमेंट झालीये का? कसं चेक कराल, जाणून घ्या 
7
६ बहिणींचं लग्न, ४ भावांचं शिक्षण; अपघातात मृत्यू झालेल्या डॉक्टरची डोळे पाणावणारी गोष्ट
8
'सर्वात मोठा पक्ष कोणताही असेल, मुख्यमंत्री तुम्हीच होणार'; निवडणुकीपूर्वी भाजपाने शिंदे शिवसेनेला शब्द दिलेला?
9
फडणवीसांसारखीच झाली एकनाथ शिंदेंची अवस्था?; २०२२ च्या घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता
10
"...म्हणून भाजपाचा मुख्यमंत्री होण्यासाठी एकनाथ शिंदेंनी रस्ता मोकळा करावा"
11
"राज ठाकरे यांना फसवलं, इव्हीएममुळेच महायुती जिंकली’’, मनसेचा गंभीर आरोप
12
'पुष्पा 2'नंतर 'पुष्पा 3' येणार की नाही? अल्लू अर्जुनच्या पोस्टमधून चाहत्यांना मिळालं उत्तर
13
Jacqueline Fernandez : "तिला काहीच..."; सुकेशकडून महागड्या भेटवस्तू घेणाऱ्या जॅकलिन फर्नांडिसच्या वकिलांचा युक्तिवाद
14
IRCTC ची ब्लॅक फ्रायडे ऑफर, स्वस्तात मिळेल फ्लाइट तिकीट आणि 'ही' सुविधा...
15
गुरु प्रदोष: ८ राशींना अचानक धनलाभ योग, शुभ घडेल; इच्छापूर्ती, दत्तगुरु-महादेवांची कृपा!
16
"बाप आखिर बाप होता है", मुलगी पराभूत झाल्यानंतर विजयी पित्याचे बॅनर चर्चेत!
17
 स्वबळावर बहुमताजवळ, तरीही मुख्यमंत्रिपदावर अडलंय घोडं, भाजपासमोर आहेत या अडचणी
18
जगातील टॉप ५० हायराईज टॉवरपैकी एकात आहे Rohit Sharmaचं घर; किंमत, वैशिट्ये पाहून अवाक् व्हाल
19
ऐश्वर्या रायबाबत भावजयचीही क्रिप्टिक कमेंट, अभिनेत्रीसोबत कधीच फोटो शेअर करत नाही; कारण...
20
Maharashtra Politics: महाराष्ट्रात बिहार मॉडेल लागू होणार नाही; भाजपच्या नेत्याने आतली बातमी सांगितली; मुख्यमंत्रिपदावर सस्पेन्स कायम

‘संघाला विश्वासात घेणे गरजेचे’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 04, 2016 2:55 AM

जनसंघ-भाजपासारखे राजकीय क्षेत्रातील काम... तुम्ही मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला विश्वासात घ्यायलाच हवे.

डोंबिवली : सांस्कृतिक क्षेत्रातील तुमचे काम असो, बँकेतील किंवा शैक्षणिक क्षेत्रातील... त्यापलीकडे जाऊन जनसंघ-भाजपासारखे राजकीय क्षेत्रातील काम... तुम्ही मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला विश्वासात घ्यायलाच हवे. संघ तुम्हाला विरोध करत नाही, पण जर तुम्ही कल्पना दिलीत; तर त्यात सुधारणा करणे, मार्गदर्शन घेणे सोपे होते, अशी भावनाही आबासाहेब पटवारी मांडतात. त्यांनी निकटवर्तीयांशी केलेल्या चर्चेवेळी, आत्मचरित्र लिहिताना, खाजगी गप्पांत या भावना व्यक्त केल्या आहेत. ज्या वेळी डोंबिवलीत पहिल्यांदा गुढीपाडव्यानिमित्त नववर्ष स्वागतयात्रा काढण्याचे नक्की झाले, तेव्हा आबासाहेबांनी तत्कालीन सरसंघचालक मोहन भागवत आणि डॉ. अशोकराव कुकडे यांच्याशी पत्रव्यवहार केला. त्यांना उपक्रमाची कल्पना दिली. त्याचे कौतुक झाले. संघाचा पाठिंबा मिळाला, पण सर्वव्यापी होण्यासाठी हा उपक्रम संघाच्या झेंड्याखाली नको; तर मंदिराच्या व्यासपीठाखाली करा, अशी सूचनाही मिळाल्याने गणेश मंदिर संस्थानच्या माध्यमातून आबासाहेबांनी त्याचे नेतृत्व केले. पहिल्या स्वागतयात्रेला सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासोबत ज्येष्ठ समाजवादी नेते दत्ताजी ताम्हाणेही व्यासपीठावर आले आणि हा उपक्रम सर्वसमावेशक झाला. मातृसंस्थेला कल्पना दिल्याचा हा परिणाम असल्याचा दाखला त्यांचे निकटवर्तीय देतात.पंतप्रधानपदी असूनही जे अटलबिहारी वाजपेयी नियमितपणे लालकृष्ण अडवाणी यांचा सल्ला घेत त्या अडवाणींची स्थिती सध्या इतकी शोचनीय झाली नसती. जर त्यांनी बॅ. जिनांबद्दल वक्तव्ये करताना मातृसंस्थेला विश्वासात घेतले असते, तर कदाचित ही वेळ त्यांच्यावर आली नसती. पाकिस्तानी नेते, फुटीरतावाद्यांना भेटणे संघाने कधीच निषिद्ध मानले नाही. तसे असते तर संघाच्या विवेक साप्ताहिकात मी घेतलेली यासीन मलिकची मुलाखत छापून येऊच शकली नसती, अशा प्रसंगांतून आबासाहेब त्यांच्या मनातील अडवाणींबद्दलच्या भावनाही मांडतात. तुम्हाला हिंदूंचे राजकारण करायचे असले तरी देशाचे राजकारण करताना, जगासमोर अन्य धर्मीयांनाही विश्वासात घेऊनच पुढे जावे लागते. ज्या वेळी केंद्रात-राज्यात तुमच्यावर भरभरून विश्वास टाकला जातो, तेव्हा विकासाबद्दल असलेल्या अपेक्षा तुम्ही पूर्ण केल्या नाहीत, तर तुम्हाला त्यांचे उत्तर द्यावे लागेल, असेही आबासाहेब परखडपणे सुनावतात. >८० च्या दशकात आरक्षण संपले असते!मी पोद्दारला शिकत असल्याने हिंदू कॉलनीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना नियमितपणे भेटण्यास, त्यांच्याशी चर्चा करण्यास जात असे. अनेक सामाजिक विषयांवर त्या वेळी चर्चा होई. डॉ. आंबेडकर आणखी काही काळ असते, तर त्यांनी १९८० च्या दशकात आरक्षण संपवले असते. कारण, कोणत्याही धडपडणाऱ्या उद्योगाला जशी काही काळापुरती सवलतींची आवश्यकता असते, तशी दलित-मागासांना ठरावीक काळापुरती आरक्षणाची-राखीव जागांची सवलत मिळावी, असे बाबासाहेबांचे मत होते. आंबेडकरांना नियमित भेटल्याचा परिणाम असेल, पण नगराध्यक्ष असताना आमच्या टीममध्ये एकही दलित सदस्य नसतानाही आम्ही पालिकेतील सभागृहाला आंबेडकरांचे नाव दिले.>दोन टर्म होताच पद सोडा!तुम्ही कोणत्याही पदावर, कोणत्याही संघटनेत असाल, तरी दोन टर्म झाल्यावर ते पद सोडायला हवे, असा परखड सल्लाही पटवारी यांनी दिला आहे. त्यानंतर, ती जबाबदारी तरुणांच्या-नव्या पिढीच्या हाती सोपवायला हवी. म्हणूनच, मी नंतर पक्षात देऊ केलेली पदे घेतली नाहीत. तुमच्यात क्षमता असेल, जिद्द असेल, हिंमत असेल तर तुम्ही अमुक पदावर अवलंबून न राहता कोणत्याही क्षेत्रात यश मिळवू शकता, ते मी सिद्धही करून दाखवले आहे.>ब्राह्मण नव्हे, तर डोंबिवलीकर :ब्राह्मण सभेचा पदाधिकारी होणे, मी कटाक्षाने टाळले. मी सदस्य जरूर झालो, पण मला एका समाजाची व्यक्ती म्हणून समाजकारण न करता या शहराचा नागरिक म्हणून वेगवेगळ्या जबाबदाऱ्या पार पाडायच्या होत्या.>...आणि वाजपेयींचा दौरा रद्द झाला!पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा पहिलावहिला डोंबिवली दौरा मी ठरवला होता. माजी राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या कवितांच्या मी केलेल्या अनुवादाचे प्रकाशन त्यांच्या हस्ते होणार होते. त्यासाठी शहर सजले. तेव्हा मध्यवर्ती भागात सभागृह नसल्याने टिळक टॉकिजमध्ये हा कार्यक्रम होणार होता. त्यासाठी त्या मालकाने स्वत: टॉकिज सजवले. सुरक्षेसाठी दोन दिवस चित्रपटाचे खेळ बंद ठेवले. पण, कार्यक्रमाच्या दिवशीच रमाबाई आंबेडकरनगरात गोळीबाराची घटना घडली. त्यानंतरही वाजपेयींनी दौरा रद्द करू नये; उलट रमाबाईनगरात जाऊन तेथील नागरिकांची भेट घेऊन डोंबिवलीत यावे, या मताचा मी होतो. पण, खासदार या नात्याने रामभाऊ कापसे यांनी वाजपेयींना दौरा रद्द करण्याचा सल्ला दिला. तो देण्यापूर्वी माझ्याशी बोलायला हवे होते. पण, तसे झाले नाही. नंतर, वाजपेयींच्या निवासस्थानी हा कार्यक्रम पार पडला.>सर्वव्यापी मैत्री... : माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम, तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी, ज्येष्ठ नेते प्रमोद महाजन अशा दिग्गजांशी पटवारी यांचे मित्रत्वाचे संबंध राहिले. राष्ट्रपतीपदी असलेले कलाम तर मुघल गार्डनमध्ये झाडाखाली त्यांच्याशी अनौपचारिक गप्पा मारत. पण, या विविधांगी मैत्रीचा डोंबिवलीतील मंडळींनी उपयोग करून न घेतल्याची खंत त्यांच्या मनात आहे.>ही तो शेवाळकरांची इच्छा!माझ्या अमृतमहोत्सवानिमित्त विशेषांक प्रसिद्ध झाल्यावर मी आत्मचरित्राचा विषय बाजूला ठेवला होता. पण, राम शेवाळकर यांनी त्याचे हस्तलिखित वाचल्यावर ते प्रकाशित करण्याचा आग्रह धरला. नव्हे, त्याला प्रस्तावनाही लिहिली. नागपूरमध्ये प्रकाशन सोहळा व्हावा, ही त्यांची इच्छा होती. पण, ते गेले आणि मीही हा विषय बाजूला ठेवला. पण, त्यांच्या मुलाने मला आठवण करून दिली आणि आत्मचरित्र प्रकाशनाच्या वाटेवर गेले, अशी कृतज्ञता आबासाहेब व्यक्त करतात. पाच वर्षे अमेरिकेत केलेले सामाजिक काम, मस्कतमधील आठवणींचा त्यात समावेश केला. जवळपास सहस्रभर स्नेह्यांचे परिशिष्ट त्यांनी जोडल्याचीही माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली.>... आणि कलाम यांनी भेदले सुरक्षा कवचराष्ट्रपतीपद भूषविलेले ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या सहृदयतेचे अनेक किस्से पटवारी यांच्याजवळ आहेत. पुण्यात कलाम यांचा एक कार्यक्रम होता. तेथे आबासाहेब श्रोत्यांच्या गर्दीत एका कोपऱ्यात उभे होते. कार्यक्रम संपवून परतताना कलाम यांचे त्यांच्याकडे लक्ष गेले. सुरक्षा कवच भेदून ते तेथे आले आणि त्यांनी भरभरून गप्पा मारल्या.